ढेमसे एक एटीएम पीक
श्री. सचिन गोविंद जाधव,
मु.पो. निमोणे, ता. शिरूर, जि. पुणे
२ वर्षापासून आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे टोमॅटो, ढेमसे, कांदा या पिकांवर वापरत
आहे. त्याचे रिझल्टही आम्हाला चांगले मिळत आहेत. या तंत्रज्ञानाने उत्पादन खर्च कमी
येऊन हमखास उत्पादन मिळत आहे. टोमॅटोचे एकरी ३० ते ३५ टन उत्पादन आम्ही घेतले आहे.
तर कांदा एकरी १५ ते १८ टन काढला आहे त्याचबरोबर ढेमस्याचे पिके देखील उत्तम येते.
चालूवर्षी २५ सप्टेंबर २०१७ ला १।। एकरमध्ये महिको कंपनीच्या ढेमस्याची लागवड ४' x १' वर केली आहे. जमीन मध्यम प्रतीची आहे. ढेमसेच्या बियाला जर्मिनेटरच्या प्रक्रियेमुळे तिसऱ्या दिवशी कोंब दिसतात. तर ४ - ५ दिवसात पुर्ण १००% उगवण होते. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या १० - १२ दिवसाला फवारण्या करत असतो. त्यामुळे वातावरण बदलले तरी त्याचा विपरीत परिणाम पीक वाढीवर व उत्पादनावर होत नाही. लागवडीनंतर ४० दिवसात तोडे चालू होतात. दिवसाड तोडा करतो. तोड्याला २० किलोची ४० क्रेट (८०० किलो) माल निघतो. तोडणीला ७ - ८ माणसे लागतात. कारण पाल्याखालील माल चापासून काढावा लागतो. तोडणी दिवसभर करतो. तोडलेला माल लगेच सावलीत आणून ठेवतो. संध्याकाळी गाडी भरून पुणे, वाशी मार्केटला पाठविला जातो.
सध्या (१० नोव्हेंबर १७) मुंबईला ७० - ८० रु/ किलो भाव मिळत आहे. पुणे मार्केटला आज (१० नोव्हेंबर २०१७) ४० ते ५० रु. किलो भाव मिळाला आहे. आतापर्यंत ४ तोडे झालेत. अजून महिनाभर तोडे चालतील. महिन्याभरात १५ ते १६ तोडे होतात. आतापर्यंत २।। टन मालाचे सरासरी ४० रु . भावाने १ लाख रु. झालेत. अजून ५ - ६ टन माल निघेल. याला सरासरी ३० - ४० रु. भाव मिळाला तरी अजून १।। ते २ लाख रु. होतील. या पिकाला मल्चिंग, ठिबक, खते, बियाणे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या असा एकूण एकरी ५० - ६० हजार रू. खर्च येतो. यामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांवरील खर्च ५ - ६ हजार रु. होतो.