द्राक्ष - ऑक्टोबर छाटणी व छाटणीची वेळ

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत करता येते.

१) १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीच्या छाटणीला अगोदरची (आगाप) छाटणी म्हणतात.

२) १६ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या कालावधीतील छाटणीला नियमित छाटणी म्हणतात.

३) २१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर छाटणीस उशिराची छाटणी (एक्स्पोर्टसाठी) म्हणतात.

पहिल्या वेळची छाटणी पावसाळ्यात येत असल्याने कीड व रोग यापासून काळची घ्यावी लागते आणि ही द्राक्षे दिवाळ्यात तयार होत असल्यामुळे गोडीस कमी असतात. पण ह्या वेळेस रमजान, नववर्ष व नाताळ ये असल्यामुळे भाव चांगला मिळतो.

दुसर्‍या वेळेच्या छाटणीनंतर हवामान चांगले असते. त्यामुळे अडचणी कमी येतात. पण उत्पादन फेब्रुवारी - मार्चमध्ये येत असल्यामुळे व आवक जास्त असल्यामुळे भाव कमी होतात.

तिसऱ्या नंबरची छाटणी हिवाळ्याच्या आरंभी येते, त्यामुळे थंडीमुळे फूट कमी आणि उशिराने निघते. उत्पादन कमी निघते. द्राक्ष उशिरा तयार होतात व या काळात पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता असते. द्राक्षाची गुणवत्ता चांगली असते, तथापि आंबा जर त्याच काळात बाजारात आला तर द्राक्षाची मागणी कमी होते.

द्राक्ष निर्यातीसाठीच्या महत्त्वाच्या बाबी :

१) निर्यातदाराची मागणी

२) कोणत्या देशात निर्यात करायची

३) कोणत्या काळात निर्यात आणि कोणत्या जातीच, किती मागणी.

४) द्राक्ष छाटणीनंतरची (प्रिकुलिंग, कोल्ड स्टोअर, रिफर व्हॅन) व्यवस्था आहे का ?

५) जर बेदाणे तयार असतील तर ही छाटणी फार लवकर अथवा उशिराने न करता ऑक्टोबरच्या मध्यास करावी. म्हणजे त्या द्राक्षात अधिक गोडी येते व बेदाणे तयार होण्यास अनुकूल हवामान पुष्कळ कालावधीसाठी मिळते.

टिप : दोन छाटणीतील अंतर ४ ते ६ महिन्यांपेक्षा जास्त नसावे.

ऑक्टोबर छाटणीची पूर्व तयारी:

छाटणीसाठी वेलीवर काड्या कितपत तयार झाल्यात त्याची चाचणी करून घेणे.

एप्रिल छाटणीनंतर काड्यांची वाढ ३ अवस्थातून होते.

१) काडीसाठी सव्वा महिना लागतो .

२) सुक्ष्म घड निर्मितीसाठी सव्वा महिना लागतो.

३) काडी पक्वतेसाठी सव्वा महिना लागतो.

म्हणजे एप्रिल छाटणीनंतर ७ ते ८ दिवस फूट व्हायला आणि पावणेचार महिने वरिल अवस्था पूर्ण व्हायला, असे एकूण ४ महिन्याचा कालावधी लागतो.

ऑक्टोबर छाटणीचे नियोजन

ऑक्टोबर छाटणी चे काम ३ अवस्थेमध्ये असावे.

१) छाटणी पूर्व (अगोदरची) कामे.

२) प्रत्यक्ष (अगोदरची) कामे.

३) छाटणीनंतरची कामे.

या व्यतिरिक्त काडी तपासून घेतल्यावर रहात असलेल्या उणिवा -

१) काडीची पक्वता

२) सुक्ष्मघड निर्मिती

३) सुप्त अवस्था.

उदाहरण :

एक काडी १६ डोळ्यापर्यंत वाढली आहे. तिच्यावरील १२ व्या डोळ्यापर्यंत सुक्ष्म घड निर्मिती झाली आहे आणि ९ व्या डोळ्यापर्यंत ती पक्व झाली आहे. तसेच ६ व्या डोळ्यापर्यंत डोळे सुप्तावस्थेत आहेत. मग अशा परिस्थितीत ही काडी आपण कोणत्या डोळ्यावर छाटाल ?

