डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने द्राक्ष एक्सपोर्ट लुधियाना (पंजाबला) रवाना
श्री. बन्सीधर सोनू मुळे, मु. पो. मांजरवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे
द्राक्षबागेकरिता नेहमी फक्त सेंद्रिय खतच वापरतो. वरखते अजीबात वापरत नाही. डॉ.बावसकर
टेक्नॉंलॉजीचे कल्पतरू सेंद्रिय खत एकरी २०० किलो इतर सेंद्रिय खताबरोबर वापरले असता
वेलींचा जारवा चांगला वाढला. पांढरी मुळी वाढली, त्यामुळे वेलीला अन्नद्रव्ये व्यवस्थित
घेता आले. तसेच वेलीवर (पानांच्या काडीवर) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचे स्प्रे
घेतले असता,इतर औषधांच्या फवारण्यामध्ये बचत झाली. इतका रिझल्ट मिळाला. भुरी, डावणी
या रोगांना अटकाव झाला. १ ते २% इतके अत्यल्प प्रमाण होते. सप्तामृतातील प्रोटेक्टंट
वापरले असता किडीचा प्रादुर्भाव कमी झाला. थ्राईवर, क्रॉंपशाईनर वापरल्याने झान्थोमोनस,
करपा शेवटपर्यंत कंट्रोलमधेच होता. विशेष म्हणजे या औषधामुळे वेलीत रोगप्रतिकारक शक्ती
जबरदस्त वाढली. एका एकरात १२ टन दर्जेदार माल निघून यातील ६ टन माल एक्स्पोर्ट झाला
व राहिलेला माल लुधियान (पंजाब) ला पाठविला. पिंकबेरीज चे प्रमाण कमी झाले. शॉर्ट बेरीज,वॉटर
बेरीज, क्रॅकिंग, स्कॉर्चिंग अजिबात जाणवले नाही. या सर्व अनुभवामुळे मी नेहमी करीत
असलेल्या वांगी, झेंडू, गुलाब, मोगरा, मिरची, बटाटा या पिकांनीही सप्तामृताचे फवारे
वेळापत्रकाप्रमाणे घेत आहे.