द्राक्षाच्या विकृतीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा आगळा - वेगळा अनुभव
श्री. सिताराम देवराम चव्हाण, मु. पो. दरसवाडी , ता. चांदवड, जि. नाशिक
मी द्राक्षेबागेमध्ये नवीनच शेतकरी आहे, ३८ गुंठे जमिनीत थॉम्पसन सिडलेस या जातीची
लागवड केली आहे. पहिल्या वर्षी बागेला माल आलाच नाही. यावर्षी टोमॅटोसाठी व मुगासाठी
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरली होती. त्याचा मला खुप फायदा झाला. त्यावरून मी
द्राक्ष बागेसाठी हि औषधे वापरण्याचे ठरविले.
सुरूवातीपासून द्राक्षबागेसाठी ही औषधे वापरील आहे. आपल्या कंपनीचे प्रतिनिधी ८ ते १० दिवसाला बागेला भेट देतात. सध्या द्राक्षबाग अगदी उत्तम आहे. फुगवण अतिशय चांगली आहे. पाने रुंद, हिरवीगार आहेत दरसवाडी गावातील शेतकरी आश्चर्याने बागेकडे पाहतात. दुसऱ्या डिपींग वेळी नजरचुकीने माझ्याकडून डिपींग द्रावणामध्ये जास्त प्रमाणात कलर टाकला गेला. डिपींगनंतर शेवटच्या तीन ओळीतील घडांचे मणी करपून गेले. घड वेडेवाकडे झाले. नंतर कंपनीचे प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे मी त्या तीन ओळीतील घड जर्मिनेटर + राईपनर प्रत्येकी (५ मिली / लि.) द्रावणामध्ये डीप केले. २ ते ३ दिवसातच मण्यावरील करपट डाग निवळून मण्यांनी फुगवण सुरू झाली व घड सरळ झाले. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.