भाव निचीचे पण उत्पन्न भरपूर मिळाल्याने द्राक्ष बाग परवडला

श्री. रामचंद्र सिताराम शिंदे थेटाळे, गेट नं. १०० ता. निफाड, जि. नाशिक


सोनाका ३ बिगा

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधाचे पुर्ण शेड्युलवापरले. मी ३ वर्षापासून ही औषधे वापरत आहे. सुरुवातीला छाटणीनंतर जर्मिनेटर पेस्टमध्ये (१० मिली / १ लि. ) वापरले असता, फुट एकसारखी जोमदार निघाली. त्यामुळे घड मागेपुढे झाले नाहीत. घडांची साईज चांगली मिळाली. नंतर शेंडे कमी करावे लागले. फ्लॉवरींग स्टेजला, दुसर्या डिपींगला मणी शेंगदाण्याचा आकाराचे असतानान व पाणी उतरण्याच्या स्टेजला थ्राईवर, क्रॉंपशाईनर व राईपनर यांच्या फवारण्या केल्या. त्यामुळे मणीगळ झाली नाही. डाऊनी, भुरी व करपा फारच कमी प्रमाणात आला. पाने जाड, रुंद हिरवीगार झाली. झाडावर १०० ते १२५ घड असताना मण्यांची फुगवण चांगली झाली. एकूण २२५ क्विंटल माल निघाला. सरासरी दर १२ रू. किलो प्रमाणे मिळाला. आपली औषधे वापरल्यामुळे मालाला कलर शाईनिंग. वजन चांगले मिळाले.