लागणीपासून ८ महिन्यात एकरी १५ टन द्राक्ष उत्पादन
श्री. वसंतराव शिवाजी माळी, मु. पो. रेठरे हारणाक्ष , ता. वाळवा, जि. सांगली
प्रथम द्राक्ष करण्याचे ठरले नव्हते. डिसेंबरमध्ये ऊस तुटल्यावर ५ जानेवारीला खड्डे
करून नर्सरी लावली. नाशिकहून काड्या आणून लावली. पण ती यशस्वी होते की नाही याची शंका
होती. तेव्हा जर्मिनेटर २ मिली प्रती लि. पाण्यातून ३ दिवस दररोज घातले. जर्मिनेटर
+ थ्राईवर + क्रॉंपशाईनर प्रत्येकी ४ मिलीप्रमाणे दिले. १ एप्रिलला ओलांडे तयार होऊन
१५ जूनला बाग एकसारखी तयार झाली. एप्रिल छाटणीनंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची वेळापत्रका
प्रमाणे फवारणी घेतली. तेव्हा १३ ते १४ काड्या १५ जूनला तयार झाल्या. मांडव ६॥' उंच
आहे. १० लि. पेस्टला ३५० मिली जर्मिनेटर वापरले. नंतर माहितीपत्रकाप्रमाणे फवारणी केली.
त्यामुळे शॉर्टबेरीज, वॉटरबेरीज, क्रॅकिंग, सनबर्न झाले नाही. तसेच मण्यांना रंग व
गोडी एकसारखी आल्यामुळे बाग पाहण्यासाठी कुंडल, मिरज, तासगाव, मणेराजुरी येथील अनेक
बागायतदारांनी भेट दिली. ८ महिन्यात १५ टन उत्पादन निघाले. सांगलीचे प्रतिनिधींनी चांगले
मार्गदर्शन केले.