द्राक्षावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
उडद्या भुंगेरा : ही कीड तपकिरी रंगाची असून पंखावर काळे ठिपके असतात. विशेषत:
दोन्ही छाटणीनंतर येणाऱ्या नवीन कोवळ्या फुटीवर ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात
आढळतो. संपूर्ण शेंडे पोखरून कोंब नष्ट होतात.
जीवन क्रम : या किडीची मादी वेलीच्या सालीखाली पुंजक्यात २० ते ३५ अंडी घालते. अंडी पिवळ्या रंगाची लांब व निमुळती असतात. अळी मातकट पांढरी असते. ती पुर्ण वाढ होईपर्यंत जमिनीत जाऊन मुळावरील साल खाऊन उपजिवीका करते. ३५ दिवसात अळीची पुर्ण वाढ झाल्यावर ७ ते ११ दिवसात अळी मातीचा कोष करून राखाडी रंगाची होते. उडद्या भुंगेरा ७ - ८ महिने जगतो. डिसेंबर ते मार्च या महिन्यात भुंगेरा सालीखाली सुप्तावस्थेत राहतो. ह्या किडीचा प्रादुर्भाव अधिक तापमान व कोरडी हवा असल्यास अधिक जाणवतो. विशेषत : रात्रीच्या वेळी द्राक्षावर हे भुंगेरे हल्ला करतात.
उपाय : १) वेलीच्या खोडावरील साल काढून सफेदी लावणे म्हणजे उडद्यास बसण्यास जागा मिळणार नाही.
२ ) वेलीच्या खोडावरील तसेच ओलांड्यावरील सुटलेली साल काढून वेळ स्वच्छ करावेत. म्हणजे डिसेंबर ते मार्च या काळात उडद्या किडीच्या भुंगेर्यांना सुप्तावस्थेत लपण्यास जागा राहणार नाही.
३) द्राक्ष बाग स्वच्छ ठेवावी. ४) प्रादुर्भाव दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 'कृषी विज्ञान' केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार किटक नाशकांचा वापर करावा.
फुलकिडे (थ्रिप्स ) : रिपीफोरोथ्रिप्स क्यूयेर्टेटस' व 'शिरटोथ्रिप्स डॉंरसॅलीस': द्राक्षावरील ही एक महत्त्वाची कीड असून त्यामुळे द्राक्षमण्यांवर 'स्कॅब फॉर्मेशन' होते. त्यामुळे द्राक्ष निर्यातक्षम रहात नाहीत.
पूर्ण वाढ झालेले फुलकिडे लहान काळसर पंख व त्यावर लहान लहान केस असतात. मादी जास्त काळसर तपकिरी व नर पिवळे असतात. पिल्ले तांबडसर असतात. ही कीड द्राक्षाबरोबर इतरही पिकांवर उपद्रव करत असते. उदा. आंबा डाळींब, गुलाब, पेरू इ.
पुर्ण वाढ झालेले फुलकिडे व पिल्ले ही पानांचा भाग फुलांचा मण्यांचा नाजूक भाग खरवडतात व मण्यांच्या जखमेतून बाहेर पडणारा रस शोषतात, परिणामी पाने भुरकत पांढरी आणि जखम झाल्यासारखे चट्टे दिसतात. यामुळे पानांचे शेंडे वाकडे होतात, फुले गळतात. द्राक्ष मण्यांवर तपकिरी ठिपके दिसतात.
जीवनक्रम : या किडीमध्ये सेक्स्युअल व पार्थिनोजेनिटक प्रजोत्पादन होते, अंडी पानांच्या पेशीमध्ये घातली जातात. अंडी ३ ते ८ दिवसांत उबविली जातात. पिलांचा काळ १० ते १२ दिवसांचा असतो. कोषावस्था जमिनीत २ ते ५ दिवस असते. नर २ ते ६ दिवस तर मादी १८ ते २० दिवस असतात. या किडीच्या जीवनावस्था १४ ते ३३ दिवसात पूर्ण होते. वर्षात एकूण ५ ते ८ जीवनावस्था होत असतात. थंडीच्या काळात हि कीड कोषावस्थेत जमिनीत असते. उन्हाळ्यात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
फुलकिडीचे व्यवस्थापन :
१) सर्वप्रथम बागेत स्वच्छता ठेवावी, गवत नसावे, उन्हाळ्यात खोलवर नांगरणी करावी. म्हणजे किडींचे कोष नष्ट होतील. नत्रयुक्त खते योग्य प्रमाणातच द्यावीत व बागेला पुरेशे पाणी देणे अपेक्षित आहे .
