बीडच्या दुष्काळी भागात दर्जेदार भगवा

श्री. आत्माराम चंदनशीव,
मु.पो. हनुमंत पिंप्री, ता. केज, जि. बीड.
मो. ९८८१७१७७८८



आम्ही ७ एकरमध्ये भगवा डाळींबाची मार्च २०१४ मध्ये लागावाद केली आहे. जमीन मुरमाड मध्यम प्रतीची आहे. लागवड १४ x १० वर असून ठिबक केले आहे. या झाडांना वर्षभर पारंपारिक पद्धतीप्रमाणे सेंद्रिय व रासायनिक खते, औषधे वापरली. मात्र त्यानंतर आम्हाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाली.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची पुस्तके वाचली. त्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा अतिशय प्रभावी व प्रेरणादायक आहेत. प्रतिकुल वातावरण, पाऊस कमी - अधिक अशा परिस्थतीतही एकूण उत्पादन व उत्पादनाच्या दर्जाता वाढ झाल्याचे वाचण्यात आल्यावर आपणही या डाळींब बागेस डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरायचे ठरविले. त्यानंतर मी स्वत: डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, पुणे ऑफीस येथून व्यवस्थित फवारणीची माहिती घेतली. त्यानुसार फुलकळी लागतेवेळी ती चांगली निघावी, मादी कळीचे प्रमाण वाढून तिची गळ होऊ नये म्हणून ड्रेंचिंगसाठी जर्मिनेटर ५ लि. आणि फवारणीसाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम प्रत्येकी ५ लि., प्रोटेक्टंट ३ किलो, हार्मोनी २ लि. घेऊन गेलो होतो. त्याची फवारणी केली असता झाडे १ वर्षाची असुनही फुलकळी भरपूर लागून मादी कळीचे प्रमाण वाढले. ९० - ९५% कळीचे सेटिंग झाले. सेटिंग झाल्यानंतर पुन्हा थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. आणि हार्मोनी ४०० मिली २०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. झाडे लहान असूनदेखील फाद्यांमध्ये अन्नसाठा तयार झाल्यामुळे झाडांवर ५० ते ६० फळे धरलेली असतानाही फळांचे अतिशय चांगल्याप्रकारे पोषण झाले.

सध्या प्रत्येक झाडांवरील फळे साधारण २५० ग्रॅमची आहेत. तेव्हा या फळांचे पोषण होण्यासाठी, फळांना आकर्षक कलर, दाण्यांना कलर व गोडी येण्यासाठी आज (१० - १० - १५) थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी ५ लि. आणि फळांवर बुरशीजन्य स्पॉट येऊ नयेत म्हणून हार्मोनी ३ लि. घेऊन जात आहे.