जर्मिनेटर १००% यशस्वी म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा दूत!

श्री. गणेश साहेबराव सोळंके,
मु.पो. वांगी (बु.), ता. माजलगाव, जि. बीड - ४३११२८.
मो. ९७६७५६५५३१


मी एक सुशिक्षीत बेरोजगार तरुण होतो. काही काळ प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी केली. घरची शेती आहे. परंतु आपले स्वतःचे काही तरी असावे आणि शेतकऱ्यांची एक अडचण सोडवण्यासाठी म्हणून माझ्या घरच्या शेतामध्ये बळीराजा हायटेक नर्सरी या नावाने रोपवाटीका चालू केली. प्रथम शेतामध्ये बोअरवेल खोदले व त्यास मला जेमतेम पाणी आहे. सुरुवातीच्या काळामध्ये नर्सरी विषयी जास्त काही माहिती नव्हती. मग विचारपूस करून बरेच ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न केला. मग बियाणाला बीज प्रक्रिया करणे असो वा अन्य काही.

मी बियाणे लवकर उगवावे व जास्तीत जास्त उगवण क्षमता व्हावी या करिता बरेचसे अॅसिड, बुरशीनाशके वापरली, परंतु पहिजे तशी समाधानकारक उगवण क्षमता व रोपावरील पिवळेपणा काही कमी होईना. मग मला एके दिवशी सिरसाळा मार्केटमध्ये खरेदीसाठी आलो असता तेथे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी (अॅग्रो) प्रा. लि. चे प्रतिनिधी श्री. बुरंगे भेटले व त्यांनी मला. खात्रीपुर्वक डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी कंपनीचे जर्मिनेटर हे बीजप्रक्रिया करण्या साठी वापरण्याचा सल्ला दिला. मी सुरुवातीला ५०० मिली जर्मिनेटरची १ बॉटल घेतली व मिरची व टोमॅटोच्या बियाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे बीजप्रक्रिया केली. तर मला असा अनुभव आला की, मिरचीच्या बियाण्याची जवळपास ९८% उगवण झाली व उगवणीसाठी लागणारा कालावधीही कमी झाला. त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी रोपे ८ दिवसाचे असताना प्रतिलिटर पाण्यास ३ ते ४ मिली जर्मिनेटर घेऊन रोपांना वरून स्प्रिंकलर सारखे झारीने पाणी दिले. तर रोपांमध्ये पिवळसरपणा अजिबात दिसत नाही व रोपाची वाढ जोमाने होते. तसेच रोपांचा दांडा (स्टेम) मोठा व मजबुत झाल्याचे दिसते.

मी आता १००% बीजप्रक्रियासाठी जर्मिनेटरचा वापर करतो व इतर लोकांनाही ते करण्यास सांगतो. त्याच बरोबर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची अन्य उत्पादने थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोन हार्मोनी, स्प्लेंडर, कॉटन थ्राईवर, इ. ही मी उत्पादन वाढीसाठी माझ्या शेतामध्ये वापरत आहे.