'सिद्धीविनायक' शेवग्याच्या पहिल्याच बहारास प्रत्येक झाडावर २०० शेंगा

श्री. बाजीराव आनंदा सुर्वे,
मु. पो. पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर,
मोबा. ९६०४७५५१४६



'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीसाठी ३ x ३ मिटर अंतरावर २ x २ x २ चे खड्डे घेतले. त्यामध्ये नदीकाठची गाळाची माती भरली. तसेच सुपर फॉस्फेट २ किलो, युरीया ५ किलो, ताजे शेण १० किलो २०० लि. पाण्यात एकत्र करून प्रत्येक खड्डयामध्ये १ फूट माती भरल्यावर ४ लि. स्लरी पुन्हा १ फुट माती भरल्यानंतर ४ लि. स्लरी देऊन खड्डे भरून घेतले. त्या मातीमध्ये वरच्या थरात प्रत्येक खड्ड्यात १०० ग्रॅम कल्पतरू मिसळून दिले. त्यामध्ये ६ इंचाचा खड्डा करून शेवग्याची रोपे लावली. ठिबक सिंचनमधून २ वेळा जर्मिनेटर सोडले होते. त्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची संख्या भरपूर वाढली. झाडाची वाढ जोमाने झाली. शेवग्याची एकूण १२५ झाडे आहेत.

पहिल्या बहाराला प्रत्येक झाडाला २०० शेंगा लागल्या, शेंगाची साईज १।। ते २ फूट एवढी होती. शेंगा चवीला चांगली होती. शेंगा हिरवीगार असल्यामुळे लोकल मार्केटला १० रुपयाला २ शेंगा याप्रमाणे विक्री केली. दर चांगले मिळाले. हे सगळे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी (अॅग्रो) प्रा.लि. कंपनीमुळे साध्य झाले. फुले आल्यावर सप्तामृत औषधांची फवारणी केल्यामुळे शेवग्याचा बहार जोमात आला. त्यानंतर दर १५ दिवसांनी गोमुत्राची फवारणी केली. परत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे औषधांची फवारणी केली. या सगळ्या प्रयत्नामुळे शेवगा चांगला आला.