हार्मोनीमुळे डावण्या कंट्रोल, पानांवर काळोखी

श्री. बाळासो जगन्नाथ झांबरे, मु. पो. डोंगरसोनी, ता. तासगाव, जि. सांगली.
मोबा. ८८०६१९७२५०


क्षेत्र- ६ एकर, छाटणी तारीख - ११ सप्टेंबर २०१०

माझ्या सोनाका बागेत डावणी हा रोग असताना मी हार्मोनी औषधाचा वापर केला. त्यामुळे बागेतील डावण्या चांगल्याप्रकारे कंट्रोलमध्ये आला. हार्मोनीबरोबर कॅपटॉंप मिसळले, मात्र त्यामुळे स्क्रॉचिंग आले, म्हणून नंतर हार्मोनी १५० मिलीमध्ये झेड ७८,१०० ग्रॅम मिसळले, त्याने डावणी या रोगाचे नियंत्रण झाले. हार्मोनी मुळे पानांवर चांगल्याप्रकारे काळोखी आली.