द्राक्ष नवीन लागवड - महिनावार करावयाची कामे

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


१) जानेवारी : करावयाची कामे : लागवड पूर्ण करणे (लागवडीतील अंतर ६' x ४', ७' x ५' , ८' x ६' ठेवावे. )

पीक संरक्षण : काडी लावणार असाल तर जर्मिनेटरच्या द्रावणात भिजविणे किंवा लागवडीनंतर ड्रेंचिंग करणे, ड्रेंचिंगमध्ये बोर्डो किंवा ट्रायकोड्ररर्मा घेतल्यास सड होणार नाही.

पोषण : लागवडीनंतर जर्मिनेटर २५ मिली + थ्राईवर २५ मिली + प्रिझम २५ मिली + क्रॉंपशाईनर २५ मिलीची १० लि. पाण्यातून फवारणी घेणे. तसेच कल्पतरू सेंद्रिय खत + २० : २० :०, २३:२३:० मुळाशी देणे.

२) फेब्रुवारी : करावयाची कामे : नांगे सांधणे (मर झालेल्या ठिकाणी दुसरे झाड लावणे)

पीक संरक्षण : जर्मिनेटर ३० मिली + थ्राईवर ३० मिली + क्रॉंपशाईनर ३० मिली + प्रोटेक्टंट १५ ग्रॅम + निमार्क फवारणे.

पोषण : स्लरी (शेण ५० किलो + गोमुत्र १० लि. + गुळ ३ कि. + पाणी ७० लि. ) २ - ३ दिवस रापवून द्यावी आणि १९: १९: १९ किंवा १२ :३२: १६ खत द्यावे.

३) मार्च : करावयाची कामे : बांबू रोवणे, वेळ बांधणे, मांडव उभारणी करणे.

पीक संरक्षण : थ्राईवर ४० मिली + क्रॉंपशाईनर ४० मिली + रिडोमिल किंवा बुरशीनाशक + किटकनाशक (गरजेनुसार) १० लि. पाण्यातून फवारावे.

पोषण : अमोनियम सल्फेट ५० किलो किंवा मॅग्नेशियम १० किलो/ एकरी खोडाजवळ मातीत मिसळून द्यावे.

४) एप्रिल : करावयाची कामे : दोन बाजूस ओलांडे राखणे, ओलांड्यांचा शेंडा ७ पानावर खुडणे.

पीक संरक्षण : थ्राईवर ४० मिली + क्रॉंपशाईनर ४० मिली + राईपनर ३० मिली + किटकनाशक + बुरशीनाशक १० लि. पाण्यातून फवारणे. (टिप: - वाढ जास्त असल्यास लिहोसिन ५०० P. P. M. फवारणे)

पोषण : स्लरी व त्यात जर्मिनेटर १ लि. एकरी देणे २० : २०: ० एकरी ५० किलो किंवा १२ :३२ : १६ ५० किलो द्यावे.

५) मे : करावयाची कामे : ओलांड्यावर काड्या राखणे प्रत्येक ओलांड्यावर ५ ते ७ काड्या ठेवणे, काड्याची सबकेन करणे, त्यासाठी पानावर शेंडा मारणे.

पीक संरक्षण : थ्राईवर ५० मिली + क्रॉंपशाईनर ५० मिली + राईपनर ३० मिली + बुरशीनाशक + किटकनाशक (गरजेनुसार घेणे) + युरॅशिल फवारणे.

पोषण : कल्पतरू सेंद्रिय खत ५० किलो आणि निंबोळी पेंड १५० किलो एकरी देणे.

६) जून : करावयाची कामे : सबकेनचा शेंडा ७ पानावर मारणे.

पीक संरक्षण : १० पीपीएम ६ बीएची फवारणी करणे, बोर्डो मिश्रण फवारणे.

पोषण : एकरी ५० किलो सल्फेट ऑफ पोटॅश द्यावे.

७) जुलै : करावयाची कामे : काड्याचे निरीक्षण करा आणि काड्या चांगल्या पोसल्या नसतील तर १०% काड्या काढून टाका.

पीक संरक्षण : राईपनर ५० मिली प्रति पंप ( १२ ते १६ लि. पाणी) किंवा न्युट्राटोन ५०० मिली + क्रॉंपशाईनर ५०० मिली + पाणी १०० लि. किंवा बोर्डो फवारणे.

पोषण : १३ :० :४६ हे खत ५०० ग्रॅम / १०० लि. पाण्यातून द्यावे.

८) ऑगस्ट : करावयाची कामे : नवीन शेंडे / फूटी वाढत असतील तर काढून टाका. वेलीवरील काड्या पाने व्यवस्थित राखा.

पीक संरक्षण : क्रॉंपशाईनर ५०० मिली + बुरशीनाशकाची फवारणी १०० लि. पाण्यातून घ्यावी.

पोषण : हिरवळीचे पीक गाडून ऑक्टोबर छाटणीची तयारी करावी.

टीप : १) गरजेनुसार किंवा परिस्थिती पाहून बुरशीनाशक व किटकनाशकाची फवारणी घ्या.

२) जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर,प्रिझम, न्युट्राटोन औषधासोबत M- ४५ व कुमान वापरू नये कारण औषध फुटते.

३) खताची मात्रा आपली जमीन व पिकाची आवश्यकता बधून द्यावी.

४) वरील औषधे वापरासंबंधी अधिक माहितीसाठी आमच्या 'कृषी विज्ञान' केंद्रातील प्रतिनिधींशी संपर्क साधावा.