दारिद्र्याचा अंधार जाऊन पैशाचं चांदण पेरणारी चांदणी !

श्री. दत्तात्रय दयानंद कामठे (माजी सरपंच),
मु.पो. चांभळी, ता. पुरंदर, जि. पुणे.
मो. ९९२१०४८५५


आमची ५ गुंठे चांदणी फुलाची शेती आहे. गावात या फुलाच्या लागवडीस सुरुवात प्रथम आम्ही केली. हे फुल दिसण्यास फार आकर्षक, पिवळ्या रंगाची चांदणीसारखे असते. या फुलांमुळे वेण्या, हार शोभून दिसतात. त्यामुळे या फुलांना ८० ते १००, २०० रु./किलो पर्यंत भाव मिळतो.

शिमग्याला आम्ही चांदणीच्या काश्या (मुळ्या) लावतो. जमिनीत शेणखत अगोदर भरपूर टाकतो. काश्या फुटून आल्या की १।। महिन्याने तगरून घेतो/भर लावतो. त्यावेळी रासायनिक खत देतो.

मात्र याची वाढ जुनचा पाऊस व हवा चालू झाली की मग जोमाने होते. त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे फवारतो. पान कडसर असल्याने कीड लागत नाही. याचा पाला जनावरसुद्धा खात नाही. याला रोगराईदेखील (करपा) येत नाही.

वळीव पाऊस झाला की ही चांदणी दसऱ्यात चालू होते. वळवाचा पाऊस अलिकडे होत नाही. त्यामुळे उशीरा (ऑक्टोबर अखेरीस) चालू होते. दररोज ५ गुंठ्यातून ७० - ८० किलो चांदणी फुले मिळतात. ती शिमग्यापर्यंत चालते. ही फुले तोडण्यासाठी तासाला ४० रु. जमुरी देतो. २ तासात एक माणूस अथवा शाळकरी मुलगा ७ - ८ किलो फुले तोडतो. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंतच्या २ तासात फुले तोडून १० वाजेपर्यंत पुणे मार्केटला आणतो. सकाळी - सकाळी दहीवर असते. त्याने फुल ताजे, टवटवीत राहते. शिवाय ओलसर - पणामुळे वजन चांगले भरते. २३ किलो आज (१०/११/२०१७) वानोळा निघाला. ती ८० रु. ने गाळ्यावर ठेवल्या - ठेवल्या ताबडतोब विकली. या फुलांचा हार चांगला होतो. ५ - ६ दिवस फुले सुकत नाहीत. रासायनिक औषधांनी तात्पुरती फुले फुलतात. मात्र नंतर गुंडी मागच्यजुने काळी पडते. त्यामुळे आम्ही रासायनिक औषधे कधीच फवारत नाही. त्यासाठी आज झाडांचा फुटवा वाढून फुले जास्त लागण्यासाठी व गुंडी पोसण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर फवारणीस घेऊन जात आहे.