डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने चालू व फरदड कपाशीचे अधिक व दर्जेदार उत्पादन!

श्री. अंकुश चिंतुजी धाबेकर, मु.पो. नांदा, ता.कोरपणा, जि.चंद्रपूर- ४४२९१७
मोबा. ९९७०४५३७१५


मी एक साधारण शेतकरी आहे. माझे शिक्षण जेमतेम १० वी पास आहे. मला शेतीमध्ये खूप आवड आहे. मी माझ्या शेतात आधुनिक पद्धतीच्या नव - नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. त्यामध्ये मी एकदा नागपूरच्या अॅग्रो व्हिजन प्रदर्शनला गेलो असता मला डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचे सल्लागार श्री. अंकुश वराडे यांची स्टॉलवर भेट झाली. त्यांना मी तंत्रज्ञानाबद्दल विचारपुस केली व माझ्या शेतीवर नांदा, जि. चंद्रपूर येथे बोलावून घेतले. त्यांच्या मार्गदर्शनातून मी मागच्या वर्षी टरबुज व खरबुज लागवड केली. मला खूप चांगले उत्पादन झाले. त्यामुळे मी डॉ.बावसकर तंत्रज्ञान पुर्ण शेतीमध्ये वापरण्याचा निर्णय घेतला व प्रथम कपाशीमध्ये वापर करण्यास सुरुवात केली.

मी २९ मी २०१४ ला कपाशीची पारस ब्रह्या या वाणाची निवड करून ५ x २ फुटावर ठिबकवर लागवड केली. त्याला एकरी १ बॅग कल्पतरू + १ बॅग डि.ए.पी. असा डोस दिला. त्यानंतर मी कपाशीची लागवड केली. उगवणीनंतर ८ दिवसांनी एकरी ७०० मिली जर्मिनेटर + ३ किलो १९:१९:१९ याप्रमाणे ठिबकमधून सोडले. त्यानंतर उगवून आल्यावर १५ ते २० दिवसाच्या दरम्यान कॉटनथ्राईवर ७०० मिली + कॉपशाईनर ७०० मिली + जर्मिनेटर ७०० मिली + प्रिझम ५०० मिली + प्रोटेक्टंट ३०० ग्रॅमची २०० लि. पाण्यातून पहिली फवारणी केली.

त्यानंतर कपाशी खूप जोमाने वाढायला सुरुवात झाली. त्याचबरोबर हिरवीगार झाली. मला शेत बघून समाधान वाटले. त्यानंतर वातावरणाच्या बिघाडामुळे व पावसाच्या कमतरतेमुळे माझ्या कपाशीवर पिठ्या ढेकूण येण्यास सुरुवात दिसू लागली. त्यामुळे मी कंपनी प्रतिनिधी श्री. अंकुश वराडे यांना फोन केला. त्यांनी मला मोनोक्रोटोफॉस ३० मिली + निरमा ६ ग्रॅम + स्प्लेंडर १५ मिली याप्रमाणे फवारणी करण्यास सांगितले. त्यानुसार मी कपाशीवर फवारणी केली. त्यामुळे कपाशीवरील पिठ्या ढेकूण गेला. त्यानंतर मी लागवडीपासून ३० दिवसांच्या अंतरांनी दुसरी फवारणी घेतली. त्यामध्ये जर्मिनेटर १ लि. + कॉटनथ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + प्रिझम ७०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर २०० मिली + राईपनर ५०० मिली + २०० लि पाणी याप्रमाणे मी दुसरी फवारणी केली. त्याचबरोबर १०० लि. पाण्यातून १२:६१ विद्राव्य खत ३ किलो + १ किलो मॅग्नेशिअम + १६:१६:१६ हे १० किलो प्रती एकरी ३ वेळा सोडले. त्यानंतर कपाशीची वाढ पण चांगली होण्यास सुरुवात झाली व पात्या लागण्यास सुरुवात झाली. कपाशी खूप चांगली दिसत होती. त्यानंतर मी तिसरी फवारणी अॅसाटामाप्राईड २५० ग्रॅम + कॉटनथाईवर १ लि. + न्युट्राटोन ७०० मिली + राईपनर ७०० मिली + हार्मोनी ५०० मिली + स्प्लेंडर ४०० मिली अशाप्रमाणे तिसरी फवारणी केली. माझ्या कपाशी वर इतरांच्या कपाशी वरील प्लॉटपेक्षा कमी रोग व कीड, त्याचबरोबर जास्त हिरवीगार व झाडांचा घेर मोठा, उंची व्यवस्थित, झाडांचे स्टेम (खोड) चांगले असल्यामुळे भरपूर शेतकरी विचारपूस करण्यासाठी माझ्या शेतावर येवू लागले. मला हे सर्व शक्य झाले ते डॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळेच. आता माझी कपाशी खूप चांगली आहे आणि मी डॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळे मी भरपूर उत्पादन घेईल याची मला खात्री आहे. आता माझी कापूस वेचणी सुरू झालेली आहे. कापूस हा एकदम मऊ व जड स्वरूपाचा आहे. त्याचबरोबर कापसाचे बोंड हे पुर्णपणे उमललेले असल्यामुळे फडकी (नकटी) कापसाचे माझ्या प्लॉटवर प्रमाण फारच दुर्मिळ. कापूस हा पांढरा शुभ्र आहे. कमीत कमी एका झाडाला २५ ते ३० बोंडे फुटलेले तर ५० ते ६० बोंडे पक्की पुर्ण फुटण्याच्या अवस्थेत तर ९० ते १३० पर्यंत फुले व पात्या लागलेली आहेत. तसेच पुढे कपाशीला चांगली चाल आहे. मला एकरी आतापर्यंत १० ते १२ क्विंटल कापूस वेचणी झाली. यानंतरची वेचणी झाल्यानंतर एकूण जवळपास मला कमीत कमी एकरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन होईल अशी आशा आहे. सध्याच्या पीक परिस्थिती वरून वाटते त्यापेक्षाही जास्त कापूस होऊ शकतो. मला डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा खूप मोठा फायदा होत आहे आणि माझ्या भागात मी निश्चितच विक्रम करणार असे सांगतो. यानंतर या कापसावर पुन्हा कॉटन थ्राईवर + प्रिझम फवारून फरदड घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कपाशीच्या चांगल्या अनुभवातून टरबूज, खरबूज व मिरचीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

त्याचबरोबर मी माझ्या शेतावर मिरची या पिकावर पण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत असल्यामुळे माझ्या मिरची पिकावर अजूनपर्यंत बोकड्यासारखा रोग (व्हायरस) आलेला नाही. मला खूप अभिमान वाटतो की मी डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरात आहे. यानंतर मी डिसेंबर महिन्यामध्ये खरबुज आणि टरबुजची लागवड करत आहे. त्यामध्ये मी सुरूवातीपासून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निश्चय व निर्धार केला आहे. डॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळे मी चांगली यशस्वी खरबुज आणि टरबुजची लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्याचा प्रयत्न करील.

मला असे वाटते की, प्रत्येक शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरून आपले उत्पादन वाढवून स्वत: प्रगतीशील शेतकरी बनण्याचा मान आप - आपल्या भागातून मिळविला पाहिजे.