डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने (सप्तामृत) द्राक्षाच्या कीड, रोग, विकृतीवर मात, हार्मोनीमुळे डावण्या, भुरीवर स्वस्त आणि मस्त उपाय

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे डावण्या आलाच नाही, सोनाका द्राक्षाचे एकरी २३॥ टन उत्पादन

श्री. सुनिल शिवाजी सावंत, मु. पो. भवानीनगर, ता. वाळवा, जि. सांगली


मी १० - १२ वर्षापासून शेती करीत आहे. पाच वर्षापुर्वी दोन एकर द्राक्ष बाग लावली. १ एकर सोनाका व १ एकर थॉमसन जातीची द्राक्षे आहेत. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी मी गेली १० वर्षापासून सर्व पिकांसाठी वापरत असून त्यामुळे उत्पादनात ३० ते ४० % वाढ होते व रोग किडीपासून होणारे नुकसान १०० % टाळता येते याचा अनुभव असल्याने पडीक जमिनीत द्राक्षाची लागवड केली.

रोपे लावल्यापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्याने पहिल्याच वर्षी एकरी १६ टन द्राक्षे निघाली. अनेक भागातून शेतकरी बाग पाहण्यास येत असत, कारण पहिल्या वर्षी खोडे मोठी, पाने मोठी, काड्या व घड भरपूर होते असे अनेक अनुभव शेतकऱ्यांना पाहण्यास मिळाले.

गेल्या वर्षी सोनक जातीचे द्राक्षाचे उत्पादन एकरी १७ टन निघाले होते. परंतु या वर्षी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या (सप्तामृत आणि हार्मोनीच्या) १० फवारणी केल्या. त्यामुळे बागेवर रोग आलाच नाही तसेच किडीसी आल्या नाहीत, सांगली जिल्ह्यात या वर्षी डावण्या रोगाने अनके बागा नष्ट झाल्या परंतु माझ्या बागेत डावण्या रोग आलाच नाही तसेच मालाची साईज अतिशय चांगली, घड, मणी, पाने अतिशय चांगली होती. गर, गोडी, रंग, शाईनिंग जबरदस्त आले होते. या बागेत माझे एकरी सोनाका जातीचे द्राक्ष उत्पादन २३ ते ५५० किलो निघाले.