प्रतिकूल हवामानामध्ये द्राक्षबागेचे संरक्षण

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


द्राक्ष उत्पादनामध्ये पीक संरक्षण फार महत्त्वाचे असून आपल्याकडे हवामानामध्ये होणार सारखा चढउतार नैसर्गिक आपत्ती या सर्वामुळे होणारी कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे द्राक्ष पिकाचे अतोनात नुकसान होते. खराब हवामानामुळे मागील वर्षांमध्ये द्राक्षबागांची वांझाफूट झाल्याची, उत्पादन व दर्जा कमी आल्याची तक्रारी आढळल्या. अशा प्रतिकूल हवामानापासून पिकांचे संरक्षण करणे महत्त्वाचे ठरते.

सर्वसाधारण बागेमध्ये ओळ राहिल्यास, निचरा नसल्यास रोगकिडी वाढतात. तसेच नत्राचे प्रमाणात वाढ, जस्त, लोह, पालाश यांची कमतरता असल्यास रोगांचे प्रमाण वाढते, वेलींची प्रतिकारशक्ती कमी होते.

हे सर्व टाळण्यासाठी प्रभावी व प्रतिबंधक औषधांचा वेळेवर व योग्य प्रमाणात वापर करावा.

१) अतिपाऊस / अवकाळी पावसात द्राक्षबागेचे संरक्षण

द्राक्ष वेलीचे एप्रिल छाटणी व ऑक्टोबर छाटणी अशी दोन वेळेस छाटणी करून फेब्रुवारी - मार्च महिन्यात द्राक्षे येतात. यासाठी द्राक्ष वेलीचे पीक संरक्षण वर्षभर महत्त्वाचे ठरते.

खरड छाटणीनंतर मे - जून महिन्यात पावसाळी वातावरणात (हवामानात) भूरी, करपा (अॅन्थ्रॅकनोज) , केवडा, झान्थोमोनस रोगांचा प्रादुर्भाव होतो.

अॅन्थ्रॅकनोजने खोड, वेलीचे वाढणारे शेंडे, पानावर गोल आकाराचे करडे काळे आणि पिवळी कड असलेलेल ठिपके तयार होऊन शुष्क होऊन पाने गळतात. ही परिस्थिती ऑक्टोबर छाटणीनंतर अवकाळी पाऊस झाल्यानंतर देखील निर्माण होते.

द्राक्षाचे भरघोस उत्पादनासाठी सुक्ष्मघड निर्मिती आवश्यक असते. खरड छाटणीनंतर ३५ ते ६० दिवसांत नवीन फुटीवर सुक्ष्म घड निर्मिती तसेच ६ व्या १० व्या डोळ्यापर्यंत पुर्ण करण्याचे काम थ्राईवर करते. थ्राईवर व क्रॉंपशाईनर प्रत्येकी १ लि. + पाणी २०० लि. या प्रमाणात फवारणी, तसेच युरॅसिलचा ५० पी. पी.एम. चा वापर केल्यास खराब हवामानात म्हणजेच कोरड्या तसेच ढगाळ हवामानात आणि अधिक काळ पाणी घरून ठेवणार्‍या जमिनीत प्रतिकूल परिस्थितीत घडांची निर्मिती चांगली होऊन होळे व काड्या उत्पादनक्षम होतात. त्याचप्रमाणे डोळा अवेळी फुटून ऑक्टोबर छाटणीपूर्वीच बाहेर पडत नाही.

काडीवर सबकेन ६ ते ७ पाने पुर्ण उघडल्यानंतर म्हणजेच सबकेनसाठी शेंडा खुडताना प्रतिकुल परिस्थितीत थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + ५०० प्रोटेक्टंट + पाणी २०० लि. ही फवारणी व दोन दिवसानंतर बुरशीनाशक फवारणी तसेच ८ दिवसानंतर युरॅसिल (५० पी. पी. एम. ) , सी. सी. सी. २५० पी.पी.एम. व ६ बी. ए. १० ते २० पी. पी. एम. चा वापर करावा. द्राक्षवेलीची पाने, काड्या कार्यक्षम, होऊन खोडात राखीव अन्नसाठा तयार होण्यास मदत होते. पाने कमकुवत होऊन गळत नाहीत. गैरमौसमी पावसात पाने ऑक्टोबर छाटणीपर्यंत टिकून राहतात. काड्या परिपक्व होतात.

