वेळापत्रकाप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी तसेच हार्मोनीच्या फवारण्या चांगल्याच लाभदायक लोकल मार्केटलाही भाव उत्तम

श्री. भाऊसाहेब रखमाजी नाठे, मु. पो. पाडे, ता. दिंडोरी, जि. नाशिक.
मोबा. ७५८८१९४९८१


क्षेत्र- ६ एकर, छाटणी तारीख - ११ सप्टेंबर २०१०

माझ्याकडे एकंदरीत ७ एकर द्राक्षबाग आहे. ५ एकर थॉमसन ९ x ६' वर तर सोनाका २ एकर ९ x ५' वर लावलेली आहे. सुरुवातीला जर्मिनेटरचा वापर पेस्टमध्ये केला. त्याने बाग एकसारखा फुटला. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा एकंदरीत ६ फवारण्या व २ डिपींगमध्ये जर्मिनेटर व न्युट्राटोनचा वापर केला. पोंगा अवस्थेत थ्राईवर १ लि. क्रॉंपशाईनर १ लि., न्युट्राटोन १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्यामुळे घड अणकुचीदार निघाले, जिरले नाही. वरील फवारणीनंतर द्राक्ष बाग ३ ते ४ पानांवर असताना पुन्हा वरील फवारणी केली. नंतर घडांची विरळणी करून निरूपयोगी काड्या काढून टाकल्या. वरीलफावारण्यांमुळे पावसाळी वातावरण असूनही पानांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढली. पाने सुद्दढ, निरोगी व रुंद मिळाली.

पहिल्या डिपींगमध्ये जी. ए. सोबत जर्मिनेटरचा (५ मिली) वापर केल्यामुळे घडांना पाकळ्या सुटल्या. सोनाका द्राक्षबागांमध्ये मण्यांना लांबी मिळाली. द्राक्ष बाग फुलोर्‍यात असताना थ्राईवर १ लि., क्रॉंपशाईनर १ लि. + हार्मोनी ३०० मिलीची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्याने डावणी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव झाला नाही. जुन्या पानांवर व शेंड्यावरील कोवळ्या पानांवर असलेला काही प्रमाणातील डावणी पुर्णत: जळाला.

द्राक्षबाग छाटणीच्यावेळी सुपर फॉस्फेट ५० किलोच्या ४ बॅगा व डी. ए. पी. १ बॅग, मॅग्नेशियम ७५ किलो, बोरॉन २० किलो, पोटॅश २५ किलो/ एकरी दिले होते.

वारील फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी थ्राइवर १ लि., क्रॉंपशाईनर १ लि. हार्मोनी ३०० मिली. न्युट्राटोन १ लि. चा २०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्यामुळे पाकळ्या सुटसुटीत मिळून पाकळीमध्ये मर झाली नाही. मण्यांची सेटिंग झाली. या फवारणीनंतर दुसर्‍या डिपींग मध्ये जी. ए. सोबत जर्मिनेटर व न्युट्राटोन प्रत्येकी ५ मिली/ लि वापर केला.

द्राक्षमणी शेंगदाण्याच्या आकाराचे असताना थ्राईवर, क्रॉंपशाईनर,न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. २०० लि. पाण्यातून फवारले. भुरी, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. सनबर्न टाळला गेला. क्रॅकींग, वॉटर बेरीज, शॉर्टबेरीज, पिंकबेरीज या विकृतींवर मात करून थॉमसनमध्ये १६ ते १८ एम. एम. साईज मिळाली. त्याचबरोबर टनेज सापडले. सोनाकामध्ये मण्यांना लांबी मिळाली. थॉमसनमध्ये एकरी १२५ क्विंटल तर सोनाकामध्ये ९० क्विंटल उत्पादन घेता आल. थॉमसन ला ३२०० रू. तर सोनाकाला ३५०० रू. / क्विंटल भाव लोकल मार्केटला मिळाला.