अत्यंत कमी पाणी असताना केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फवारणीवर अंजीरास १०० रू./ किलो भाव !

श्री. गोविंद साधू जाधव,
मु. पो. गोगलवाडी, ता. हवेली, जि. पुणे
मोबा. ९७३०२७२९६३


माझ्याकडे २००३ मध्ये मध्यम जमिनीत लावलेली ३५ अंजीराची झाडे आहेत. गेल्यावर्षी २०१२ मध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वेबसाईटवरून मला तंत्रज्ञानाची माहिती मिळाली, त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसला भेट देऊन अंजीरासाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन ही औषधे शिफारशीप्रमाणे घेऊन गेलो. या अवस्थेत फळे लागून कमी पाण्यामुळे ती सुकत होती. तेव्हा वरील औषधांचे प्रत्येकी ८० मिली प्रमाणे १५ लिटर पंपाला घेतले होते. झाडांना पाणी कमी असताना देखील फवारणीनंतर अतिशय समाधानकारक रिझल्ट मिळाला होता. कमी पाण्यावर देखील फळांचे उत्तमप्रकारे पोषण होऊन फळे मोठी व लाल गडद रंग प्राप्त झाला होता. पुणे मार्केटला माल विक्रीस आणला असता मार्केटला ६० ते ६५ रू. किलो भाव असताना आम्हाला १०० रू. किलो भाव मिळाला. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करून आम्हास ५० हजार रू. उत्पन्न मिळाले. अंजीराचे गेल्यावर्षीच्या उत्तम अशा उत्पादनानंतर चालू वर्षी अंजीर व सिताफळाला फवारण्यासाठी सप्तामृत औषधे घेत आहे. यावर्षी नवीन पुन्हा ५० झाडांची लागवड केली आहे व इथून पुढे सतत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करणार आहे.