डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे द्राक्ष पिक प्रतिकूल परिस्थितीतही निरोगी दर्जेदार

श्री. साहेबराव दत्तात्रय कांडेकर, मु. पो. लाखलगाव, ता. निफाड, जि. नाशिक


माझ्याकडे फ्लेम सिडलेस जातीची २ एकर द्राक्षबाग ९ वर्षाची आहे. मी मागील सहा वर्षापासून या दोन्ही बागांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करीत आहे. ऑक्टोबर छाटणीनंतर हायड्रोजन सायनामाईडच्या २८ लि. पेस्टसोबत १ लिटर जर्मिनेटर चा वापर केला. त्यामुळे बाग एकसारखा फुटला. पहिल्या डिपींगच्यावेळी (छाटणीनंतरचा २७ वा दिअस) जी. ए. सोबत जर्मिनेटर ५ मिली / लि. वापर व ९०% फुलोऱ्यात बाग असताना दुसऱ्या डिपींगमध्ये जी. ए. सोबत जर्मिनेटर ५ मिली प्रति लिटर वापर केला, तर पहिल्या डिपींगमुळे साईड घडांचा दांडा गोलाकार होता, द्राक्षबाग फुलोऱ्यात असताना वातावरण ढगाळ होते. त्यामुळे आमच्या परिसरातील बागांमध्ये गळीचे प्रमाण वाढले. मात्र या अवस्थेत आम्ही वेळापत्रकाप्रमाणे फवारण्या घेत असल्याने आठवडाभरापुर्वीच थ्राईवर १ लि. आणि क्रॉंपशाईनर १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी झाली असल्याने गळ झाली नाही. डाऊनी मिल्ड्यू रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. फळकुज झाली नाही. मण्यांचे सेटिंग चांगल्याप्रकारे झाले.

त्यानंतर द्राक्षमणी शेंगदाण्याच्या आकाराचे असताना थ्राईवर १ लि., क्रॉंपशाईनर १ लि. आणि राईपनर १ लिटरची २०० लिटर पाण्यातून फवारणी केली. या काळात. थंडीचे प्रमाण खूपच वाढलेले होते. त्यामुळे सर्वत्र फुगावणीवर परिणाम झाला. मात्र आपल्या बागेतील मण्यांचे चांगले पोषण झाले. शॉटबेरीज, वॉटरबेरीज, पिंकबेरीज अजिबात झाले नाही. भुरीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी होता. या दोन्ही बागांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या एकंदरीत ३ फवारण्या केल्या. सोबत किटकनाशक, बुरशीनाशकांच्याही फवारण्या घेतल्या. फ्लेम सिडलेसचा एकरी १०० क्विंटल माल निघाला, तो १३ ००० रू. प्रति क्विंटल दराने विकला, तर तास - ए - गणेश एकरी ९० क्विंटल माल निघाला. त्याला १६२५ रू. प्रति क्विंटल भाव मिळाला.