ऑक्टोबर छाटणीनंतर नुकत्याच फुटलेल्या बागेत पावसाची शक्यता असल्यास तसेच हवेत आर्द्रता जास्त असल्यास अशा वेळेस सुरूवातीपासून २- ३ पाने आल्यानंतर बुरशीनाशकांची (मेटॅलॅकझील + मॅन्कोझेब २.५ ग्रॅम / लि. ) फवारणीअगोदर किंवा नंतर थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केल्यास डाऊनी मिल्ड्यू (केवडा) रोगास प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होते. अर्थातच डाऊनी रोगांचे बीज (Plasmophora Viticola) वेलीमध्ये प्रवेशच करू शकत नाही. या रोगांचा प्रादुर्भाव यावर्षी असलेल्या ढगाळ वातावरणात वाढतोय.

पोंगा अवस्थेत सध्याच्या परिस्थितीत घड जिरण्याचे प्रमाण वाढते. घडांची साईज वाढून अणकुचीदार होण्यासाठी, गळ होऊ नये, जिरू नये यासाठी जर्मिनेटर ड्रिपद्वारे एकरी एक लिटर आणि फवारणीतून थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. चा २०० लि. पाण्यातून वापर केल्याने प्रतिकुल परिस्थितीतही चांगला फायदा होतो.

अवेळी, अति पावसात नवीन फुटीवर करपा येण्याची शक्यता वाढते. कार्बेन्डीझम १ ग्रॅम + मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर फवारणीनंतर पानांची जाडी तसेच प्रकाश संश्लेषण क्रियेत वाढ होऊन पाने रुंद, कॅनापी मिळविण्यासाठी, रोग प्रतिकारक शक्ती वाढीसाठी वरीलप्रमाणे थ्राईवर + क्रॉंपशाईनरची फवारणी फायदेशीर ठरते. सुक्ष्म व दुय्यम अन्नघटकांचे वहन उत्तम होते.

पावसामुळे घडांची कूज अथवा फुलांची गळ फक्त बुरशीजन्य रोगाने न होता ती बागेत जास्त प्रमाणात नत्रयुक्त खताच्या वापरामुळे, नवीन फुटीचा जोम वाढल्यामुळे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे जमीन घट्ट होऊन पांढर्‍या मुळांची वाढ योग्य प्रकारे न झाल्यामुळे पाण्याचे कमी - जास्त प्रमाण, ढगाळ वातावरण, कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्याने अशा अनेक कारणाने फुलोर्‍यात बाग असताना घडामध्ये इथिलीनची पातळी वाढते त्यामुळे गळ होणे, घड कूज होणे असे प्रकार वाढतात. चालू वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रारंभातील पावसामुळे थंडीचा कालावधी लांबेल. बागांमध्ये पाणी थांबून घड कुज वाढलेली जाणवेल. द्राक्ष बाग फ्लॉवरींग स्टेजमध्ये असताना प्रकाशाची तिव्रता कमी प्रमाणात, ढगाळ हवामान अधिक प्रमाणात, नत्रसाठा, अमोनिया स्वरूपातील नत्र वाढल्याने फुलोर्‍यातील गळीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

लवकर छाटणी झालेल्या बागांतील द्राक्षमणी शेंगदाण्याच्या आकाराचे, पाणी उतरण्याच्या अवस्थेतील बागमध्ये क्रेकिंग (मण्यांचे चिरणे) सटाणा. सिन्नर, सांगली भागातील परिस्थितीत ढगाळ हवामानात पावसाअगोदर भूरी (Powdery Mildew) उन्सीनुला नेक्टर बुरशीची वाढ होईल. कोवळ्या पानावर जिवाणू करपा जाणवेल.

