पपईतील आंतरपीक कलिंगड १।। लाख नफा, पपईचे २।। लाख अजून २५ टन मालाची अपेक्षा
श्री. भाऊसाहेब संपतराव निकस,
मु.पो. खिर्डी, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर.
मो. ८४२२९५९६८४
मी प्रथमच आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. माझ्याकडे १।। एकर क्षेत्रामध्ये पपई
तैवान ७८६ ह्या जातीची लागवड डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने करण्याचे ठरविले. सुरुवातीला
नांगरणी करून चांगले कुजलेले शेणखत ६ ट्रेलर व कल्पतरू ४ बॅग टाकून प्रथम वरंबा करून
ठिबक सिंचन व नंतर मल्चिंग पेपर टाकला. नंतर ६' x ५' अंतरावर पपई १३५० रोपांची १८ नोव्हेंबर
२०१५ ला लागवड केली व नंतर १।। फुटावर मल्चिंगला छिंद्र (होल) पाडून कलिंगडाची १४/१२/१५
ला लागवड केली. दोन्ही पिकाला मल्चिंग असल्यामुळे आणि सुरुवातीला जर्मिनेटरची आळवणी
केल्यामुळे पीक जोमदार होते आणी कलिंगडाला फवारणी करताना पपईवरही फवारणी होत होती. त्यामुळे
पपईच्या फवारणी खर्चात बचत झाली.
कलिंगडाला १५ ते २० दिवसांच्या अंतराने एकूण ३ फवारण्या डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या
केल्या. पहिल्या २ फवारण्यांनी पिकावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. तसेच वेलांची वाढ चांगल्याप्रकारे होऊन फुलकळीचे
सेटिंग चांगले झाले. त्यानंतर फळधारणा झाल्यावर थ्राईवर,
क्रॉपशाईनर सोबत राईपनर, न्युट्राटोन फवारल्याने फळांचे पोषण एकदम चांगल्या प्रकारे
झाल्यामुळे या १।। एकरातील आंतरपिकाचे २४ टन उत्पादन मिळाले. त्यातील १८ टन कलिंगड
१० रु. प्रमाणे विकले तर त्याचे १,८०,००० रु. झाले व लहान ६ टनाचे २०,००० रु. झाले.
तसेच कलिंगड खर्च वजा जाता १,५०,००० नफा मिळाला. पपईला सुरुवातीला कलिंगडासोबत फवारणी
होत होती आणि कलिंगड काढणीनंतर दर महिन्याला सप्तामृत फवारत होतो. त्यामुळे व्हायरस
रोगाचा प्रादुर्भाव अजिबात झाला नाही. ४ थ्या महिन्यातच फुलकळी लागून ५ - ६ व्या महिन्यात
फळधारणा सुरू झाली. या काळात फळांचे पोषण होण्यासाठी राईपनर व न्युट्राटोन फवारत होतो.
तसेच विद्राव्य खते ठिबकवाटे देत होतो. या सर्वांमुळे फळांचे पोषण अतिशय चांगले होऊन
पपई ऑगस्टमध्ये काढणीस आली व ३० सप्टेंबर पर्यंत ११ टन माल निघाला. भाव १२ रु. पासून
२५ रु./किलो पर्यंत मिळाले.
आता पर्यंत २,५०,००० रु. झाले असून अजून २५ टन माल निघण्याची अपेक्षा आहे. हे सर्व
डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे उत्पादन निघाले आहे. ही औषधे अमृता फर्टीलायझर यांच्याकडून घेतली.
तसेच या सर्व कामामध्ये भाऊ निकम आणि डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी श्री. बाळासाहेब कर्डीले (मो. ९६०३६९९२२८) यांची मोलाची साथ लाभली.