कापसाचे पीक चांगले म्हणून हळद, लिंबोणी, संत्रा पिकास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर

श्री. रावसाहेब आश्रोबा जोरवर, मु.पो. हाटकरवाडी, ता. मानवत, जि. परभणी.
मो. ८६०५८४१६८


माझी हाटकरवाडी येथे ७५ एकर शेती आहे. त्यातील २ एकर शेतीत मी कापूस पीक घेतले व बाकीच्या शेतीत संत्रा, लिंबोणी, हळद, सोयाबीन हे पीक आहे. मी कापसाची व्हरायटी बायरची सरपास निवडली व मी त्याची लागवड ५.५' x १' वर केली. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे नाव मी ऐकून होतो आणि माझे दाजी यांनी मला टरबुजासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे दिली. माझा टरबुजाचा प्लॉट पुर्ण गेला होता. मात्र त्यावर मी सप्तामृत स्प्रे केला तर माझा टरबुजाचा गेलेला प्लॉट आला.

नंतर मी कापूस या पिकासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे सप्तामृत श्री. बालाजी अॅग्रो ट्रेडर्स, वडगाव (स्टे.) यांच्याकडून आणले व कापूस या पिकावर स्प्रे केला. स्प्रे केल्यानंतर दहा दिवसांतच मला माझ्या कापसात बदल वाटला. कारण लोकांच्या कापसात आणि माझ्या कापसात बराचसा फरक जाणवला, आज आमचे शिवारामध्ये पुर्ण कापूस लालसर व थ्रिप्सच्या प्रादुर्भावाने गेल्याचे दिसत असताना माझा प्लॉट अजुनही फ्रेश निरोगी आहे. तरी माझ्या मते सप्तामृतमुळे माझ्या कापसाचा एकरी उतारा १५ ते २० क्विंटल येईल अशी आशा वाटते. आज रोजी १५/१०/२०१६ मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी सय्यद फिरोज (मो. ९१६८२११३१६) त्यांच्याशी भेट झाली व मी आजपासून यांच्या मार्गदर्शनाखाली हळद, लिंबोणी, संत्रा या पिकाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरत आहे आणि मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की, एकवेळ अवश्य डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरा व प्रतिकूल परिस्थितीतही खात्रीशीर उत्पादन घ्या.