तर आशावेळी काडीवरील १२ व्या डोळ्यापर्यंत घड निर्मिती झालेली असूनही ९ ते १२ डोळ्यामधील घड काही अपक्वतेमुळे कच्चे आहेत. हे कच्चे घड बाहेर पडल्यानंतर गळण्याची शक्यता आहे. त्याचे मागील डोळे फलीत आणि पक्के आहेत. त्यातही ६ व्या डोळ्याच्या अगोदरचे डोळे सुप्तावस्थेत आहेत, ते फुटण्यासाठी उपाय योजना करावी.

१) ऑक्टोबर छाटणी पुर्वीची कामे:

१) निम्या आणि त्यापेक्षा अधिक भाग अपक्व असलेल्या सर्व काड्या १ डोळा ठेवून काढून टाकाव्यात.

२) बागेतील तणांचा बंदोबस्त करावा.

३) हिरवळीचे पीक घेतले असेल तर ते गाडून टाकावे.

४) रोग - कीड याची लक्षणे पाहून एक फवारणी घ्यावी.

५) पानावर पोटॅशियम सल्फेट किंवा राईपनरची फवारणी घ्यावी.

६) गरज भासल्यास ७५० ते १००० पी.पी.एम. इथ्रेल (Ethryl) फवारावे.

२) प्रत्यक्ष छाटणीची कामे:

१) वाफश्यावर छाटणी करावी.

२) छाटणी किमान ६ ते ९ व्या डोळ्यावर करावी.

३) छाटणी केल्यानंतर शेंड्याकडून ३ ते ४ डोळ्यावर HCN किंवा डॉंरमेक्स किंवा काळा बोर्डो (थायोयुरिया युक्त) चा तापमान २५ ते ३५ डी. से. असताना कमीत कमी २० मिली / लि. किंवा तापमान २० ते २२ डी. से. असताना जास्तीत जास्त ४० मिली/ लि. प्रमाणे वापर करावा.

४) खोडावर ओलांड्यावर बोर्डो पेस्ट लावावी

३) छाटणी नंतरची कामे :

१) तण नियंत्रणाची मशागतीची राहिलेली कामे पूर्ण करावीत.

२) रोगग्रस्त भाग, काड्या, पाने गोळा करून नष्ट कराव्यात.

३) जमीन कडक झाली असल्यास ती हलवून घ्यावी.

४) हलकेसे पाणी द्यावे. तसेच फर्टीगेशन युनिट चालू करावे.

५) बाग कशी फुटते यावर आणि रोग - किडींवर लक्ष ठेवावे.

घड जिरणे - समस्या

ऑक्टोबर छाटणीनंतर पोंगा अवस्था असताना ढगाळ वातावरण व सतात पाऊस राहिल्यास घड जिरण्याचे प्रमाण वाढते. घड जिरणे म्हणजेच त्या फुटीतून घड बाहेर न पडता त्याचे बालीमध्ये रूपांतर होणे.

पिंगळवाडे, तहाराबाद, आसखेडा, करंजड (सटाणा) या भागात लवकर छाटण्या असतात. अशा छाटण्या झाल्यानंतर मागील वर्षी या परिसरात जुलै, ऑगस्टमध्ये अतिपाऊस झाला. या परिसरातील द्राक्ष बागांमध्ये घड जिरण्याचे प्रमाण वाढले. जमीन घट्ट झालेली असल्यास मुळांचे कार्य योग्य प्रकारे होऊ शकत नाही. परिणामी पोषण द्रव्यांची उपळब्धता न झाल्यास घड जिरण्याचे प्रमाण वाढते.

द्राक्ष बागांमध्ये योग्य प्रकारे पाण्याचा वापर, औषध फवारणी व खतांची मात्रा दिल्यास अशी समस्या निर्माण होणार नाही.

अशा परिस्थितीत थ्राईवर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी व मुळांची कार्यक्षम वाढण्यासाठी छाटणीनंतर ८ दिवसांनी जर्मिनेटरचा एकरी एक लिटरचा ड्रीपमधून वापर केल्यास फायदेशीर ठरते. वाढ निरोधक म्हणून लिहोसीन (सी. सी. सी. ) २०० मिलीच २०० लि. पाण्यातून छाटणीनंतर १२ते १४ दिवसानंतर फवारणी करावी.

