द्राक्ष -एप्रिल छाटणी

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


एप्रिल छाटणी अवस्थ:

१) काडी निर्मिती व शेंडा वाढ

२) डोळ्यात सुक्ष्म घडांची निर्मिती

३) सुक्ष्म घडांची वाढ

४) सुक्ष्म घडांची स्थिरता

५) डोळ्यांची सुप्त अवस्था व काडीची पक्वता

या प्रत्येक अवस्थेचा कालावधी ४ ते ५ आठवड्याचा असतो आणि एकून कालावधी ५ ते ६ महिन्याचा झाल्यावर छाटणी केली जाते.

१)काडी निर्मिती व शेंडा वाढ :

९ ते १० पानांवर शेंडा येईपर्यंत ही पहिली अवस्था असते व ती महिनाभरात पूर्ण होते.

२) डोळ्यात सुक्ष्म घडाच्या निर्मितीस आरंभ होतो. काडीवरील ५ ते ६ व्या डोळ्यात व ही क्रिया काडीच्या बुडाकडील तसेच शेंड्याकडील १० ते १२ डोळ्यापर्यंत चालू राहते. ह्या अवस्थेत आणखी एक महिना जातो.

३ ) ह्यानंतर डोळ्यातील सुक्ष्म घडांच्या वाढीस आरंभ होता ह्याच अवस्थेत घडाचा आकार, घडातील मणीसंख्या घडाचा पोट इत्यादी ठरत असतो. हा कालावधी महिन्याभराचा असतो.

४ ) ह्या पुढील महिन्याभारच्या काळात तयार झालेले सुक्ष्मघड स्थिर होतात.

५) त्यानंतर अखेरच्या टप्प्यात डोळे सुप्तावस्थेत जाऊन काडी तयार होते. म्हणजे पक्व होते. या अवस्था या क्रमाणेच घडून येतात.

काड्या १२ पानावर येताच ७ व्या डोळ्यावर खुडल्या पाहिजेत व तेथून निघालेली सबकेन परत ९ पाने राखून (१२ पानावर आल्यावर) खुडली पाहिजे. याचाच अर्थ एक काडीवर किमान १६ डोळे वाढविले पाहिजेत (कमाल २० डोळे) तसेच काडीवरील सर्वाधीक सक्षम व स्थिरावलेले क्र. ५, ६, व ७ व्या डोळ्यातील सुक्ष्म घडावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या डोळ्यातील सुक्ष्म घडाचे त्यापुढील अनुक्रमे ११, १० आणि ९ पानापासून पोषण होते. त्यामुळे येथीलच घड पुढे वजनदार बनू शकतात. यापेक्षा कमी पानावर व कमी काळ पोसणारे सुक्ष्म घड हलके बनतात.

एप्रिल छाटणीनंतर संजिवकांचा व पोषक द्रव्यांचा वापर:

