डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन
श्री. बाळासो गणपती हारगुडे मु. पो. आळसंद, ता. खानापूर, जि. सांगली,
फोन :(०२३४७)२३७९८०
मी ५ वर्षापासून डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत असून २ वर्षापासून युरोप करित आहे, प्रत्येक
वर्षी चांगले उत्पादन मिळत आहे. एकून ३ एकर बाग आहे, त्यातील १ एकर द्राक्षाचे युरोप
केले. १ एकर वर १७०० झाडे आहेत ६' x ४' लागण असून माळ पद्धतीचा मांडव आहे. एका झाडावर
२५ घड आहेत. घडांमध्ये ९० ते १०० मणी आहेत, एका घडाचे वजन ५०० ग्रॅम आहे. मालाला शाईनिंग
असून साईज २० ते २२ एम. एम. होती. युरोप ९ टन दर ४१ रुपये किलो. हॉलंड १ टन दर २२ रू.
किलो. लोकल १५ टन दर १२ रू. किलो. पुर्णपणे एप्रिल ते ऑक्टोबर छाटणीत डॉ.बावसकर तंत्रज्ञान
वापरले, त्यामुळे एवढे उत्पादन मिळाले. एप्रिल छाटणीमध्ये काडी पुर्ण पिकली. काडीचे
डोळे मोठे, पानगळ झाली नाही. ऑक्टोबरमध्ये घडांची साईज चांगली पाकळी जास्त, पाने मोठी,
मणी मोठे, एकसारखी साईज, थंडीत ही फुगवण मिळाली, साखरेचे प्रमाण जास्त, पाने शेवटपर्यंत
हिरवी, रोगमुक्त व सशक्त वेळी होत्या.