२) जैविक किटकनाशके बव्हेरिया बसीयाना किंवा व्हार्टीसिलीयम लॅकेनी ५ मिली किंवा प्रोटेक्टंट ५ ग्रॅम प्रति लि. पाण्यातून फवारावे.
३) क्रायसोपर्ला कार्नियासारखे परोपजीवी किटक बागेत सोडल्यास थ्रिप्सचा प्रादुर्भाव कमी करता येतो.
पिठ्या ढेकूण (मिली बग) : गेली ७ - ८ वर्षापासून पिठ्या ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव द्राक्ष बागेमध्ये मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. या किचीच्या अंगावर मेणचट कापसासारखे चिकट पदार्थाचे आवरण असते. ही किड वेलीच्या सालीखाली फांद्याच्या जोडावर पानांच्या खालच्या बाजूस नवीन फूट ज्या ठिकाणी निघते अशा ठिकाणी आणि घडांच्या आतील बाजूस राहत असल्यामुळे तसेच अंगावर पांढरे वरण असल्याने फवारणी केलेले औषध सहजासहजी पोहचू शकत नसल्याने एकात्मिक पद्धतीने पिठ्या ठेकाणाचे नियंत्रण करणे जरूरीचे आहे.
किडीची ओळख व जीवनक्रम : या किडीच्या मादीचे शरीर अंडाकृती, सपाट आणि मऊ असते व शरीराचा रंग लालसर असतो. शरीरावर पांढऱ्या पदार्थाचे अवरण असते. मादी सैलसर कापसासाराख्या पुंजक्यात ५०० पर्यंत अंडी एका आठवड्यात घालते. अशा पुंजक्यात ५०० पर्यंत अंडी एका आठवड्यात घालते. अशा पुंज्कायांना 'अंड्याची पिशवी' म्हणतात. ही पिशवी मेणचट, चिकट पदार्थाच्या अवरणाने बनलेली असल्यामुळे फवारणीचे औषध अंड्यापर्यंत जात नाही. ही अंडी अंडाकृती, नारंगी रंगाची असतात व ती उघड्या डोळ्यांची दिसतात. या अंड्यातून संथपणे सरपटणारी नारंगी ते विटकरी लाल रंगाची पिल्ले ५ ते १० दिवसांनी बाहेर पडतात व ती वेलीच्या ओलांद्यावर विशेषत: वाढ होत असलेल्या कोवळ्या भागावर तळ ठोकतात. या बाल्ल्यावस्थेमध्ये पांढऱ्या रंगाचे अवरण नसते. त्यामुळे या अवस्थेमध्ये पिठ्या ढेकणावर किटकनाशकाचा योग्य परिणाम होऊ शकतो. मिलीबग्जची मादी पिल्ले तीन वेळा तर नर पिल्ले चार वेळा कात टाकतात. बाल्यावस्था २० ते २१ दिवसांची असते. मादीच्या प्रौढावस्था १७ - १८ दिवसात पुर्ण होते. ही कीड जून ते ऑगस्ट आणि नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत जास्त कार्यक्षम असते.
नुकसानीचा प्रकार : पिठ्या ढेकूण व त्याची पिल्ले खोडाच्या सालीखाली पानांच्या खालील बाजूस पानांचे देठ, कोवळ्या फुटीच्या शेंड्यातून आणि मण्यांतून रसाचे अविरत शोषण करतात. त्यामुळे त्यांची वाढ खुंटते. या किडीच्या शरीरातून चिकट गोड पदार्थ वाहेर पडतो. त्यामुळे पानांची कर्बग्रहण शक्ती कमी होऊन वाढ खुंटते. सर्वात अधिक नुकसान द्राक्ष घडांचे होते. मण्यातून रस शोषण केल्यामुळे गोडीचे प्रमाण कमी होते आणि चिकट पदार्थामुळे मण्यांवर काळी बुरशी वाढते. अशा घडांना बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने अतोनात नुकसान होते.
