द्राक्ष नवीन लागवड - रिकटींगनंतरची निगा
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
१) फेब्रुवारी : पोषणासाठी: रिकट घेण्याअगोदर २५ किलो नत्र आणि जर्मिनेटर १
लि. प्रति एकरी ड्रिपमधून द्यावे. रिकट घेतल्यानंतर नत्र १ किलो + ५०० ग्रॅम १९: १९:
१९ प्रति एकरी ड्रिपमधून दिवस आड ७ ते ८ वेळा द्यावे.
पाणी : आवश्यकतेनुसार पाणी चालू ठेवावे.
पीक संरक्षण : भुरी, केवडा, करपा व किडींपासून संरक्षण करणे.
मशागत इतर कामे : शेंड्याची वाढ सुरू झाल्यावर एकच शेंडा ठेवणे व प्लॅस्टिक दोराच्या सहाय्याने वर बांधणे.
२) मार्च : पोषणासाठी : २० : २० : ० - ५० किलो, किंवा अमोनियम सल्फेट ५० किलो आणि MgSo4 , १० Kg एकरी द्यावे.
पाणी : या महिन्यात पाण्याचे प्रमाणत थोडे जास्त ठेवावे.
पीक संरक्षण : केवडा, फुलकिडे, मावा यांपासून संरक्षण करावे.
मशागत इतर कामे : एका ठिकाणी दिन शेंडे असतील तर तेथे एकच ठेवावा, त्यालाच तारेपर्यंत व्यवस्थित वाढवावा.
३) एप्रिल: पोषणासाठी : १२ :३२ :१६ -५० किलो किंवा स्लरी सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त + जर्मिनेटर १ लि. प्रति एकरी द्यावे.
पाणी : यावेळी ऊन जास्त असल्यामुळे पाणी भरपूर द्यावे.
पीक संरक्षण : शेंडा खाणारी व पाने गुंडाळणार्या आळीपासून संरक्षण करावे.
मशागत इतर कामे : ओलांडा कसा तयार करायचा याकडे लक्ष द्यावे.
४) मे / जून : पोषणासाठी : कल्पतरू १५० किलो २०: २०:० -५० किलो प्रती द्यावे. द्रवरूप खतातील नत्र मे महिन्यानंतर बंध करावे. पण १९:१९:१९ दिवसाआड १ किलो प्रती एकरी ठिबकमधून द्यावे.
पाणी: नियमित पाणी द्यावे.
पीक संरक्षण : आळी, भूरीपासून संरक्षण करणे. २०० पी.पी.एम. लिहोसिनचा १ फवारा देणे.
मशागत इतर कामे : वाय (Y) आकाराचा ओलांड्याचा शेंडा खुडून ह्या महिन्यात तेथे ७ पानावर शेंडा खुडावा.
५) जुलै / ऑगस्ट : पोषणासाठी : काडीला पक्वता येण्यासाठी एकरी ५० किलो सल्फर ऑफ पोटॅश द्यावे. ड्रिपद्वारे ० : ० : ५० - १ किलो दररोज द्यावे.
पाणी: पावसाचा अंदाज बघून पाणी द्यावे .
पीक संरक्षण : भुरी, केवडा, करपा रोगांपासून संरक्षण करणे. २५० पी.पी. एम. लिहोसिनच्या दोन फवारण्य १० दिवसाच्या अंतराने करणे किंवा राईपनर ५०० मिली १०० लि. पाण्यातून फवारणे तसेच दोन फवारणी दरम्यान एक फवारणी युरासिलची करावी.
मशागत इतर कामे: सब केनचा शेंडा ५ पानावर खुडून शेंडा वाढ नियमित ठेवावी.