डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मिळवून दिलेले, दर्जेदार अधिक द्राक्ष उत्पादन

प्रत्येक वर्षी दर्जेदार काडी व डोळे तयार होऊन घडांची साईज मोठी मिळते

श्री. मैला बगावान, मु. पो. कवळापूर, ता. मिरज, जि. सांगली


मी माझ्या बागेस ७ वर्षापासून पूर्ण डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत असून त्याचा एप्रिल व ऑक्टोबर छाटणीस अतिशय चांगला परिणाम दिसून येतो. उत्पादनात वाढ होऊन दर्जेदार उत्पादन मिळते.

एप्रिल छाटणी करिता माहिती पत्रकानुसार जर फवारणी वेलेवर केली तर आपणास खालील फायदे मिळतात.

१) ओलांडे न वळता पुर्ण व लवकर फुटतात.

२) काडी भरपूर व एकसारखी निघते त्यामुळे योग्य ती काडी ठेवता येते.

३) डोळे मोठे असल्याने घडांची साईज चांगली मिळते.

४) पाने कमकुवत होऊन गळत नाहीत. त्यामुळे ऑक्टोबर छाटणी आपणास केव्हाही घेता येते.

५) काडी पुर्ण पिकली गेल्याने घड निर्मिती चांगली होऊन घडाची साईज चांगली मिळते.

६) वेली सशक्त व निरोगी राहतात. तसेच खोडात अन्नसाठा भरपूर तयार होतो. असे अनेक फायदे एप्रिल छाटणीस मला मिळाले.