'आम' आदमी का "आम" और सारी दुनिया का भी - केशर!

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


फळांचा राजा 'आंबा' आणि आंब्याचा राजा 'हापूस' हे समीकरण गेल्या ५० वर्षापासून झाले आहे. याची लागवड सर्वप्रथम भारतीय किनारपट्टीवर केली गेली. किनारपट्टीवरील समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचा झोत या आंब्याच्या विविध अवस्थांतून जात असल्याने खाऱ्या वाऱ्यामुळे याला विशिष्ट स्वाद व गोडी तयार झाल्यामुळे हा हापूस भारतीय माणसांच्या मनामध्ये विराजमान झाला. परंतु जसे हवामान बदलत गेले तसे उन्हाळ्यातील तापमान हे ३८ - ४० ते ४५ डी. से. पर्यंत गेले येथे या आंब्यामध्ये 'साका' (देठापासून १ इंच आंब्याच्या फुगीर बागाजवळ पांढरी स्पंजयुक्त पेशीची वाढ) वाढण्याचे प्रमाण वाढू लागले. त्यामुळे या आंब्याला धब्बा बसला.

१९५० ते १९६० च्या काळात हा आंबा खुल्या बाजारपेठेमध्ये ३० ते ५० रुपयाला ४ ते ६ डझनची पेटी मिळत असे आणि त्यातील ९० ते ९५ % आंबे चांगले निघत. विशेष म्हणजे याला त्यावेळी फक्त सेंद्रिय खते वापरली जात. त्यामुळे त्याची टिकाऊ क्षमता अधिक होती. तेव्हा त्या काळामध्ये हापूस पिकल्यानंतर सुरकुत्या पडल्यानंतर आणि याला थोडी कोयीस दशी आहे तरी गरापासून साल सहजपणे अलग होत असे. असा आंबा पेटीतच २० दिवस चांगला अवस्थेत राहत असे. तसेच गर जर पिळला तर कोय लगेच सुटी होत असे. मात्र यातला एक दोष असा कि हापूसला दरवर्षी फळे येत नाहीत. ही समस्या सर्वसाधारण शेतकऱ्यांना भेडसावत असे. यातून मोहर आला तरी मोहर गळत असे. बहुतांश करून कोकणातील बागा ह्या २० -३० वर्षाच्या तर ५० वर्षाच्या आहेत.

७० ते ८० - ९० च्या काळात लोकसंख्या वाढली तसे पुरवठा कमी झाल्याने आंब्याचे दर मध्यम माणसाच्या आवाक्याच्या पलिकडे जाऊ लागले. त्यामुळे उत्पदान वाढविण्याच्या दृष्टीने विविध योजना अंतर्गत लागवडी वाढविण्यासाठी जिल्हा परिषदा, महाराष्ट्र शासन व केंद्र शासना अंतर्गत सबसिडीवर याच्या लागवडी वाढू लागल्या. फळबाग योजनेत पुण्यातील हवेली. मावळ तसेच इतर काही पाण्याची उपलब्धता असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी हापूस लागवडीचे क्षेत्र वाढले. परंतु कोकणपट्टीचा किंवा राजापूर - देवगडच्या हापूसलाच स्वाद फक्त आहे तोच राहिला. इतर ठिकाणचा हापूस हा डावा समजला जाऊन किंमत (दर) कमी मिळू लागले पण भात शेतीपेक्षा याचे उत्पन्न जास्त व बांधावर आणि माळरानावरील लागवडीतून पैसे मिळू लागल्याने दर कमी मिळाला तरी शेतकरी खूष होत.

पावसाचा अनियमितणा - काळ, वेळ, एकूण पावसाचे मान, थंडीची सुरुवात यात विविधता निर्माण झाल्याने मोहर न निघण्यात निर्माण होणाऱ्या विविध समस्यामुळे मोहर गळ होणे, कोळशी येणे, माव्याचा थंडी व धुक्यात होणारा प्रादुर्भाव व माव्याने विष्टेवाटे टाकलेला पदार्थ मुंगळ्यांनी खाऊन यामध्ये लागलेल्या मोहराचे १० % सुद्धा फळात रूपांतर होत नसे. त्यातच संक्रातीनंतर सुर्य ज्यावेळेस दक्षिणायनातून उत्तरायनात जातो तेव्हा दिवसाचे तापमान ३० ते ३६ डी. से. ४२ डी.से. कोकणापासून ते विदर्भापर्यंत आणि मराठवाड्यापासून उत्तरमहाराष्ट्रापर्यंत वाढते. या काळात कैरी फळे मध्यम लिंबू ते संत्र्याएवढी असतात. विशेष करून सुर्य ज्यावेळेस मार्चपासून पश्चिमेकडे दुपारी ३ नंतर कलतो तेव्हा सुर्याचा तीव्र प्रकाश फळांवर पडल्याने देठापासून वरच्या भागावर ३६ ते ४० डी. से. तापमानामुळे साका निर्माण होण्याची प्रक्रिया जलद होते. म्हणून या १९७० ते १९८० च्या काळात वाढलेले रोग - कीड, देशी जनावरांचे घटलेले प्रमाण यामुळे शेणखताचा वानवा निर्माण झाला. त्यामुळे साक्याचे प्रमाण वाढले. रासायनिक प्रक्रिया वाढल्याने फळांच्या दर्जावर विपरीत परिणाम मोठ्या प्रमाणात झाला आणि हा कोकणचा फळांचा राजा 'हापूस' याविषयी लोकांमध्ये उत्सुकता कमी झाली. त्यामुळे 'हापूस' चा प्रसार थंडावला. सुरुवातीला पहिली पेटी वाजत गाजत ४ ते ६ हजारापासून १२ हजारापर्यंत पोचणारा हापूस मार्च ते मे अखेर साका लागलेला १२०० ते १६०० रू. ४ डझन आणि एरवी ४०० ते ६०० रुपये डझन असा स्थिरावतो. अधिकतम कृत्रिम पद्धतीने म्हणजे कॅल्शिअम कार्बाईड (Calcium Carbide) मार्केटमध्ये याला 'कार्पेट' या नावाने ओळख असलेल्या पदार्थाने झटपट पिकविला जातो. त्याने आंबा बेचव व प्रकृतीस कॅन्सर होतो. म्हणून बंदी आहे. ज्यावेळेस एप्रिल अखेर ते मे च्या पहिल्या आठवड्यात बलसाड (गुजरात) हापूस, कर्नाटक (लाल बदामी) हापूस मार्केट मध्ये येऊ लागल्यावर किरकोळ ३०० ते ४०० रू. डझन असा होऊ लागून मध्यम मध्यम वर्ग, खालचा मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग याच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला, म्हणून लोक नव - नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन व दर्जा वाढवू लागले. यामध्ये रासायनिक प्रक्रिया करू लागले, त्याने उत्पादन वाढले मात्र आकार कमी झाला. तरी दर वर्षी फळे कमी अधिक लागण्याचे प्रमाण वाढले व झाडांचे वयावर व आरोग्यावर दुष्परिणाम रासायनिक औषधामुळे अधिक झाला. परंतु याला जेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा आधार घेतला, तेव्हा आकार, दर्जा, उत्पन्न आणि नफाही वाढला. तसेच टिकाऊपणा वाढला, परंतु हे सर्व शेतकऱ्यांना साध्य होऊ शकले नाही. कारण आंबा बागायतदारांना दसरा - दिवाळीनंतर आंब्याच्या शिफारसी, निविष्ठा यांच्या वापराच्या काळात कोकणातील दुकानामध्ये हे तंत्रज्ञान ठेवले जात नाही. कारण बाग ह्या आतील दुर्गम भागात असतात. तेव्हा कंपनी प्रतिनिधी आतल्या गावात कुणकेश्वर, देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तालुकावार अशा भागात खोल्या भाड्याने घेऊन तेथे आपल्या निविष्ठा ठेऊन बागायतदारांना माहिती देऊन उधार वाटत असत आणि आंबा बागायतदारांचा माहिती देऊन उधार वाटत असत आणि आंबा बागायतदारांचा माल मार्केटला विकल्यावर जूनमध्ये पैसे जमा करण्यासाठी कंपन्यांना पुन्हा जावे लागत असे. या विविध समस्यांना हापूसला सामोरे जावे लागत असल्याने मागणीपेक्षा पुरवठा वाढीमध्ये दर्जाचा ऱ्हास झाला आणि हापूसला पर्याय शोधण्यास शास्त्रज्ञांचे पर्यांच सुरू झाले आणि यामध्ये गुजरातमध्ये केशरचा जन्म झाला.

'आम' आदमी का 'आम' केशर …. !

केशर हा थंडीमध्ये बहार येणारा, हवामानातील कमी बदलाला प्रतिकारक असा वाण आहे. जेथे हापूस १० % टिकला नाही तेथे मराठवाडा, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा ट्रॉपीकल (Tropical) हवामानात हापूसपेक्षा बऱ्यापैकी उत्पादन देऊन स्थिराऊ लागला. महाराष्ट्रातील १५ ते २० जिल्ह्यात फळबाग लागवडीत याला अनुदान मिळू लागले. लोक पारंगत झाले. गेल्या २० वर्षात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून या भागातील शेतकऱ्यांनी अतिशय चांगले उत्पादन मिळविले आहे. (अधिक माहितीसाठी पान नं.३६ वरील संदर्भ पहावेत. )

केशरची वैशिष्ट्ये म्हणजे याला साका होत नाही, याची साल हिरवट असली तरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने गर केशरी असून स्वाद अतिशय उत्तम मिळतो. गर सहज सुटणारा टेबल पर्पस (फोडी करून खाण्याजोगा), प्रक्रिया उद्योगात, विविध प्रकारची पेये तयार करण्यात तोतापुरीपेक्षा श्रेष्ठ वापार होऊ शकतो. देशांतर्गत मार्केटला गरीब ते मध्यम वर्गापासून श्रीमंतांना आरोग्यदायी, आनंददायी खिशाला परवडणारे असे हे फळ आहे. गेल्या १० ते १५ वर्षामध्ये मराठवाडा विद्यापीठाने तसेच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बऱ्यापैकी योगदान देऊन उत्पन्न व दर्जाचे मानदंड पाळून निर्यातीमध्ये हापूसपेक्षा काकणभर सरसच ठरले, कारण केशरचे फळ हे लांबट, साधारण ४" ते ५" उंचीचे टोकास लगेच निमुळते होणारे देठाजवळ पिवळे असून संपूर्ण फळा हिरवे असते. तसेच फळ घट्ट, वजनदार फुगलेले असते. आतून संपूर्ण पिकलेले व गर केशरी असलेला एकसारखा साखरेसारखा गोड असतो. याची कोय निमुळती व चपटी असते हा बराच काळ पिकल्यानंतरही हिरवा राहत असल्याने काढणीनंतर १८ ते २० दिवस टिकतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियापासून वॉशोंग्टन, कॅलिफोर्निया आणि फिलीपाईन्सपासून हाँगकाँग, बँकॉक, चीन, जपानपर्यंत आठवड्यात पोहचू शकतो. म्हणजे तरी तो तेथे जागतिक मार्केटमध्ये ८ ते १० दिवस स्थिराऊ शकतो.

केशर आंब्याची पाने जाड, पन्हाळीसारखी, अरुंद, लांब, शिरा स्पष्ट असलेली गर्द हिरवी व झाड डेरेदार असते. चौथ्यावर्षी केशरला हमखास बहार येतो. १०० - २०० फळे हमखास धरता येतात. केशर चांगला येण्यासाठी जून महिन्यात लागवड करण्याकरिता पाव किलो कल्पतरू सेंद्रिय खत, १ चमचा प्रोटेक्टंट खड्ड्यात मातीत मिसळून टाकवे.

सुपर फॉस्फेट पाव किलो चालू शकते. कलम जून, जुलै (आर्द्र नक्षत्रात) महिन्यात १५ ' x १५' वर लावावे. खड्ड्यात कलम लावून खड्डा दाबावा व त्यावर जर्मिनेटर ३० मिली व प्रोटेक्टंट १ काडीपेटी, १० लिटर पाणी या प्रमाणात व आठवड्याने फवारणी घ्यावी. परत १ महिन्याने ४० मिलीचा डोस फवारावा. तिसरी फवारणी दसऱ्याच्या सुमारास घ्यावी. त्याचवेळेस पाव किलो कल्पतरू खत परत द्यावे. म्हणजे झाडांची मर होणार नाही. यामध्ये आंतरपीक म्हणून टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर, मिरची, ढोबळी मिरची अशा प्रकारची २ ते ३ महिन्यात येणारी किंवा उन्हाळ्यात मेथी कोथिंबीरीसारखी पिके करावीत. पाणी ठिबकने आवश्यक तेव्हा प्रत्येक झाडास ३ ते ४ लिटर बसेल असे द्यावे. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी वरीलप्रमाणेच कल्पतरू खताचे प्रमाण वाढवून ५०० ग्रॅमचा डोस देऊन सप्तामृताच्या फवारण्या कराव्यात.

केशरला दुसऱ्या - तिसऱ्या वर्षी आलेला मोहोर काढून टाकावा. चौथ्या वर्षी फळे धरावीत. तेव्हा झाडाचा घेर १० फुटापेक्षा जास्त असेल आणि खोड पोटरीसारखे जाड असेल यावेळी अर्धा किलो कल्पतरू खत टाकावे. मांडीएवढे जाड खोड झाल्यास किलोभर कल्पतरू खत द्यावे.

फवारणी :

१) पहिली फवारणी : (जूनमध्ये) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी २०० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (दसऱ्याच्या सुमारास) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी २०० मिली. + १०० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : गुंडी गळ होऊ नये म्हणून व मोहोर लवकर यावा म्हणून - (डिसेंबर मध्ये) : जर्मिनेटर ५०० मिली. + थ्राईवर ५०० मिली.+ क्रॉंपशाईनर ५०० मिली. + राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली. + १०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : वाटाण्याएवढे फळ पोसण्यासाठी व बुरशी लागु नये म्हणून : थ्राईवर ६०० मिली. + क्रॉंपशाईनर ६०० मिली. + राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ४०० मिली. + हार्मोनी २०० मिली. + १०० लि.पाणी.

५) पाचवी फवारणी : (लिंबाएवढी फळे झाल्यावर घ्यावी) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी २०० मिली. + १०० लि.पाणी.

६) सहावी फवारणी : फळ काढायच्या अगोदर १ ते दीड महिना म्हणजे फळांचा आकार वाढून गोडी वाढण्यास मदत होते व फळ नासत नाही.

१ लिटर थ्राईवर + १॥ लिटर क्रॉंपशाईनर + ६०० मिली राईपनर + ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट + १ लि. न्युट्राटोन + २५० मिली हार्मोनी + १०० लिटर पाणी.

गेल्या ४ - ५ वर्षाच्या अनुभवातून जागतिक मार्केटमध्ये हापूसला प्राधान्य देत तसेच केशर आंब्याची गोडी आपलीशी वाटू लागली व त्याप्रमाणे त्याच्या आयातीची मागणी नोंदवू लागला. म्हणून भारतातील अधिक गरीब ते अधिक गरीबांचे श्रीमंत राष्ट्र म्हणजे भारताबरोबर विकसनशिल व विकसित थायलंड, फिलिपाईन्स, ब्राझील, फ्रान्स, ईटली, इंग्लंड, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर अशा राष्ट्रांना हा आवडता आंबा होऊ लागला. मी स्वत: दोन वेळा अमेरिकेत गेलो तेव्हा तेथे असे अनुभवले की, ब्राझील, चिली, थायालँडचे आंबे मॉलमध्ये विक्रीस येत असत ते आंबे भारतीय हापूसपेक्षा चवीस अतिशय सपक असून त्यांचा आकार व दर्जा कमी होता. कारण बहुतेक भारतीय आंब्याचे स्टँडर्ड क्वॉरंटाईल (फायटोसॅनिटरी) झाले नसावे पण आता पाश्चात्य व पुर्वेकडील विकसित देश ही भारतीय आंब्याची मागणी करू लागले आहेत. हे आपल्या कृषी प्रगतीचे द्योतक आहे. पण हे अधिक चांगले तेव्हा ठरेल जेव्हा उन्नत. मुल्यवर्धन (Value Addition) प्रक्रिया करून जगभर निर्यात होईल तेव्हा हा आंबा जगातील हमखास १०० हून अधिक देशात लोकप्रिय होईल. जपानमध्ये सुनामी भूकंप येऊनही या वर्षी एवढ्या संकटातही जपानी लोक भारतीय आंब्यास विसरले नाही. त्यातही हापूसपेक्षा सारे जग नवीन अधिक उन्नत जात निर्माण होईपर्यंत केशर आंब्याचीच चव आम जनतेच्या तोंडात रुळत राहिल आणि अशा रितीने 'केशर' हा 'आम' आदमीका 'आम' सारी दुनियाका 'आम' होऊ लागला आहे.