निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन असे असावे
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
द्राक्षाचे भारतातील सरासरी उत्पादन ४० ते ५० टन हेक्टरी असून जगातील द्राक्ष उत्पादन
सरासरी दहा टन हेक्टरी असल्याने तसेच आपल्या द्राक्ष उत्पादनापैकी निम्मे उत्पादन सीडलेस
द्राक्षाचे असून दर्जा चांगला असल्याने निर्यातीस भरपूर वाव आहे. परंतु फक्त पाच टक्के
द्राक्षे निर्यात होतात. ही निर्यात वाढविण्यासाठी गुणवत्ता, दर्जा व उत्पादन यांचा
समतोल साधून निर्यातक्षम द्राक्ष - उत्पादन करताना खालील गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत.
१) घडांचा आकार - सर्व घडांचा आकार एकसारखा असला पाहिजे .
२ ) घडांचे वजन - घड समान वजनासे अंदाजे ३९० ते ४०० ग्रॅम वजनाचे असावेत.
३) मणी - सर्व मणी एकसारखे वाढलेले पाहिजेत.
४) रंग - सोनेरी पिवळा रंग असावा.
५) चव - आंबट गोड, मधूर असावी.
६) टवटवीतपणा - ताजी व टवटवीत द्राक्षे दिसली पाहिजेत
७) टिकाऊपणा - द्राक्षांमध्ये टिकाऊपणा असला पाहिजे
कोठे, कशी द्राक्षे लागतात : निर्यातीमध्ये येणाऱ्या अडचणी, विविध देशांना होणारी निर्यात व भारतीय बाजारापेथापेक्षा परदेशात दीड ते दोनपट जास्त किंमत मिळू शकते. लंडन बाजारपेठेत फ्लेम सिडलेस वाणास सर्वाधिक ७५ ते ८० रू. बाजारभाव मिळतो. नेदरलेंड लंडन, दुबई, यु. के. या परदेशी बाजारपेठेत द्राक्षांना (थॉम्पसन) कमीत कमी २० % Brix व १८ ते २० एम. एम. साईज तसेच द्राक्ष मण्यांना दुधी कलर हवा असतो. अर्थात निर्यातीसाठी विविध चाचण्या (Residue Nil, Analysis Report, phyto Sanitary Certificate ) पार पाडाव्या लागतात. हॉलंडसाठी हवी असलेली प्रतवारी कमीत कमी १६ ते १८ एम. एम. साईज असला तरी Brix २० % असावी लागते. फिकट कलर (पिवळा) असला तरी चालतो. अशा द्राक्षांना दर ३५ ते ४० रू. प्रति किलो मिळतो.
निर्यातयोग्य जाती - प्रामुख्याने थॉम्पसन सीडलेस व तास - ए - गणेश ह्या दोन जाती निर्यात केल्या जातात. अलिकडे किसमीस चोर्नी (शरद सीडलेस) ही द्राक्षे निर्यात केली जात आहेत.
निर्यातीच्या दृष्टीने शक्यतो तीन ते सात वर्षापर्यंत चीच बाग निवडावी. द्राक्ष उत्पादनासाठी जमीन उत्तम दर्जाची, निचरा होणारी तसेच दिले जाणारे पाणी क्षारविरहित असावे.
द्राक्षाच्या दर्जासाठी एका चौरस फुटात एक काडी व एक घड हवा. घडाच्या पाळल्या व मणी मोकळे हवेत. आकार व संख्या नेमकीच असावी. द्राक्षघडात कुठलीही विकृती नसली पाहिजे. संजीवकाचे प्रमाण पंधरा पीपीएम पेक्षा जास्त नसावे. जी. ए., सी. सी. सी. , बी. ए., सीपीपीयु यांचा नियंत्रीत वापर हवा. जी. ए. सीपीपीयु जादा वापरल्यास साल जाड होते. दर्जाच्या दृष्टीने घडाचा आकार, वजन, गोडी, विद्राव्य पदार्थ योग्य प्रमाणात असावे.
लागवड, किडी व रोगांपासून संरक्षण, फवारणी व इतर महत्वाच्या बाबींचे विवेचन या पुस्तकात इतरत्र केलेले आहेच. त्या पद्धतीचा अवलंब करावा.
काढणी व हाताळणी :
द्राक्षे योग्य वेळेला योग्य पद्धतीने काढून त्यांची चांगली हाताळणी करणे महत्वाचे असते. सर्व घडांचा रंग एकसारखा असला पाहिजे. फळांची गोडी रसाळ, मधुर असावी, साखर व आम्लता यांचे प्रमाण अनुक्रमे २२ ते २३%(रिफ्रेक्टोमीटर रिडिंग) व ०. ५ ते ०. ६ % असावे. द्राक्षे काढणी करताना ज्या भागातील छाटणी अगोदर केली त्या भागातील द्राक्षांची काढणी अगोदर करावी. शकयतो सकाळी ५ ते ७ ह्या वेळेला काढणी करावी. काढलेल्या घडांची मोठे घड, मध्यम घड, लहान घड व मोठे मणी, मध्यम मणी , लहान मणी ह्या प्रमाणे प्रतवारी करवी.
प्रिकुलिंग
काढणीनंतर द्राक्षे साठवण करून ठेवण्याच्या अगोदर किंवा निर्यात करण्याच्या अगोदर फळांच्या आत असलेली उष्णता लवकरात लवकर काहून टाकण्याच्या क्रियेस प्रिकुलिंग म्हणतात.
प्रिकुलिंग केल्यामुळे अशी द्राक्षे निर्यातीसाठी योग्य होतात. जास्त दिवस टिकतात. एक्सपोर्टमध्ये खराब होत नाहीत. तसेच प्रिकुलिंग नंतर ग्रेपगार्ड (गंधकाची ट्रीटमॅट देणे ) वापरल्यास ५ - ६ आठवडे द्राक्षे सुरक्षित राहू शकतात. ह्या गोष्टी झाल्यानंतर आकर्षक व योग्य पॅकिंग करणे महत्त्वाचे आहे. ह्या सर्व विषयांची, उपकरणांची माहिती व सहकार्य 'अपेडा' किंवा द्राक्ष बागायतदार संघामध्ये मिळते. ह्या सर्व गोष्टीचा काळजीपूर्वक अभ्यास करून आपली द्राक्षे निर्यातक्षम होऊन आपल्या सर्व परिश्रमाचे फळ आपणास मिळून त्या बदलात मिळणाऱ्या परकीय चलनामुळे स्वत: द्राक्ष बागायतदाराची पर्यायाने आपल्या देशाची आर्थिक स्थिती नक्कीच मजबूत होईल.