पिठ्या ढेकणाचे एकात्मिक नियंत्रण :
१) ऑक्टोबर छाटणीनंतर छाटलेल्या काड्या बांधावर न टाकता जाळून नष्ट कराव्यात.
२) बागेशेजारी मिलीबग्जला पुरक अशी झाडे उदा. सिताफळ,पेरू, डाळींब, गीरीपुष्प लावू नयेत.
३) खोड व ओलांड्यावरील सुटलेली / मोकळी झालेली साल काथ्याने / गोणपटाने खरवडून काढावी.
४) छाटणीनंतर लगेच वेलीवर कॉपर ऑक्सीक्लोराईड ४० ग्रॅम + कार्बारील ५० % प्रवाही ६० ग्रॅम + ड्रायक्ळोरोव्हॉस ३० मिली + १० मिली स्टिकर + १० लि. पाणी याप्रमाणे चोळावे. अथवा गेरू ३०० ग्रॅम + कार्बारील ५० % प्रवाही ६ ग्रॅम + ड्रायक्ळोरोव्हॉस ३ मिली प्रती लिटर पाण्यामध्ये घेऊन खोड तसेच ओलांड्यांना मुलामा द्यावा. छाटणीनंतर लगेच मिलेथिऑन ५० % प्रवाही ३० मिली अथवा निंबोळी अर्क ४ % यांच्या १० ते १२ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून दोन फवारण्या कराव्यात
५) छाटणीनंतर मिलीबग्जग्रस्त काड्या लागवडीसाठी वापरू नयेत.
६) मिलीबग्जची पिल्ले जमिनीकडून वेलीवर येत असल्यामुळे पत्येक वेलींच्या खोडाजवळ कुदळणी करून कार्बारील १० %, २० ग्रॅम प्रती वेळ अथवा मिलॅथिऑन २० ग्रॅम या प्रमाणात मातीत मिसळावी. म्हणजे पिल्ले वेलीवर येऊ शकणार नाहीत. तसेच उडद्या भुंगेर्यांच्या अळ्यांचाही नायनाट होईल.
७) पिठ्या ढेकण्याची पिल्ले जमिनीतून वेलीवर येत असल्यामुळे खोडावर, बांबूवर तसेच लोखंडी अँगल्सवर (ट्रॅक ट्रॅप) चिकटपट्ट्या लावाव्यात.
८) फलधारणा झाल्यानंतर तसेच हवेतील आर्द्रता ६० ते ६५ % आणि तापमान २५ डी. सें. च्या खाली असताना मिलीबग्जचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्हटीशिलीयम लेकाणी ३ ग्रॅम प्रती लि. पाणी + दूध ५ मिली या प्रमाणात १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात.
९) घडांच्या दोन्ही बाजूस ओलांड्यावर ५ सें. मी. अंतरावर स्टीकी बँड लावावेत, यामुळे मिलीबग्जचा प्रादुर्भाव घडांवर होणार नाही.
१०) मण्यांमध्ये पाणी उतरल्यानंतर मिलीबग्जचा प्रादुर्भाव बदल्यास क्रिप्टोलीमस मॉन्टोझायारी हे परोपजीवी भुंगेरे २- ३ प्रती वेळ अथवा १५०० भुंगेरे प्रती हेक्टरी या प्रमाणात बागेत सोडावेत. भुंगेरे सोडण्यापुर्वी ८ दिवस अगोदर कोणत्याही किटकनाशकाची फवारणी करू नये. परत २१ दिवसांनी हे भुंगरे सोडावेत. हे परोपजीवी भुंगेरे मिलीबग्जची अंडी, अळी तसेच प्रौढावस्था या सर्व अवस्था खावून परत करते.
