जुन्या बागेची वाढ निरोगी व घड समाधानकारक
श्री. सुधाकर त्र्यंबक संधान, मु. पो. साकोरे, ता. निफाड, जि. नाशिक.
मोबा.
९२२६४५९६५०
मी ५ ते ६ वर्षापासून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर फवारणीतून व ऑक्टोबर छाटणीत पेस्टमधून
करीत आहे. माझ्याकडे एकूण २० एकर द्राक्ष बाग आहे. जुन्या शरद सिडलेस २ एकर बागेची
छाटणी १५ सप्टेंबर २००८ रोजी केली. पेस्टमध्ये हायड्रोजन सायनामाईड ३० लि. पेस्ट +
१ लि. जर्मिनेटर असा वापर केला. उर्वरित थॉमसन बाग ऑक्टोबरमध्ये टप्याटप्याने छाटल्या.
थॉमसनसाठी फुलोर्यात बाग असताना थ्राईवर १ लि. व क्रॉंपशाईनर १ लि. + २०० लि. पाणी
याप्रमाणात फवारणी व मागील १० दिवसापुर्वी (जानेवारी २००९ च्या पहिल्या आठवड्यात) पाणी
१० ते २०% उतरल्यानंतर वरीलप्रमाणे फवारणी केली. यामध्ये न्युट्राटोन १ लि. चा (थ्राईवर
व क्रॉंपशाईनरबरोबर ) वापर केला. आज रोजी थॉमसनची ११ ते १३ एम. एम. साईज आहे. फ्लॉवरींग
स्टेजमधील फवारणीमुळे घडापुढे १० ते १२ पाने मिळाली. डाऊनी मिल्ड्यू, भुरी इतरांच्या
तुलनेत कमी होतो.
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीअगोदरचा ३०% कलर हा ६०% ते ७० % आला.
शरद सिडलेससाठी छाटणीपासून फक्त दोनच फवारण्या करता आल्या. कलर येण्यासाठी क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे ०३ /०१/२००९ रोजी म्हणजे छाटणीनंतर १०२ दिवसांनी फवारणी केली. फवारणीपुर्वी बागेत फक्त ३० % कलर होता. तर फवारणीनंतर ३ दिवसांनी (०६ / ०१/२००९) ६० ते ७० % कलर आल्याचे जाणवले. शरद सिडलेस द्राक्षास काळा कलर येण्यास सुरुवात झाली. दुसरी फवारणी ०९/ ०१/२००९ रोजी केली. आज रोजी छाटणीनंतर ४ महिने पुर्ण झाले आहेत. पुर्णपणे काळा कलर येऊन घडांना टणकपणा व शाईनिंग आली आहे. आमच्या बागेतील अनुभव पाहून आमच्याच गावातील श्री. रामराव बबेराव बोरस्ते यांनी त्यांच्या शरद सिडलेस १ एकरसाठी क्रॉंपशाईनर व राईपनरच्या दोन फवारण्या घेतल्या. आमच्या शरदच्या बागेत डाऊनी रोग घडात घुसला होता. बहुतांशी घडांवर त्याचा प्रादुर्भाव झाला होता. तो या फवारण्यांनी कमी झाला. सध्या झाडांवर ५० ते ६५ घड असून साईज १६ ते १८ एम.एम. आहे.