या वर्षी चालू हंगामात द्राक्ष बागांमध्ये फुटी मागेपुढे होत असून घड जिरण्याचे प्रमाणे वाढते आहे. या वर्षी अति पावसात पिंगळवाडे येथील श्री. संजय महादु भामरे व करंजाड येथील श्री. नंदकुमार चित्ते यांच्या द्राक्ष बागेतील घड जिरण्याचे प्रमाण थ्राईवर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी केल्यामुळे पूर्ण थांबले. श्री. अशोक तुळशीराम बोरस्ते साकोरे ता. निफाड यांच्याकडे दीड एकर थॉम्पसन बागेची लवकर छाटणी असताना वरील फवारणीमुळे घड जिरले नाही.

१) श्री. केशव बाजीराव मोरे, मु. पो. अवनखेड, ता. दिंडोरी, मो. ९९२२५५५९९९, ९४२३१२१९९९. थॉम्पसन - ५ एकर

२) श्री. वसंत गोविंद रेताडे, मु.पो आंबेदिंडोरी, ता. दिंडोरी. थॉम्पसन - २ एकर

३) श्री. भाऊराव गोविंद रेताडे, मु. पो. आंबे दिंडोरी, ता. दिंडोरी, थॉम्पसन - २ एकर

४) श्री. किशोर रावसाहेब देशमुख, मु. पो. मोहाडी, ता. दिंडोरी, द्राक्ष - ६ एकर, थॉम्पसन - २ एकर. फोन - २७४६३२.

५) श्री. अनिल कारभारी पिंगळ, मु. पो. चित्तेगाव, ता. निफाड, द्राक्षबागा - १० एकर, थॉम्पसन - ६ एकर .

६) श्री. शिवाजी मधुकर बोरस्ते, मु. पो. दिंडोरी, ता. दिंडोरी, द्राक्ष - ११ एकर, मो. ९८९०४४१०६५

७) श्री. साहेबराव गिरीधर कदम(M.A. अर्थशास्त्र), मु. पो. कोराटे, ता. दिंडोरी.

८) श्री. माधवराव भाऊराव देशमुख, मु. पो. लखमापूर, ता. दिंडोरी, मो. ९६२६८०९३८३, ९२७०३०९१९०

९) श्री. संजय भिकाजी गोरे, मु. पो. मावडी, ता. दिंडोरी, थॉम्पसन - २ एकर

१०) श्री. चंद्रशेखर थेटे, मु. पो. मिरची पालखेड, ता. निफाड , थॉम्पसन - २ एकर, सोनाका - दीड एकर मो. ९८२२५०९२२०

११) श्री. हरीश्चंद्र पंढरीनाथ देशमुख, मु. पो. नारायण टेंभी , ता. निफाड ,

१२ ) श्री. शिवाजी बन्सीलाल जाधव, मु. पो. खेरवाडी, ता. निफाड , फोन. (९५२५५०) २६०१७९, थॉम्पसन - २ एकर

वरील द्राक्ष बागायतदारांची मागील वर्षी व चालू हंगामात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा वापर केला. त्यातील थ्राईवर व न्युट्राटोनमुळे घड जिरणे थांबून घड अनकुचीदार मिळाले, गोळी घड किंवा पांढरे घड झाले नाहीत. प्रतिकूल परिस्थितीत घडांचा पोट सुधाल्याचे अनुभव घेतले.

ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस लागणाऱ्या खतांची मात्रा छाटणी अगोदर १५ ते २० दिवस द्यावयाचा एकरी खाताचा डोस-

१) २० ते २५ गाडी शेणखत किंवा हिरवळीचे खत (धैंचा, ताग, चवळी इ.)

२) १५० ते २०० किलो सुपर फॉस्फेट

३) २०० ते २५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत आणि १०० किलो लिंबोळी पेंड

४) १०० किलो DAP (१८:४६:०)

५) १५ किलो पोटॅश (sop).

स्लरी (शेण, गोमुत्र, गूळ) मधून सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.

