डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सातत्याने वापर केल्याने पावसात द्राक्षबाग वाचून इतर औषधांवरील खर्चात बचत

श्री. अनिल लाड, मु.पो. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली


आमची द्राक्ष बाग ४ वर्षापुर्वी आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी योग्य वेळी वापरली. त्यामुळे वातावरण अतिशय खराब होते, तरी त्याचा विपरीत पाहिणाम पिकावर झाला नाही. रोगाचे प्रमाण फार कमी होते. त्यामुळे पिकाचे नुकसान झाले नाही. पाने अतिशय चांगली रुंदी व मोठी होती. पानांना काळोखी आली. थंडी जास्त असूनही शेंडा ताठ चालला. घडाच्या पाकळीत पुर्वीपेक्षा जास्त वाढ झाली. त्याचप्रमाणे मण्यांची साईज एकसारखी आहे. बाग वाचली. फुलोरा फार कमी प्रमाणात गळला. जी. ए. चा वापरा कमी केला. एका एकरासाठी १०० P. P. M. चा वापर केला गर्डलिंग केले नाही. मालास कलर चांगल आला. मण्यावर दुधी डस्टर आले. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरली, त्यामुळे बुरशीनाशके व किटकनाशके फारच कमी लागली. औषधे शेतकर्‍यांना अतिशय उपयोगी (फायद्यात आणणारी) आहेत. ही औषधे सर्व शेतकर्‍यांनी वापरली पाहिजेत, असे मी अनुभवावरून सांगत आहे.