हार्मोनीच्या फवारण्याने डावण्या दुसर्‍या दिवशीच नियंत्रणात, घड शेवटपर्यंत चांगले

श्री. माने रविंद्र शिवाजी, मु. पो. सावर्डे, ता. तासगाव, जि. सांगली


क्षेत्र - २ एकर, जात - शरद व सोनाका

छाटणी तारीख - १ सप्टेंबर २०१०

छाटणी झाल्यापासून कोसाईड , इलियेट, कॅब्रिटॉंप, सेक्टीन, अँट्रोंकॉल या औषधांचे आम्ही सुरूवातीपासून पहिल्या टप्प्यात स्प्रे घेतले, परंतु वातावरण खराब असल्यामुळे डावण्या वाढतच राहिला. तेवढ्यात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे पाटीलसाहेब भेटले. त्यांनी हार्मोनी वापरण्याला सल्ला दिल. नंतर आम्ही ते उपलबद्ध करून फवारले. त्याचा दुसर्‍या दिवशीच रिझल्ट मिळाला. हार्मोनी दिड मिली / लिटर वापरल्यामुळे डावणीची बुरशी जाग्यावर थांबून जे पांढरट डाग होते, ते जागेवरच काळे पडायला सुरुवात झाली. ज्या घडांच्या बंचवर डावणी आला होता, तो तेथेच थांबता आणि घड शेवटपर्यंत आहे तसे राहिले. पानेसुद्धा शेवटपर्यंत काळोखी असलेली व जाड राहिली.