गैरमोसमी पावसात द्राक्षबागेचे संरक्षण व उत्पादन

श्री. विजय नारायण उगले, मु. पो. लोखंडेवाडी, ता. दिंडोडी फोन - (०२५५७) २७०९३०


मी गेल्या ३- ४ वर्षापासून बावसकर सरांची औषधे वापरत आहे. मी द्राक्षे बागेसाठी ही औषधे छाटणीपासून वापरली, तर झाडांनी भरपूर अन्नसाठा तयार केल्याने घडांची फुगवण चांगली झाली. पानांची साईज वाढून पाने व घड पाऊस पडून देखील खराब झाले नाहीत. तसेच सनबर्न, शॉर्टबेरीज, वॉटरबेरीज, पिंकबेरीज, घड करपणे, पाने पिवळी पडणे यासारख्या विकृती दिसल्या नाहीत. तसेच आमच्या बागेमध्ये पाणी उतरण्याच्या वेळेस या औषधांचे दोन फवारे जादा घेतल्यामुळे आश्चर्यकारक २ ते ३ मिमी मण्यांमध्ये वाढ झाली. मी आपली औषधे वापरून १८ ते २० मिमी अशी फुगवण मिळविली.आपली ही टेक्नॉंलॉजी २१ व्या शतकात शेतकर्‍यांचे जीवन समुद्ध करणार आहे, यात काही शंका नाही. कारण काही दिवसापुर्वी ५ ते ६ दिवस ढगाळ वातावरण होते, त्यामुळे पाऊस येण्याअगोदर सर्व द्राक्ष बागेस प्रत्येकी दीड लि. क्रॉंपशाईनर, राईपनरचे २०० लि. पाण्यातून फवारे घेतले तर शरद सिडलेस, सोनाका यांच्यात १०० % पाणी उतरले होते व माणिक चमण ६० % पाणी उतरले होते. ११ जानेवारी २००३ रोजी मुसळधार पाऊस झाला जवळजवळ सर्व बागेतून पाणी वाहिले होते. नंतर बागेचे दुसर्‍या दिवशी निरीक्षण केले असता कोठेही तडे गेलेले दिसले नाही व कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. हे केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे शक्य झाले. इतर शेतकर्‍यांच्या बागांवर तडे जाऊन त्यांचे ४० ते ५०% नुकसान झाले. या अनुभवावरून आम्ही दरवर्षी या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे.