शेतकऱ्यांच्या व सामान्यांच्या 'जीवनाची पहाट' (The Dawn of Life)

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


पुर्वीच्या काळी (२०० - ४०० वर्षापूर्वी) विविध धर्माचे संत महात्मे जगभर आपल्या विचारांना जीवनशैलीला सुयोग्य वळण देण्यासाठी माणसाचे जीवन ऐहीक किंवा व्यवहारी सुखी किंवा खुशाल चेंडू न होता त्याला मानवतेची शिदोरी आणि माणूसकीचे लोणचे व मीठ दिले तर जीवन शैली ही अधिक रुचकर होईल अशी भावना अनेक संत, माहात्म्यांमध्ये झाली आणि विशेष करून भारतात ही रूढी १३ व्य शतकापासून वेगाने प्रसारित झाली.

कालांतराने माहिती विस्तृत मिळावी यासाठी वाचनाचा व लिखाणाचा शिक्षण क्षेत्रातून प्रसार सुरू झाला. अनेक माध्यमे (देशभरातील विविध भाषांतून) सुरु झाली. या माध्यमाचा विचार करून सुसंवाद सुरू झाले. मग त्यातील जे विचार पटतात त्यातून स्वतःची वैचारिक बैठक निर्माण केली आणि संत महात्मे यांची विचार आणि कृती (वाणी आणि कृती) (त्यामध्ये आजच्यासारखी परिस्थिती नव्हती) त्यामुळे शिक्षणाने माणसाच्या जीवनात उत्क्रांती झाली.

मार्कोनी या शास्त्रज्ञाने रेडिओचा जेव्हा शोध लावला तेव्हा रेडीओ हा माणसासारखा भाषण करतो, स्फुर्ती देतो, माणसास प्रेरणा देतो. त्यानुसार माणूस विचार करतो व कृती करतो. म्हणजे प्रथम हे श्रवण माध्यम हे माणसासारखा विचार करते हाच पहिला विज्ञानाने दिलेला सुखद धक्का होय. रेडिओ या माध्यमातून लोक शिक्षणाचे अनेक प्रकारे, शोध व बोध यांची विविधता, सर्वसामान्य माणसांनी त्याचा वापर चांगल्या प्रकारे करून ज्ञान देणारा ज्ञानाचा खजिना म्हणून त्याकडे पाहू लागले. त्या काळातील तरुण पिढी मनोरंजनाचे एक साधन म्हणून त्याचा वापर करू लागली. त्याने माणसाच्या जीवनाला आनंद मिळू लागला. विचारांना धार लागली. अशा रितीने रेडिओने क्रांती केली.

शिक्षण शास्त्रामध्ये एक म्हण आहे, की लिखाणाने व वाचनाने बुद्धीमत्ता ही प्रगल्भ होते. १० वेळा वाचनाची २ वेळच्या लिखाणाने बरोबरी ठरते. परंतु शिकवण व रेडिओने केलेले भाषण हे एकदा ऐकले तर ते १० वेळा वाचण्यासारखे आहे. म्हणजे ज्ञानाच्या वृद्धीमध्ये वाचन, लिखाण यापेक्षा श्रवण याला महत्त्व आहे. म्हणून गुरुशिष्याचे नाते हे श्रवणाने जोडले आहे.

जसजशी ऐहिक विज्ञान प्रगती होत गेली तशी प्रसारणाची विविध माध्यमे निर्माण झाली. जसे रेडिओ, ट्रांझिस्टर, टीव्ही, लाऊडस्पिकर, संगीत, व्हिडीओ, ऑडीओ, सीडी, डीव्हीडी अशारितीने अनेक प्रकारची माध्यमे ही मानवाला सुज्ञ करू लागली. नंतर फेसबुक, टिवटर, वायफाय आले. तसेच विविध टीव्ही चॅनलच्या माध्यमांचा वापर ज्ञानप्रसारासाठी केला. विचारवंत, शास्त्रज्ञ, राजकारणी लोक यांनी आपले विचार व प्रबोधन जनतेमध्ये रुजण्यासाठी प्रसारण माध्यम म्हणून याचा वापर करू लागले व त्याचा अनुभव चांगला आला.

वर उल्लेख केलेले १ वेळचे ऐकणे हे १० वेळा वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते. तेव्हा शेती शाश्त्रात रेडिओ या श्रवण माध्यमापेक्षा रंगीत चित्रफिती दुरचित्रवाणी या माध्यमाचा वापर जास्त परिणामकारक ठरला व त्यामुळे लोक त्याचे प्रयोग आपआपल्या शेतात करू लागले. ही प्रयोगशीलता जगभर कृतीत उतरून पाश्चात्य राष्ट्र अमेरिका, युरोप, जर्मनी या राष्ट्रांनी जी प्रगती केली ती या माध्यमाद्वारे केली आणि इस्त्राईल या राष्ट्राने मात्र कठोर परिश्रमाद्वारे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत चिकाटीने प्रयत्न करून कृषी क्षेत्रात यश निर्माण करून साऱ्या जगाला आशेचा नवा मार्गप्रदिप दाखविला. ही प्रगतीशीलता ही विकसनशील व विकसीत राष्ट्रात प्रायोगिकता करून दाखविली.

