द्राक्षाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे कलर येऊन शरद एक्सपोर्ट

श्री. चंद्रकांत मारुती ढोले, मु. पो. येणेरे, ता. जुन्नर, जि . पुणे


द्राक्ष - शरद सिडलेस, क्षेत्र - ३० गुंठे, लागवड ८ x ४ फुट, लागवड - १० वर्षाची जुनी बाग.

गेली दहा वर्षापासून द्राक्ष पिकवित आहे. मी शरद सिडलेस द्राक्ष लागवड केलेली आहे. पण गेल्या दहावर्षापासून मला मुख्यत: भेडसावणारी समस्य म्हणजे शेवटी द्राक्ष काढणीच्या अवस्थेत निम्म्याच द्राक्ष घडांचा रंगा काळा व्हायचा व अर्धवटच कलर रहायचा. त्यामुळे माल काढून टाकावा लागत असे व भरपूर नुकसान होत होते. पण यावर्षी ऑक्टोबर छाटणी केल्यापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची सर्व औषधे बागेवर वापरण्यास सुरुवात केली. १८ ऑक्टोबरला छाटणी पासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची सर्व औषधे बागेवर वापरण्यास सुरुवात केली. १८ ऑक्टोबर २००२ ह्या दिवशी बागेची छाटणी केली. छाटणीनंतर काडी एकसारखी फुटण्यासाठी डॉंरमेक्समध्ये जर्मिनेटर घेतले (३५० मिली + १० लिटर पेस्ट) त्यामुळे ९ व्या दिवशी एकसारखी फुट निघाली. ११ व्या दिवशी पहिले पान दिसले. यानंतर साधारण २१ दिवसांनी १० P.P.M. जी. ए. स्प्रे घेतला. ह्या स्प्रे अगोदर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनरचा प्रत्येकी २०० मिली/ १०० लि. पाण्यातून स्प्रे घेतला. त्यामुळे शेंडा चांगला वाढला. नंतर पुन्हा २० P.P.M. मिली जी. ए. + जर्मिनेटर ५ / मिली / लि. अशा द्रावणात पुर्ण घट बुडवून घेतले. त्यामुळे घडाची वाढ चांगली झाली व साईड पाकळ्या चांगल्या निघाल्या. ह्या डिप नंतर ८ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रत्येकी ३०० मिली /१०० लि. पाण्यातून फवारले. अशा दोन फवारण्या केल्या. नंतर ७५ % कॅप फैल झाल्यावर ३५ P.P.M. जी. ए. व जर्मिनेटर १ मिली + राईपनर ५ मिली १ लि. पाण्यातून डिप घेतला. ह्यानंतर थ्राईवर + क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३५० मिली / १०० लि. पाण्यात एक स्प्रे घेतला. त्यामुळे पाने रुंद झाली. पानावर बारीक तेलकटसा थर तयार झाला. त्यामुळे बुरशीला अटकाव झाला. यानंतर द्राक्षमणी वाटण्याच्या आकाराचे झाले असता जी. ए. ५० P.P.M. व जर्मिनेटर १ मिली व राईपनर ५ मिली प्रति लि. पाणी असा पुन्हा एक डिप घेतला. ध्या डिप नंतर थ्राईवर + क्रॉंपशाईनर + राईपनर प्रत्येकी ४० मिली/ १० लि. पाणी अशा पद्धतीने दोन स्प्रे पंधरा दिवसांच्या अंतराने घेतले तर ह्या वर्षी पुर्ण बागेतील द्राक्षवेळीवरील पुर्ण घड काळे झालेत. त्यामुळे आमचे गेल्या दहा वर्षापासून होणारे नुकसान टळले. आता १८ ने १९ मीमी साईज आहे. बंच मोठे लांब आहेत. पाने अजुनही हिरवी गार रफ आहेत. ३० गुंठे क्षेत्रात ८ टन माल निघाला. यातील ७ टन माल २४ रू. दराने विकला. १ टन माल मुंबई ला पाठविला. डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरल्यामुळे रोगराई फक्त ५ ते ७ टक्के आली. माल क्वालिटीबाज निघाला. सर्व खर्च ऑक्टोबर छाटणीपासून ते माल काढून एक्सपोर्टचे बॉक्स पॅक करे पर्यंत ३५,००० रू. आला. १,९२,००० रू. झालेत म्हणजे खर्च वजा करता १,५७,००० रू. नफा झाला.