द्राक्षासाठी प्रथमपासून वेळापत्रकाप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर
श्री. सुनिलराव रघुनाथ बस्ते, मु. पो. पाचोरेवणी, ता. निफाड, नाशिक.
मोबा. ९४२०८३०८५१
मी पाच - सहा वर्षापूर्वी नाशिक रेडिओवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची जाहिरात ऐकली होती.
तेव्हा मी अधिक माहिती घेण्यासाठी नाशिक येथील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या शाखेत गेलो. तेथील
प्रतिनिघींकडून सविस्तर माहिती जाणून घेतली आणि त्या दिवशी जर्मिनेटर हे औषध घेतले
आणि घरी आलो. त्यावेळी माझ्याकडे माणिकचमण, सोनाका या बाग होत्या, त्यांची दुसऱ्या
दिवशी छाटणी केली. १० लि. पेस्टमध्ये ३०० मिली जर्मिनेटर टाकले व द्रावण तयार केले
आणि द्राक्ष बागेच्या काड्यांना लावले. नंतर सातव्या दिवशी जर्मिनेटर १ लि. + २०० लि.
पाणी या प्रमाणात घेऊन ड्रिपने सोडले असता संपूर्ण बाग १००% एकसारखी फुट निघालेली दिसली.
त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि लगेच नाशिकला औषधे घेण्यासाठी गेलो. औषधे आणल्यानंतर
द्राक्षबाग अवस्था १३ व्या दिवशी जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + न्युट्राटोन १
लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. त्यामुळे घड अजिबात जिरले नाही. शेंडा चांगला
वाढला. यानंतर २२ दिवसांनी १० पी.पी.एम. जी.ए.चा स्प्रे घेतला. नंतर पुन्हा २० पी.पी.एम. जी.ए.+ जर्मिनेटर ५ मिली अशा द्रावणात
घड बुडवून घेतले. त्यामुळे घडांची वाढ चांगली झाली व साईड पाकळ्या चांगल्या निघाल्या.
यानंतर थ्राईवर + क्रॉंपशाईनरची फवारणी केली असता पळसाच्या पानासारखी पानाला जबरदस्त
कॅनोपी मिळाली. द्राक्षमणी वाटाण्याच्या आकाराचे झाले असला जी. ए. ५० पी.पी.एम. +
न्युट्राटोन ७ मिली + राईपनर ५ मिली + क्रॉंपशाईनर ४ मिली असा एक डीप केला. नंतर
थ्राईवर + क्रॉंपशाईनर + राईपनर प्रत्येकी १ लि. + २०० लि. पाणी
असे दोन स्प्रे पंधरा दिवसाच्या अंतराने घेतले.
उत्पन्न व चांगला दर जागेवरच !
माणिकचमण ३ एकर आहे. तिचे एकरी १५० ते १६० क्विंटल उत्पादन मिळाले. सोनाकाचे ३ एकर क्षेत्र आहे. त्याचे एकरी १६० ते १७० क्विंटल उत्पादन मिळाले. तसेच २ एकर थॉमसन आणि २ एकर तास - ए- गणेशचे एकरी १७० ते १८० क्विंटल उत्पादन मिळाले.
सर्व मालाची विक्री जागेवरून होते. सोनाका माणिकचमणला एक्सपोर्टचा ३१ ते ३५ रू. किलो भाव मिळतो. उरलेला सर्व माल कलकत्त्याचे व्यापारी ५ किलोचे पॅकिंग करून नेतात. त्याला २१ ते २८ रू. किलो भाव मिळतो. सोनाका, माणिकचमणचा माल उशीरा एप्रिलमध्ये आल्यास २८ ते ३५ रू. किलो भाव मिळतो. थॉमसन गणेशला लोकल रेट १५ ते १८ रू. किलो मिळतो. सर्वसाधारण एकरी ७० - ८० हजार रू. खर्च करून ३ ते ३॥ लाख रू. उत्पन्न मिळते.