द्राक्ष - ऑक्टोबर छाटणीनंतरच्या फवारणीचे वेळापत्रक

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


ऑक्टोबर छाटणी योग्य तापमान व आर्द्रता असताना वेळेवर करावी

१) छाटणीनंतर प्रत्येक काडी, डोळे एकसारखे व लवकर जोमदार फुटण्यासाठी - जर्मिनेटर ३०० मिली + १० लि. पेस्ट

२) पोंग्यात असताना - फुट जोमदार सशक्त न दबकत निरोगी निघण्यासाठी - जर्मिनेटर ५०० मिली + हार्मोनी १५० मिली + ३०० ग्रॅम प्रोटेक्टंट किंवा किटकनाशक + १०० लि. पाणी.

३) ३ ते ४ पाने आल्यानंतर शेंडा वाढ होऊन नव्या फुटीला आलेल्या घडांची साईज वाढविण्यासाठी व घडांची गळ होऊ नये यासाठी - थ्राईवर ३०० मिली + क्रॉंपशाईनर ३०० मिली + ३०० ग्रॅम प्रोटेक्टंट किंवा किटकनाशक + १०० लि. पाणी

४) तिसर्‍या फवारणीनंतर १० दिवसांनी - पानांची जाडी व रुंदी वाढीसाठी, खराब हवामानापासून संरक्षणासाठी - थ्राईवर ३०० मिली + क्रॉंपशाईनर ३०० मिली + ३०० ग्रॅम प्रोटेक्टंट किंवा किटकनाशक + बुरशीनाशक + १०० लि. पाणी

५) द्राक्षबाग फुलोर्‍यात असताना खराब हवामान, पाऊस, धुके, थंडी, मणीगळ, कुजवा यापासून संरक्षण होण्यासाठी - थ्राईवर ३०० मिली + क्रॉंपशाईनर ३०० मिली + ३०० ग्रॅम प्रोटेक्टंट किंवा किटकनाशक + हार्मोनी १५० मिली + १०० लि. पाणी

द्राक्षमणी, बाजरी/ ज्वारीच्या आकाराचे झाल्यावर - घडांचे पोषण होऊन लांबी वाढण्यासाठी आणि पाकळी मर टाळण्यासाठी - थ्राईवर ३०० मिली + क्रॉंपशाईनर ३०० मिली + राईनर ३०० मिली + ३०० ग्रॅम प्रोटेक्टंट किंवा किटकनाशक + बुरशीनाशक + १०० लि. पाणी

द्राक्षमणी शेंगदाण्याच्या आकाराचे झाल्यावर शॉर्टबेरीज, वॉटरबेरीज, पिंकबेरीज, सनबर्न व क्रॅकिंग टाळण्यासाठी - थ्राईवर ३०० मिली + क्रॉंपशाईनर ३०० मिली + राईनर ३०० मिली + ३०० ग्रॅम प्रोटेक्टंट किंवा किटकनाशक + बुरशीनाशक + १०० लि. पाणी

द्राक्षमण्यात पाणी उतरण्याच्या वेळेस - द्राक्षघडांचा टिकाऊपणा, चकाकी, आकर्षक रंग व गोडी (टी. एस. एस) वाढून उत्तम फुगवण होऊन माल काढणीनंतर मणीगळ, मणी सड टाळण्यासाठी - थ्राईवर ३०० मिली + क्रॉंपशाईनर ३०० मिली + राईनर ३०० मिली + ३०० ग्रॅम प्रोटेक्टंट किंवा किटकनाशक + बुरशीनाशक + १०० लि. पाणी.

(या औषधांबरोबर वापरावयाच्या किटकनाशके, बुरशीनाशकांचे प्रमाण हवामानातील बदलानुसार ठेवावे.)

टिप- मार्केट करण्यासाठी

१) कळी डिपींग - १० लिटर डिपींग द्रावण + १० मिली जर्मिनेटर

२) मणी सेट डिपींग - १० लिटर डिपींग द्रावण + २० मिली जर्मिनेटर + राईपनर ५० मिली

३) रिव्हर्स डिपींग - १० लिटर डिपींग द्रव + २० मिली जर्मिनेटर + राईपनर ५० मिली (जी. ए. १० ते २० % कमी वापरावा )

४) नवीन जुन्या बागेच्या पांढर्‍या मुळ्या (जारवा) फुटण्याकरिता व वाढीकरीता - एकरी जर्मिनेटर १ लि. ड्रिपमधून द्यावे.

'डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी' ची फवारणी केलेले बेदाणे एकसारखे, उत्कृष्ट रंग, चकाकी, जास्त गर, सुरकुत्या कमी, फोलपट कमी निघून १० ते १५ % वजन जास्त मिळून १५ % बेदाणे ए - वन क्वलिटीचे मिळतात. बेदाण्याकरिता कोणतेही डिपींग, थिनिंग, गर्डलिंग करण्याची आवश्यकता नाही.