घडांच्या देठाला डावण्या तरी खालच्या पाकळ्या, मणी व्यवस्थित बेदाणा उत्तम हार्मोनी, सप्तामृताने

श्री. संतोष धोंडीराम जाधव, मु. पो. दहिवडी, ता. तासगाव, जि. सांगली.
मोबा - ९७६६८०८१४२


क्षेत्र - २ एकर, जात - क्लोन,

छाटणी तारीख - १४ ऑगस्ट २०१०

मणी सेटिंगच्यावेळी द्राक्षघडावर जवळपास ४० ते ५० टक्के डावणी रोग आल होता. त्यातच वातावरण खराब होते. महागडी औषध मारूनही रोग आटोक्यात आल नाही. बाग सोडून देण्याची वेळ आली होती. हार्मोनीची जाहिरात पाहून शेवटचा पर्याय म्हणून हार्मोनीचा वापर केला. दुसऱ्या दिवशी काडी , घड व पानावरील आलेला डावण्या तांबूस पडताना दिसला. नंतर एक दिवसच्या अंतराने पुन्हा हार्मोनी चा २ मिली / १ लि. प्रमाणे वापर केला. आश्चर्य म्हणजे घडाच्या देठाला डावण्या असूनसुद्धा त्या घडाच्या खालच्या पाकळ्या व मणी अगदी व्यवस्थित तयार होऊन त्याचा उत्तम क्वॉलिटीचा बेदाणा तयार झाला. तसेच या औषधाने डावण्या आलेली जागा करपून न जात फक्त तांबूसच पडली. त्यामुळे पानाची क्रिया चालूच राहिली. बाग सोडून देण्याची अवस्था असताना सुद्धा चागली द्राक्षे मिळाली. शेतकऱ्यांनी इतर महागडी औषधे फवारण्यापेक्षा हार्मोनी हे स्वस्तात व खात्रीशीर औषध म्हणून वापरावे.