११) फेबुर्वारी महिन्यात सुरुवातीस मिलीबग्जचा प्रादुर्भाव जास्त असेत तर क्लोरोपायरिफॉस २५ मिली किंवा डायक्लोरोव्हॉस २० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. द्राक्षाची काढणी अगोदर दोन महिने कोणत्याही रासायनिक किटकनाशकाची फवारणी करू नये.
लाल कोळी : लाल कोळी ही कीड लांबट गोल आणि पांढरे फिकट पिवळे अथवा तांबूस रंगाचे असतात. त्यांच्या शरीराचे दोन भाग असून छाती व डोके हा पुढील भाग आणि पोट मागील भागात येते. कोळी किडीची तोंडाची रचना सुईसारखी असून ही कीड वनस्पतीच्या पेशीमध्ये तोंड खुपसून त्यातील पेशीद्रव्याचे शोषण करते. त्यामुळे द्राक्षाच्या पानांवर, फळांवर पांढुरके चट्टे पडतात. पुढे हे चट्टे पिवळसर तपकिरी होतात. विशेषत : कोवळ्या फुटीवर पानांवर या किडीचा प्रादुर्भाव होत असतो. प्रादुर्भाव वाढल्याने संपूर्ण झाड मरगळल्यासारखे दिसते. पानांच्या मागील (खालच्या) भागावर अगदी बारीक तांबूस ते पांढरा थर दिसतो. पुढे ही पाने तपकिरी होऊन वाळून जातात. पानांच्या पृष्ठभागावर जाळी करून त्याखाली राहतात. पानांवरील जाळी काढतात असंख्य लहान - मोठे लाल कोळी पानांवर सैरावैरा धावताना दिसतात. आर्थिकदृष्ट्या जास्त हानिकारक कीड असल्याने वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असते.
उपाय :
ही कीड पानांच्या खालील भागावर जाळी करून राहत असल्याने किटकनाशकांची फवारणी करत असताना ते औषध किडीपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे नियंत्रण करणे अवघड जाते. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बेलपत्रकाप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घ्याव्यात.
सूत्रकृमी (निमॅटोड) : सूत्रकृमी ही कीड अतिसूक्ष्म व धाग्यासारखी लांबट असून ती जमिनीत राहते. त्यामुळे तिचे होणारे दुष्परिणाम लवकर लक्षात येत नाहीत.
ही कीड मुळातील रस शोषून घेत असल्याने मुळांवर गाठी तयार होताते. त्यामुळे पिकला जमिनीतून अन्न शोषण करण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी वेलीची वाढ खुंटते. पाने पिवळी पडतात. त्यांचे पोषण होत नाही. त्यामुळे उत्पादनात २० ते २५ % पर्यंत घट येते.
या किडीचा प्रादुर्भाव विशेषत: जमिनीत ठिबक सिंचनामुळे सतत जर ओल असेल तर मोठ्या प्रमाणात भेडसावते. तसेच द्राक्षावर त्याचा जमिनीत पुन्हा द्राक्षपिक घेतल्यास, सूत्रकृमीग्रस्त रोपे लावल्यावर ही समस्या उद्भवते.
किडीची ओळख : सूत्रकृमी ही कीड अतिसुक्ष्म लांब घाग्यासारखी डोळ्याने सहज न दिसणारी असल्याने ती सुक्ष्मदर्शकाखाली पहावी लागते. या किडीची लांबी ०.२ ते ०.५ मि. मी. असते. ही कीड जमिनीतील मातीच्या कणांच्या पोकळीत वास्तव्य करत असून जगण्यासाठी तिला सतत ओलावा व पिकाची जरुरी असते. ती पिकांच्या मुलाच्या अंतर्गत भागात किंवा मुळाच्या सानिध्यात राहून आपल्या सुईसारख्या अतिसुक्ष्म अवयवाने मुळातील रस शोषून घेत असते. किडीचा प्रादुर्भाव विशेषता: ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात अधिक जाणवतो.
उपाय : १) द्राक्ष लागवडीपुर्वी जमीन चांगली २ - ३ वेळा नांगरून घ्यावी. उन्हाळ्यात जमीन चांगली तापू द्यावी. म्हणजे सूर्याच्या उष्णतेने वेगवेगळ्या अवस्थेतील सूत्रकृमी मरून जातात.
