रूट स्टॉंकसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी अतिशय प्रभावी

श्री. संजय भिकाजी गोरे, मु. पो. मावडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक.
मोबा. ९९७५३९२३३७


आमचेकडे बऱ्याच बागायतदारांनी बेंगलोर डॉंग्रीज रूटची लागवड केली. आम्ही ही ३॥ एकर बेंगलोर डॉंग्रीजची ७/ ०३/०६ रोजी लागवड केली. जुन्या बागेसाठी सरांची औषधे वापरलेली असून जर्मिनेटर चा अनुभव होताच. रूटसाठी जर्मिनेटरचा वापर १ लि. + थ्राईवर १ लि. घेतले. १५ - १५ दिवसांनी फवारणी व ड्रिपमधून जर्मिनेटर दोन वेळेस दिले. आमचा रूटस्टॉंक फारच चांगला वाढला. काड्या ८ ते १० मी.मी. साईजच्या बनल्या. जर्मिनेटरमुळे शेंडा वाढला. पाने रुंद झाली व मुळ्या वाढल्या. एकसारखी कलमे वाढली. काडी एकसारखी झाली. गोल बनली. काड्यांना, पानांना शाईनिंग अप्रतिम आली. दोन निरोगी सरळ वाढीच्या काड्या ठेवून बाकीच्या काढल्या. ६ इंचापर्यंत खुंट मोकळा केला होता. कलमाची तयारी केली. २३/०९/ ०६ रोजी पाचर कलम केले. जमिनीपासून दीड फुटावर कलम केले. कलमासाठी सोनाकाची काडी (सायन) भरली. जर्मिनेटर ३० मिली + १ ग्रॅम बाविस्टीनच्या द्रावणात काडी बुडवून लावली. नवीन फूट चांगली वाढली. कलमाचा जोड पक्का झाल्यानंतर प्लॅस्टिक काढले. त्यापूर्वी जर्मिनेटर १ लि. + २०० लि. पाणी ड्रेंचिंग केले. कलम केल्यानंतर ८० व्या दिवशी जर्मिनेटर ५ मिली / लि. पाणी या प्रमाणात फवारणी केली होती. आतापर्यंत वाढ चांगली झाली. पाने रुंद व नोरोगी आहेत. जर्मिनेटर आहेत. जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + ३०० लि. पाणी या प्रमाणात एकंदरी ४ फवारण्या केल्या.