मी एका ठिकाणी मागे उल्लेख केला आहेच की, शेती ही अवघड शास्त्र व कठीण कला आहे आणी ती यशस्वी करण्यासाठी अद्ययावत इत्थंभूत माहिती तंत्रज्ञान नियोजन कार्यक्रम आणी कृतीयुक्त आराखडा मिळावा यासाठी श्रवण माध्यमाचा वापर करून शेतकऱ्यांचे चालू (Current) जे काही प्रश्न असतील ते जर आपणास सोडविता आले तर 'पहाट' नावाचे सदर सुरू करण्याचा प्रयोग ४ महिन्यापासून सुरू केला आहे. त्याचा ओझरता उल्लेख कृषी विज्ञानमध्ये केला आहे.

ज्याप्रमाणे शेतीची प्रश्नोत्तरे याचा विविध चॅनेलवर २० मिनिट ते ३० - ४५ मिनिटांपर्यंत प्रबोधन दिले जाते. ते अतिशय उपयुक्त ठरत असते. म्हणून शेतकऱ्यांच्या जीवनात येणारे प्रश्न व विविध प्रसंग आणि त्यात्या हंगामातील करावयाची पिके त्याबद्दलचे तांत्रिक मार्गदर्शन केलेल्या प्रगयोगांचे निरीक्षण व त्याचा करावयाचा अवलंब या विषयी वेळोवेळी उचीत विषय मग ते पीक, पर्यावरणाचे प्रश्न, सेंद्रिय शेती, मुल्यवर्धन, अधिक दर्जेदार उत्पादन, विपणन, बाजार भावातील चढउतार गावोगाव, देशोदेशी विविध हवामानात, विविध प्रकारच्या जमिनीत आंतरपिके, मिश्रपिके, फेरपालट, कमी खतात, कमी पाण्यात, कमी निविष्ठांमध्ये विषमुक्त Nutramul, Nutraceutical जनावरे, मधमाशा, रेशीम पालन असे एक ना अनेक विषय यांची माहिती, पिकांवरील कीड- रोग, संजीवके, व्यवस्थापन, यांत्रिकीकरण, खत निर्मिती, सेंद्रिय शेती, जैव वैविधता, जैव अभियांत्रिकी, जैवशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र, दूध तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकीकरण, शेती व्यवस्थापन, उत्कृष्ट विपणन, शेतीचे अर्थशास्त्र, फलोद्यानशाश्त्र, सेंद्रिय खते, नैसर्गिक शेतीशास्त्र असे अनेक विषय आपल्याला पुढील काळामध्ये हाताळायचे आहेत. हे सदर सुरू करण्याचा हेतू हाच होता की, काळाच्या ओघात लो.कांना हवे असणारे ज्ञान व मार्गदर्शन प्रात्यक्षीक (Practical) वेळेत ताजे मिळावे, या हेतूने 'जीवनाची पहाट' (The Dawn of Life) हे प्रबोधनाचे सदर शेतकऱ्यांसाठी सुरू केले आहे.

www.drbawasakar.com ही २००० पानाची वेबसाईट आहे. त्याला जोडून 'पहाट' क्लीक केले की, युट्युबवर दर गुरुवारी प्रसारीत होणारे हे सदर सर्व बंधुभगिनींना ऐकता येईल. असे २० विषय (मराठी + इंग्रजी) झाले ते पुढीलप्रमाणे -

१ ते ३) कृषी उत्पन्न बाजार समितीस पर्याय

४) मनुष्य बळ व्यवस्थापन

५) पक्षांचे महत्व

६) अधिक पावसात पिकांची घ्यावयाची काळजी

७) ऊर्जा ही मानवाची दुसरी धमनी

८) प्रगतशील शेतकऱ्यांनी काय करावे

९)जैविक कुंपण

१०)लिंबाच्या हस्त बहाराचे नियोजन

११) आठवडे बाजाराची यशस्वी वाटचाल

१२) अती पावसानंतरचे पीक नियोजन

१३) अती वृष्टीचा आनंद

१४) आले, हळद आणि कांदा पिकांचे नियोजन

१५)हरभरा लागवडीचे नियोजन

१६) आंबा बागेचे व्यवस्थापन

१७)कपाशी खोडवा (फरदड) असा घ्यावा

१८)गहू लागवड

१९)धान थ्राईवरचा फायदा (अ, ब, क)

२०) संत्र्याचा आंबे बहार

१९ वी पहाट मध्ये 'बेस्ट फ्रॉम वेस्ट' हा सात्विक हेतू आहे. म्हणून या सदराचा लाभ घ्यावा. आपल्या उपयुक्त सुचना व आपल्याला झालेल्या फायदा हे आम्हास कळवावे म्हणजे हे वन वे ट्राफिक सारखे न राहता टूवे ट्राफिक असावे. 'कृषी विज्ञान' मासिक हे तर वाचनाचे माध्यम आहेच. त्याच्या जोडीला अतिशय उपयुक्त असे 'पहाट' या सदराची सुरुवात केली असून याने आपल्या जीवनात 'सुखाची पहाट' निर्माण व्हावी हीच एक परमेश्वर चरणी प्रार्थना !