२) अतिथंडी (वातावरणात धुई, धुके, सुरकी, असल्याची अवस्था) : अतिथंडीमुळे बर्फाचा खडा कुल्फी जिभेवर ठेवल्यानंतर पडजिभेला व किडलेल्या दाढा किंवा ज्यांना गरम चहा पिल्यानंतर पाणी प्यायची सवय असते. पेप्सीकोला पिल्यानंतर पाणी प्यायची सवय असते, पेप्सीकोला पिल्यानंतर दाढेला कळ येणे ही वेदना ५ मिनिटात जाणवते. अशाच प्रकारच्या वेदना तापमान १० ते १२ डी. सेल्सिअसहून अचानकपणे ७, ४ व २ डी. सेल्सिअस याप्रमाणे ३ ते ४ दिवसांत उतरते, तेव्हा ७ ते ५ डिग्रीच्या सुमारासच वरील संवेदना - द्राक्षवेलींच्या सक्रीय पेशी, घडातील तयार झालेले मणी, मण्यांमध्ये पाणी भरणेची अवस्था,बारीक मणी, काही ठिकाणी फुलोरा असलेले द्राक्षवेळ, छाटणी लेट होत चालते त्या क्रमाने पहिल्या ४ तासातच जाणवून त्याच्यावर आघात व्हायला सुरुवात होते आणि २४ तास उलटून गेल्यानंतर हवामान खाते, संबंधित तज्ञ, दूरदर्शन, आकाशवाणी धोक्याची सूचना देत असतात. तोपर्यंत अदृष्य वलय, मंण्यांच्या देठावर घड, देठ व मणी ज्या टिकाणी जोडलेला असतो त्याचे खाली १ ते ३ मि. मी. अंतरावर मणी आतून दबलेला व दबलेल्या जागी लांबट अर्धा मि. मी. रुंद व ४ ते ५ मि. मी. लांब करडा ते तपकिरी रंगाचा चट्टा, न पोसलेली द्राक्ष, द्राक्षात पाण्याचा अंश थिजलेला, मोठी पक्व अवस्थेत दिसणारी द्राक्षे चवीस आंबट व पूर्ण तूरट असून अति थंडीमुळे पोसलेल्या द्राक्षमण्यांवर करडे, तपकिरी रंगाचे चित्रविचित्र डाग, थॉम्पसन सीडलेस जातीच्या द्राक्षामध्ये क्रॅकिंग व मधील गर एक्सपोज (Expose) बाहेर आलेला दिसतो.

अशा अवस्था झाल्यानंतर नुसता धूर करूनही उपयोग होत नाही तसेच रात्रीचे वेळी बागेस पाणी दिल्यानंतर तापमानात फरक होईल असे समजणे चुकीचे आहे. मुळातच गारवा कमी असल्यामुळे थंडीत रात्रीचे वेळी खाली गेलेले तापमान अनुकूल तपमानापर्यंत म्हणजे ११ डी. सें.ग़्रे. पर्यंत येऊ शकत नाही. कारण जमीन वातावरणाची अवस्था सारखीच आहे. जशी थंडीत डेर्‍यातील (मडक्यातील ) पाणी पिण्यासारखी अवस्था. बागेतील वेलीच्या भोवताली असणारे microclimate व Rhizosphere जवळील Microclimate हे गार असते. हे दुरस्त होऊ शकत नाही. कारण मुळातच तापमान खाली जाते. तेव्हा ४ डी. सें.ग्रे. च्या खाली तापमान जाते, तेव्हा संपूर्ण बर्फ झालेले असते. अशावेळेस शेकोटी करणे हे म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ असेच म्हणावे लागेल.

अशा प्रकारचे थंडीमध्ये विचित्र धुई, धुके व सुरकी (कोरडी, थंड, झोंबणारी हवा ज्यामुळे कान गार पडतात, कपडे घातले असूनसुद्धा हातापायाची बोटे बर्फात असल्यासारखी गारठतात, शब्द फुटत नाही. तोंडातून वाफ बाहेर पडते, नाखातून लाल रक्त गोठल्यासारखे वाटते, वाकलेली बोटे सहजासहजी सरळ होत नाही, केस संपूर्ण काटकोनात उभे राहतात. उकळलेला चहा देखील पिताना गार वाटतो, तेव्हा सुरकी आली असे समजावे) डिसेंबरचा पहिला आठवडा ते जानेवारीच्या दुसर्‍या पंधरावड्यामध्ये महाराष्ट्रात जेथे - जेथे द्राक्षबागा आहेत.

तेथे तसेच कर्नाटक, तामिळनाडू भागामध्ये अशी अवस्था येते. अशा वातावरणामध्ये द्राक्षबागेचे संरक्षण करण्यासाठी सप्तामृत वापरावे. क्रॉंपशाईनरचे प्रमाण वाढवावे. यामध्ये झायराईड व कॅलॅक्झीन वापरल्याने वेलींवर होणारा आघात टाळता येतो. तसेच अतिथंडीमध्ये देखील गोडी (T.S.S.) सप्तामृतामुळे १६ ते २२ पर्यंत होऊन द्राक्षघड पोसले जाऊन नाताल अगोदर युरोप मार्केटला सहजरित्या पाठविता येतात.