टिप : १) छाटणी च्या बेसल डोसमध्ये सुक्ष्म अन्नद्रव्ये दिली असतील तर पुन्हा स्लरीत सुक्ष्म अन्नद्रव्ये द्राक्ष मण्यात पाणी उतरेपर्यंत देऊ नयेत.

२) देशी गाईचे गोमुत्र व शेणाच्या स्लरीने आपल्या जमिनीतील पोषक जीवाणुंची (आवश्यक) संख्या वाढेल. त्यामुळे ही स्लरी रासायनिक खताच्या मात्रेच्या अगोदर किंवा खत दिल्यानंतर १० दिवसांनी द्यावे.

३) स्लरी सावलीत बनवावी.

४) पिकाच्या गरजेप्रमाणे स्थानिक परिस्थितीनुसार (जमीन, हवामान, पिकाची अवस्था) जवळच्या 'कृषी विज्ञान' केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार खतांचा वापर करावा.

ऑक्टोबर छाटणी

१) ऑक्टोबर छाटणी सबकेन असेल ते डोळे छाटून घ्यावी. छाटणीनंतर २४ तासाच्या आत १ % बोर्डो मिश्रणाची फवारणी घ्यावी. ज्यामुळे छाटणीने झालेल्या इजामध्ये बुरशी फैलणार नाही व जखम लवकर भरून येईल.

२) छाटणीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी डॉंरमेक्स (HCN = Hydrogen Cyneamide) + जर्मिनेटर यांच्या द्रावणात काडीचे ३ ते ४ डोळे भिजवून घ्यावेत. काडी चुकण्याची शक्यता वाटत असल्यास द्रावणामध्ये कलर मिसळावा.

३) छाटणीनंतर ९ व्या ते १० व्या दिवशी पहिले पान निघते, त्यावेळेस जर्मिनेटर २५० मिली + थ्राईवर २५० मिली + निमार्क २०० मिली + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + १०० लि. पाणी यांची फवारणी घ्यावी.

फायदा - शेंडा वाढीसाठी, पाने रुंद होण्यासाठी, उडद्या प्रतिबंधासाठी याचा फायदा होतो.

४) छाटणीनंतर १५ दिवसांनी थ्राईवर ३०० मिली + क्रॉंपशाईनर ३०० मिली + किटकनाशक + बुरशीनाशकाची फवारणी करावी.

यापुढील फवारणीसाठी सप्तामृत वेळापत्रक पहावे.

G.A. अॅसिड वापरण्याची वेळ व प्रमाण (घड बुडविणे)

१) १९ ते २६ दिवसात पहिला डीप G.A. २० PPM + जर्मिनेटर ३० ते ४० मिली + १० लि. पाणी या प्रमाणात घडाची लांबी वाढण्यासाठी व आग्र्‍या वाढीसाठी घ्यावा.

२) ४० ते ४५ दिवसांनी - मणी सेटिंगसाठी व आग्र्‍या वाढीसाठी ७५ ते ८० % टोपण गळल्यानंतर (cap fall) G.A. ४० ते ५० ppm + जर्मिनेटर १० मिली + न्युट्राटोन ३० मिली ते ४० मिली + पाणी १० लि. या प्रमाणात डीप करवा. म्हणजे मण्यांची फुगावन घेऊन लांबी वाढेल.

३) रिव्हर्स डीप (म्हणजे मागील डीपपेक्षा प्रमाण कमी घेणे) G.A. ३५ PPM + न्युट्राटोन ५० मिली किंवा राईनर ५० मिली + १० लि. पाणी.

टिप :

१) सुरुवातीला घड लहान असेल तर १० पी.पी.एम. चा स्प्रे घेतात.

२) G.A. चा स्प्रे झाल्यामुळे किंवा डीपमुळे पाने पातळ होतात. ती रुंद व जाड करण्यासाठी थ्राईवर + क्रॉंपशाईनरची फवारणी घ्यावी.

३) जर्मिनेटर वापरल्यामुळे घडाचा दांडा गोलाकार होतो. Elasticity वाढते व पाण्याचा pH कमी होऊन घड लांबतो.

४) G.A. चे प्रमाण पी. पी. पी. एम. मध्ये व्यवस्थित घेणे अन्याथा घड कडक होतात. दांडे जड होतात. त्यामुळे फुगवणीवर परिणाम होतो व पॅकिंगमध्ये अडचण निर्माण होते.