क्र.   एप्रिल छाटणीनंतरचा कालावधी   संजिवकांचा वापर   पोषणद्रव्यांचा वापर  
१   ४ ते ५ आठवडे   युरॉसिल ५० ppm   प्रिझम २५० मिली + जर्मिनेटर २५० मिली / १०० लि. पाणी  
२   ६ ते १० आठवडे   लिहोसिन ५०० ppm   थ्राईवर ३०० मिली + क्रॉंपशाईनर ३०० मिली / १०० लि. पाणी  
३   ११ ते १५ आठवडे   ६ BA १०० ppm   थ्राईवर ३५० मिली + प्रोटेक्टंट २०० मिली / १०० लि. पाणी  
४   १६ ते २० आठवडे   कायनिन ५ ppm   थ्राईवर ४०० मिली + क्रॉंपशाईनर ४०० मिली / १०० लि. पाणी  
५   २१ ते २४ आठवडे   अॅट्रीनाल ५० ppm  न्युट्राटोन ५०० मिली + राईपनर ५०० मिली / १०० लि. पाणी  
खते : जमिनीमध्ये अतिसुक्ष्म थर (microfine layer ०.००१ mm) असल्याने पोकळी वाढते व त्यामुळे जमिनीत टाकलेल्या खताचे रूपांतर सॉईल सोळूशनमध्ये होताना केशाकर्षक मुळ्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण होते. काळ्या जमिनीमध्ये निचरा चांगला होतो. रेताड, हलकी, खोली कमी असलेली माळरानाची जमिन किंवा जेथे दुष्काळ आहे त्यावेळी जमिनीतील मातीचे कण विस्कळीत झालेले असतात. त्याठिकाणी चिकणमाती, पोयटा (silt) अतिबारीक वाळूचे कण यांना एकत्र जुळवून आणण्याचे काम करणे, म्हणजे सॉईल क्रम्ब (Soil Crumb ) व्यवस्थितरित्या तयार होऊन एरव्ही जमिनीतून दिलेले पाणी झपाट्याने निचरा (percolation) होऊन जाते व केषाकर्षक मुळ्यांच्या टप्प्यातून पाणी सरकते व मुळ्यांना अन्नघटक घेणे अवघड होते. व वाढ खुंटते. पानांवर, फळांवर विकृती येते. नेमके याच परीस्थितमध्ये 'कल्पतरू' सेंद्रिय खत रामबाण उपाय ठरते.
एप्रिल छाटणीनंतर (किलो / हेक्टर)
दिवस   नत्र   स्फुरद   पालाश   Mgso4   सेंद्रिय खत  
१ - ३०   ७२   ६०   -   -   -  
३१ - ६०   २४   ९०   १९   २३   (१५० कि . कल्पतरू खत)  
६१ - ९०   -   ६०   ५६   २२   (१५० कि . कल्पतरू खत)  
९१ -१२०   -   -   १९   -   (१५० कि . कल्पतरू खत)  
टिप :वरील खत माती परिक्षण करूनच धावे. परीक्षणानुसार खताचा वापरामध्ये बदल करावा.

सबकेन : एप्रिल छाटणीनंतर आलेल्या फुटींची संख्या कमी असल्यास किंवा वाढ एकसारखी नसल्यास सबकेन करणे योग्य असून ते पाण्याच्या उपलब्धतेनुसार ठरवावे. पाणी कमी असल्यास (एप्रिल - मे) सबकेन करणे टाळावे.

अशावेळी मेनकेनवर काड्यांची संख्या ठरवावी.

सबकेन करण्यासाठी वेलीवरील जोमदार फुटी ६ पानांवर येताच शेंडा खुडावा. सबकेन करताना एकूण काड्यांपैकी निम्म्याच काड्या ठेवाव्यात. सबकेन झाल्यानंतर खरड छाटणीनंतर लिहोसीन, ६ बी. ए., युरॅसिल, थ्राईवर, क्रॉंपशाईनरच्या फवारणीमुळे गर्भधारणा व्यवस्थित होते, तसेच एप्रिल छाटणीनंतर वेळापत्रकाप्रमाणे फवारण्या घेतल्यावर वेलीमध्ये राखीव अन्नसाठा तयार होतो.

खरड छाटणीनंतर १५ ते २० दिवसात सबकेन फुटते व छाटणीनंतर ६५ ते ७० दिवसांत तयार होते. ऑक्टोबर छाटणीनंतर सबकेन वरील पोंगा जाड निघतो. सबकेन घडाचा जोर असतो. त्यामुळे सबकेन करणे गरजेचे असते.

ऑक्टोबर छाटणी वेळेवर किंवा अगोदर मिळण्यासाठी 'सबकेन' हे निर्यातीच्या दृष्टीने योग्य आहे.

परंतु आवश्यकता भासल्यावरच सबकेन करावी. त्यासाठी योग्य संजीवकाचा वापर करावा. जास्त प्रमाणात संजीवकाचा वापर केल्यास (Excessive hormones ) वाढतात. त्यामुळे संजीवकाचा वापर परिस्थिती असेल त्याचवेळीच करावा.

मेनकेन : मेनकेनवरील माल कमी व साधारण प्रतीचा मिळण्याची शक्यता असते, परंतु पाणी कमी असल्यास पर्यायाने मेनकेनवर माल धरावा लागतो.