फवारणीचे प्रमाण : थ्राईवर १.५ (दीड) लिटर + क्रॉंपशाईनर २ लिटर + राईपनर १ लिटर + प्रोटेक्टंट १ किलो + न्युट्राटोन १ लि. + झायराईड २०० ग्रॅम + कॅलॅक्झीन ५० मिली + २०० लिटर पाणी. अशा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नोव्हेंबरपासून सुरुवात करून डिसेंबर अखेरपर्यंत दोन जादा फवारण्या घ्याव्यात. बागांचे वयोमान जास्त असल्यास (२ ते ३ वर्षापेक्षा जास्त) औषधांच्या प्रमाणात थोडा बदल करून क्रॉंपशाईनर प्रमाण थोडे वाढवावे.

३) अधिक ऊन : सूर्य १४ जानेवारीनंतर उत्तरायणात यायला सुरुवात होते. अशावेळी तापमान वाढत जाते. या कालावधीमध्ये द्राक्षमणी कलेकलेने वाढत जातात. अशा मण्यांना सूर्यप्रकाश पूर्ण मिळतो. नंतर द्राक्षवेल वाढल्याने तसेच जमीन व हवेतील उष्णता वाढल्याने बाष्पी भवन होऊन पिकांना पाहण्याची गरज भासते. १ मार्चनंतर सूर्य अर्धा उत्तरायणात आलेला असतो आणि त्याची उष्णता, तीव्रता, प्रखरता ही तळपणारी असते, दुपारी बारा वाजल्यानंतर ते संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत सूर्याचे करीं सरळ ते तिरपे द्राक्षघडांवर पडून घडातील मणी गुलाबी (Pink Berries ) होतात तसेच सौरजळ मुळे विपरीत परिणाम होतात. हे होऊ नये म्हणून थ्राईवरबरोबर क्रॉंपशाईनर + न्युट्राटोन चे प्रमाण वाढवावे म्हणजे वरील विकृती टाळता येतील.

फवारणी : बागेची अवस्था - पाणी भरून मणी पोसणे व मण्यांमध्ये गोडी भरणे अशी अवस्था, शेंगदाण्यासारखा मण्यांचा आकार असणार्‍या अवस्थेमध्ये २ ते २.५ लिटर थ्राईवर + ३ लिटर क्रॉंपशाईनर + २ लिटर राईपनर + १.५ ते २ किलो प्रोटेक्टंट + २ लिटर न्युट्राटोन + ३०० ते ३५० लिटर पाणी याप्रमाणात मिश्रण करून अशा मिश्रणाची फवारणी संपूर्ण द्राक्षवेलीवर (पाने, मणी, घड, देठांसह संपूर्ण ओलेचिंब करून) फवारणी करणे, म्हणजे संभाव्य धोका टाळता येईल.

सोलापूर, (सांगली) तासगांव, नाशिक, पुणे जिल्ह्याचे पूर्व भागामध्ये जेथे पाण्याचा ताण बसतो, त्याठिकाणच्या द्राक्षबागा पाऊसमान कमी झाल्याने तुटत आहेत. कारण अशा ताणांमुळे द्राक्षवेळ पोसत नाही किंवा घडातील मणी नीट पोसत नाहीत व घड बोन्साय (Bonsai) सारखे व अपक्वपानी (अकाली) पक्वता येऊन द्राक्षघडांना सुकवा येऊन बेदाण्यासारखी करड्या रंगाचे द्राक्षमणी तयार होतात. अशी अवस्था पाणी कमी असताना तसेच दोन पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढल्यास होते.

उपाय : २ लिटर थ्राईवर + २. ५ ते ३ लिटर क्रॉंपशाईनर + १ ते १.५ लिटर राईपनर + १. ५ ते २ किलो प्रोटेक्टंट + २ लिटर न्युट्राटोन + २० ग्रॅम झायाराईड किंवा २० ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लीन ३०० लिटर पाण्यामध्ये द्राक्षघडांसकट सक्षम पाने. देठ व ओलांड्यावर फवारावे, म्हणजे वरील सर्व फवारण्या केल्यास १० ते १५ टन क्रॉपलोड एकरी घेता येईल. अन्यथा प्रतिकूल हवामानाचा विपरीत परिणाम होऊन २ टन देखील एकरी उत्पन्न येणार नाही.

अशा प्रकारची खबरदारी घेऊन एकरी १२ ते २० हजार रुपये वरील फवारणीसाठी खर्च करून प्रतिकुल हवामानामध्ये देखील अनेक द्राक्षबागायतदारांनी एकरी २ ते ३ लाख रुपये मिळविले आहेत.