२) द्राक्ष पिकावर पुन्हा द्राक्षपीक घेऊ नये.
३) द्राक्ष लागवडीपुर्वी ज्वारी, बाजरी, मका, मोहरी, गहू, झेंडू, अशी पिके घ्यावीत. मात्र टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, वाटणा, वाल ही पिके घेऊ नयेत.
४) नवीन लागवड करण्यासाठी आणलेल्या काड्या सुत्रकृमी विरहीत बागेतील असाव्यात.
५) द्राक्षरोपे तयार करताना माती किंवा जमिन सुत्रकृमी विरहीत असावी.
६) वाफ्यात काड्या लावण्यापुर्वी मातीत निंबोळी पेंड एकरी ५०० किलो द्यावी. रोपांच्या पिशव्या भरतानाही मातीमध्ये निंबोळी पेंडीचा वापर करावा.
७) सुत्रकृमी प्रतिकारक रूट स्टॉंकची लागवड करून त्यावर उत्पादनाच्या दृष्टीकोनातून निवडलेल्या जातीची कलमे करावीत. (त्याकरीता रुटस्टॉंक लागवडीचा लेख पहावा.)
खोड कीड : पौढ कीड ही वेळीच्या खोडाला व ओलांड्याला चिर पाडते व अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेल्या आळ्या सरळ खोडामध्ये व ओलांड्यामध्ये शिरकाव करतात व खोडामध्ये जाऊन बीळ करतात. खोडावर व ओलांड्यावर अतिशय लहान छिद्रे निदर्शनास येतात. अधिक प्रादुर्भाव झाल्यास खोडाची भुकटी छिद्रातून खाली पडलेली आढळते.
नुकसानीचा प्रकार : खोडकिडीचा प्रादुर्भाव झालेल्या वेलीची पाने पिवळी पडतात नंतर ती वळून खाली पडतात. वेलीवरील घड सुकतात, मण्यांचा आकार कमी राहतो पक्वता येत नाही. साधारणपणे ५ सेमी व्यासाच्या खोडावर या किडीचा प्रादुर्भाव होतो. जमिनीपासून ६ इंच उंचीवर त्याची तीव्रता अधिक असते. खूप तीव्र नुकसान झाल्यावर इजा झालेला वरील भाग पुर्णपणे कोसळतो.
हंगामी प्रादुर्भाव - खोड किडीचा प्रादुर्भाव नोव्हेंबर ते एप्रिल या दरम्यान होतो. ज्या बागेभोवती स्क्रण तसेच इतर वनस्पतींचे जंगल (झाडे) किंवा बागेमध्ये तणे आहेत, तेथे या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो,
खोड कीड व्यवस्थापन :
१) खोडावरील मोकळी साल काढून आय.आय.एच. आर. मिश्रणामध्ये ( १ मिली निमऑईल + १ मिली डिंक + ६ ग्रॅम कार्बारील + १० ग्रॅम कॉपर ऑकझीक्लोराईड + १० ग्रॅम प्रोटेक्टंट) घेऊन खोडावर पेस्ट लावावी.
२) अॅल्युमिनीयम फॉस्फाईडची आर्धी गोळी प्रत्येक छिद्रामध्ये टाकावी, म्हणजे खोडामधील अळी मधल्यामध्ये मरून जाईल.
३) पेट्रोल किंवा कार्बनडायसल्फाईसं किंवा मेथील ब्रीमाईड १ मिली प्रति छिद्र याप्रमाणे तारेच्या सहाय्याने बोळा छिद्रात घालून छिद्र मातीने किंवा साबणाने बंद करावे.
४) बागेमधील ब बागेभोवतालच्या तणांचा नायनाट करणे तसेच छिद्रामध्ये डायक्लोरोव्हॉस या किटकनाशकांचे इंजेक्शन देणे.
५) ड्रीपद्वारे ज्या बागेला पाणी व्यवस्थापन केले आहे तेथे वेलीचे खोड ओले होणार नाही याची दक्षता घ्यावी.