५) घड किंवा मनी कडक झाल्यास EDTA Calcium Nitrate फवारावे. त्यामुळे घड लुज पडतात.

विरळणी (थिनिंग)

१) पानांची विरळणी किंवा काड्यांची विरळणी करणे.

२) घडांची लांबी कमी करणे व मण्याची विरळणी करणे.

३) पानांची विरळणी करणे, म्हणजे वांझ काड्या कमी करणे. अनावश्यक पाने कमी करणे. जास्तीच्या काड्या किंवा फूट काढणे.

४) घडांची थिनिंग साधारण ४५ ते ५० दिवसांनी करावी लागते. कारण घड पक्व होत असतो. त्याअगोदर थिनिंग करणे गरजेचे असते.

टिप:

१) ४ ग्रॅम वजनाचे पान ७ मणी पोसते. म्हणजे अन्न पुरवू शकते.

२) १५ ते १७ पाने १०० त १२० मण्यांचे पोषण करू शकतात.

३) १ महिन्याच्या आत एका काडीची १३ पाने तयार होणे गरजेचे असते. ते न झाल्यास जर्मिनेटर ची पुन्हा फवारणी घेणे व ड्रिपमधून नत्र देणे.

टेबल ग्रेप्सच्या घडाच्या गुववत्तेसंदर्भातील दोषाची संभाव्य कारणे-

१) घडांचा घट्टपणा -:

अ) प्रिब्लुम वेळेची G. A. ची कमी मात्रा

ब) प्रिब्लुम व फुलोरा अवस्थेतील उशीरा केलेला G.A. चा वापर.

२) घडातील सर्व मणी एकसारख्या आकाराचे नसणे:

अ) बेरीचा (द्राक्षमण्याचा) आकार वाढविण्यासाठी लवकर दिलेला G.A.,

ब) लवकर केलेली गर्डलिंग,

क) पाने / फळे यांचे अयोग्य गुणोत्तर.

३) घडातील सर्व मण्यांना एकसारखा रंग नसणे,

अ) काडीवर पुरेशी पाने नसणे,

ब) काड्याचे अयोग्य वळण.

४) ४०० ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे घड :

अ) काड्यांची जाडी कमी असणे व अशक्त असणे.

ब) एका काडीवर जास्त घड असणे.

५) ५ % पेक्षा जास्त मणीगळ होणे : मणी हा त्याच्या देठाशी घट्ट नसणे.

६) २ % पेक्षा जास्त मण्यांवर गंधकाचे विरंजन दिसणे(सौरजळ)

अ) घड सुर्यप्रकाशात असणे,

ब) जास्त प्रमाणत सल्फर बुरशीनाशकाचा वापर,

क) स्टोअरेजमधील जात तापमान.

७) ७ % पेक्षा जास्त मनी आकाराने लहान असणे

अ) लवकर दिलेला G. A.

ब) लवकर केलेले गर्डलिंग

क) पाने / फळे यांचे अयोग्य गुणोत्तर.

८) २% पेक्षा जात भार लागलेले किंवा इजा झालेले मणी :

अ) घडाचा घट्टपणा आणि पॅकिंगमध्ये घट्ट भरणे.

ब) घड हाताळतांना होणारी इजा.

महत्त्वाच्या बाबी :

१) बाग छाटल्यापासून ५० दिवसापुर्वीस थंडी सुरू झाल्यास तापमान खाली आले तसेच सकाळी दव पडू लागले तर भुरीचे स्प्रे लवकर सुरू करावेत.

२) ६० दिवसानंतर हवामान पावसाळी असेल किंवा डाऊनीसाठी उपयुक्त असल्यास डाऊनीसाठी दिलेले स्प्रे पुन्हा घ्यावते.

३) सायपरमेथ्रीनची गरज पडल्यास एकदाच वापरावे कारण जास्त वेळा वापरल्यास मिलिबग्ज बागेत वाढू शकतो.

४) मणी गरम पडल्यास किंवा मण्यात साखर भरण्यास सुरुवात झाल्यानंतर रोगासाठी औषधे फवारणे बंद करावे.