१८ वर्षाच्या जुन्या बागेवर सनबर्नचा अटॅक नाही

श्री. अंबादास म्हसु कांदळकर, मु.पो. खेडे उगाव, ता. निफाड, जि. नाशिक


मी मागील ६ वर्षापासून डॉ. बावसकर सरांच्या तंत्रज्ञानाचा द्राक्ष बागेसाठी वापर करीत आहे. मागील वर्षी थ्राईवर उत्पादनांचा वापर केला नव्हता.

या वर्षी मी परत वापरण्याचे ठरविले. सोनाका १॥ एकर व थॉमसन ३० गुंठे या दोन्ही बागेसाठी एकंदरीत आतापर्यंत ४ फवारण्या व डिपींगमध्ये वापर केला. माझ्याकडील जुन्या १८ वर्षापूर्वीच्या ३० गुंठे थॉमसन प्लॉटसाठी थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे फवारण्य केल्या.

आज (१० जानेवारी २००८ ) रोजी १०७ दिवसांनी (छाटणीपासून) बाग झाला आहे. या काळातील छाटणी केलेल्या इतरांच्या द्राक्ष बागेवर सनबर्नचा अटॅक सर्वत्र मोठ्या प्रमाणात झाला व सर्वांच्या घडांचे बरेच नुकसान झाले. माझ्या या बागेत शेंडा कमी असताना तसेच बागेत खोडे कमी असल्याने (झाल्याने) उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात बसतो. ओलांडे बरेच निकामी झाले आहेत. आज रोजी फुगवण १८ एम. एम. साईज आहे. दोन फवारण्या ६ दिवसांच्या अंतराने थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे ११ ते १८ डिसेंबर २००७ दरम्यान खराब वातावरण होते. त्यावेळेस केल्या. त्यामुळे माझा हा जुना बाग सनबर्नपासून वाचला. संपूर्ण तालुक्यात सनबर्नमुळे अर्ध्याहून अधिक द्राक्ष घड निकामी झालेले असताना माझे घडांवर एकसुध्दा मणी सनबर्नचा नाही. घडांची संख्या ५० ते ६० प्रत्येक वेलीवर आहे.

माझ्या १॥ एकर सोनाका बागेसाठी वरीलप्रमाणे फवारण्या केल्या. पंधरा दिवसापूर्वी तिसरी डिपींग केली. मण्यांना शाईनिंग अप्रतिम व फुगवण चांगली मिळाली. पाणी उतरण्याच्या (२० ते ३०%) अवस्थेत पाने तजेलदार हिरवीगार आहेत. घडांची संख्या ५० पर्यंत आहे. भूरी रोगाचा प्रादुर्भाव अजिबात नाही.