दरवर्षीपेक्षा १५ हजार रू. खर्च कमी येउन १००० पेटी अधिक दर्जेदार द्राक्षोत्पादन
श्री. संजय कृष्णा माळी, (B.Sc.Physics) मु. पो. तासगाव, जि. सांगली.
मोबा. ९२७२५०७९००
गेल्यावर्षी उन्हाळ्यामध्ये इंद्रा ढोबळी मिरचीची लागवड एक एकरमध्ये केली होती. जमीन
भारी काळी आहे. माल (तोडे) चालू झाल्यानंतर १ महिन्यांनी आम्हाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची
माहिती मिळाली. त्यावेळी माल कमी निघत असल्याने सप्तामृत औषधांची फवारणी केली तर माल
वाढला. अगोदर तोड्याला १ टन निघणारा माल फवारणीनंतर २ ते २.५ टन निघू लागला. मालाला
चमक येऊन फळांचे वजन वाढले. तसेच अगोदर झाडांची काही प्रमाणात मार होत होती ती थांबली.
पहिल्या फवारणीचा उत्तम रिझल्ट मिळाल्यानंतर पुढील फवारण्या घेतल्या. दरवर्षी ढोबळी
करतो ती २॥ महिने चालते. मात्र या तंत्रज्ञानाने ३॥ महिने चालून एकरात २६ टन उत्पादन
मिळाले.
या अनुभवावरून द्राक्षाला डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरायचे ठरविले. सोनाका द्राक्षाचे एक एकर (१००० झाडे) व पाऊण एकर (७५० झाडे) असे दोन प्लॉट आहेत १९९९ ची बावर पद्धतीच्या मांडवावर लागवड ७' x ५' वर आहे. जमीन काळी आहे. या बागांची १५ ऑक्टोबरपुर्वी छाटणी पुर्ण करून पेस्टमध्ये जर्मिनेटर चा वापर केला. त्याने डोळे एकावेळी, एकसारखे फुटले. नंतर जर्मिनेटर, थ्राईवर ची फवारणी केल्याने शेंडा वाढ जोमाने होऊन पानांची कॅनॉपी वाढली. नंतर पहिल्या डिपींगला जी. ए. २० पीपीएममध्ये जर्मिनेटर ३ मिली प्रति लि. वापरले. घडांच्या पाकळ्या वाढून घडांचा आकार वाढला. विशेष म्हणजे या अवस्थेत द्राक्ष प्लॉट पाण्यात बुडाल्याने दुसरा डीप घेता आला नाही. अशा परिस्थितीत इतरांच्या बागेतील घड गळ, मणीगळ होत होती. मात्र आम्ही सुरुवातीस डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केल्याने घडगळ, पाकळीगळ झाली नाही. बाग १०० % सुरक्षित होती. पुढे पाकळी व्यवस्थित सेट झाल्यामुळे थिनिंगची गरज भासली नाही. पाकळीची लांबी वाढल्याने घडांची साईज मिळाली. पुढील फवारण्या वेळापत्रकाप्रमाणे घेतल्याने मण्यांचे पोषण झाले.
७५० झाडांपासून ३२०० पेटी माल निघाला. जागेवरच ६५ रू. पेटीस (४ किलो) भाव मिळाला. त्यामुळे माल पॅकिंग, वाहतूक भाडे, कमिशन असा कोणताच खर्च लागला नाही. या प्लॉटपासून २ लाख रू. झाले दुसऱ्या प्लॉटमध्ये १००० झाडांपासून ४००० पेटी दर्जेदार माल मिळाला, तोही ६५ रू. पेटीप्रमाणे जागेवरून गेला. त्याचे २॥ लाख रू. झाले.
माल काढणीस उशीरा झाला तरी साद अजिबात झाली नाही. यापुर्वी दरवर्षी पाने तांबडी पडत असत, मात्र यावर्षी एकही पान तांबडे दिसत नाही. शेवटपर्यंत पाने हिरवीगार होती. दरवर्षी एकरी ५०,००० रू. खर्च येतो. त्यापासून ३००० पेटी उत्पादन मिळायचे. यावर्षी ३५,००० रू. खर्च करून ४००० पेटी माल मिळाला. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने दरवर्षीपेक्षा एकरी १५ हजार रू. खर्च कमी व १००० पेटी जादा उत्पादन मिळाले. त्यामुळे पुण्याला आज (२१ एप्रिल २००८) खरबुज विक्रीसाठी आणले होते, तेव्हा सरांना भेटण्यासाठी आलो आहे. चालू वर्षी लागवड करत असलेल्या ढोबळीला सरांच्या सल्ल्याप्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.