प्रतिकुल हवामानात डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून आलेल्या द्राक्षबागा

अति थंडीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने द्राक्ष घडांचे पोषण

प्रा. साहेबराव गिरधर कदम, मु. पो. कोराटे, ता. दिंडोरी, जि. नाशिक.
फोन (०२५५७) २७४४५०


साधारणपणे हिवाळा सुरू झाला की, थंडीला सुरुवात होते. अशा थंडीत विशेषत: नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात तापमान १० डी. सें. ते १३ डी. सें. हून अचानक ७, ४,३ डी. सें. याप्रमाणे क्रमाक्रमाणे खाली येते. तेव्हा विशेषत: द्राक्ष पिकावर त्याचा अदृष्य परिणाम त्वरित होतो. आणि असा परिणाम दृष्य स्वरूपात दिसण्यास कमीत कमी सात दिवस लागतात.

अदृष्य परिणाम असा, द्राक्ष वेलीच्या अंतर्गत सक्रीय पेशी रात्रीच्या वेळेस कार्य न करता स्थिर राहतात. द्राक्ष वेळ पिवळी पडून निस्तेज होते. द्राक्ष घडांत तयार झालेले मणी, मण्यांमध्ये पाणी फिरणेची अवस्था तसेच द्राक्ष मणी क्रॅक जाणे, द्राक्ष मण्यांवर अदृष्य स्वरूपाचे वलय निर्माण होणे द्राक्ष मणी व देठ ज्या ठिकाणी जोडला जातो तेथे मण्यांवर तांबूस व तपकिरी रंगाची खाच पडणे, तसेच पक्व द्राक्षमाण्यातील गर बाहेर येणे इ.

अशी अवस्था झाल्यानंतर कोणत्याही स्वरूपाचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. तसेच रात्रीचे तपमान १० डी. सें. पर्यंत वाढू शकत नाही, अशा वेळेस मुळांभोवतालचे micro climate बदलत येत नाही. तसेच रात्रीच्या वेळेस शेकोटी करून किंवा बागेस पाणी देऊन काहीच फरक न पडता जास्त प्रमाणात द्राक्ष घडांचे नुकसान होते. वरील प्रकारचे दुष्परिणाम टाळण्यासाठी फक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच उपयोगी पडते हे मी गेली ८ - १० वर्षापासून अनुभवत आहे. या टेक्नॉंलॉजीचा उपयोग पुढीलप्रमाणे केला असता अति थंडीत देखील द्राक्ष घड जबरदस्त पोसून T.S.S. १६ ते २२ पर्यंत वाढून स्थानिक बाजारपेठ विक्रीच्या बाबतीत काबीज करता येते किंवा माल निर्यात देखील होतो. त्याकरिता प्रतिबंधाताम्क (Preventive Spray )म्हणून ३ फवारण्या करणे महत्त्वाचे आहे आणि त्यात क्रॉंपशाईनरचे प्रमाण वाढविणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रतिबंधात्मक फवारण्या (Preventive Spray )नोव्हेंबर, डिसेंबर (प्रमाण १०० लिटर पाण्याकरिता) थ्राईवर ५०० मिली + क्रॉंपशाईनर ७५० मिली + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + कॅलॅक्झीन २५ मिली.

वरील प्रमाणे २ फवारण्या केल्यास द्राक्ष घडांचे जबरदस्त पोषण (फुगवण) होते.