हवामान बदलातील संक्रमणाने कृषी क्षेत्रातील झालेले बदल

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


गेल्या ३ वर्षापासून दुष्काळ हा सतत शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही. असे अनुभवास येत आहे. साधारण उन्हाळ्याचा काळ हा संक्रांतीनंतर म्हणजे प्रत्यक्षात २३ डिसेंबरनंतर सुर्य दक्षिणेकडून उत्तरायणात पदार्पण करण्यास सुरुवात होते. त्यानंतर संक्रांतीनंतर दिवस हा तिळाटिळाने वाढायला सुरुवात होते. थंडीचा मौसम हा महाशिवरात्रीनंतर संपतो असा एक संकेत आहे. ज्यावेळेस मार्च महिना लागतो तेव्हा उन्हाळ्याची चाहूल लागते आणि कमाल तापमान थंडीत जे १६ ते १७ अंश सेल्सिअस (डिसेंबर - जानेवारी) असते ते मार्चमध्ये ३२ ते ३६ अंश सेल्सिअस व किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअस होते.

एकदा होळी पेटली की, हेच तापमान ३२ अंश ते ३६ अंश सेल्सिअसवरून विदर्भ, मराठवाडा, खानदेश, बिहार, कर्नाटक, उत्तरप्रदेश, राजस्थानातील ४२ ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढत जाते. पुढे एप्रिल - मे पर्यंत ते स्थिर होते राहते आणि मे नंतर जेव्हा मृग ७ जूनला लागतो व २२ जूनला संपतो तर या काळात १९५४ पासून ते १९७० च्या दशकात दर १० वर्षामध्ये ६ वेळा मृग १० ते १५ -२२ जूनपर्यंत व आद्राचे पहिल्या चरणात २२ जून ते ४ जुलै पर्यंत हमखास पेरणी होत असे. याचे कारण हवामानाचे जे मापदंड (परिमाण) होते ते एकसारखे होते. त्या - त्या काळामध्ये स्थिर असत. त्यामुळे पावसाचे मान आणि पावसाचा काळ व एकून शेतीचे नियोजन हे सहसा चुकत नसे. भात, ज्वारी, बाजरी अशी खरीपातील तृणधान्य पिके तसेच तेलबिया पिके - भुईमूग, तीळ, सुर्यफूल, कारळे (खुरासणी), तिळानंतर काळात आलेले सोयाबीन तसेच कडधान्ये - तूर, मूग, उडीद, चवळी, मटकी, वाटाणा, मसूर ह्या पिकाची खरीपात वेळेवर लागवड होत असे. ही पिके ३ ते ५ महिन्यात निघत असत. याच्यामध्ये खते, फवारण्या, आंतरशागत ही सुखकर होत असत. नवरात्रात थंडीचे चाहूल लागण्याअगोदर करडईचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असे. पाऊस लवकर सुरू होऊन लवकर संपत असे व नवरात्रातील पहिल्या माळेला रब्बीची पिके गहू, हरबरा, जवस, रब्बी ज्वारी (दादर किंवा शाळू) ही पिके दसरा (सप्टेंबर अखेर ते ऑक्टोबर अखेर) पेरली जात व मूग, मटकी काढल्यावर ही पिके नुसत्या ओलाव्यावर व दवावर येत असत. तेव्हा काळ्या कसदार जमिनी यामध्ये शेणखत, कंपोस्टखत व तत्सम सेंद्रिय खते वापरण्याचे प्रमाण अधिक असल्याने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण बऱ्यापैकी राहून पाणी धरण्याची क्षमता जास्त असून खरिपात पडलेल्या पावसाची रब्बीत ओल टिकून राहत असे व या ओलीवर गहू, हरबरा, रब्बी ज्वारी ही पिके ३।। ते ४ महिन्यात बऱ्याच अंशी कोरडवाहू जमिनीत व काहीवेळा २ ते ४ संरक्षित पाणी देवून उत्पन्न १० ते १५ क्विंटल येत असे.

कापसाची लागवड ही सुद्धा वेळेवर होवून दसरा - दिवाळीत पहिली वेचणी होत असे, पण या तीन महिन्यामध्ये लोक अज्ञानाने किडी व रोगापासून कापसाचे संरक्षण होण्यासाठी दर आठवड्याला रतीब घातल्यासारख्या फवारण्या करीत असत. तो काळ मेलॅथिऑन, एंडोसल्फानचा होता. याच्या सतत फवारण्याने कीड न हटता तिने औषध पचविले.

ग्लोबर वार्मिंगमुळे निसर्ग बदलत गेल्याने २ महिने पाऊस लांबला, पेरण्या उशीरा होऊ लागल्या, पावसाचे मन कमी झाले, विहीरींना पाणी कमी पडू लागले. नंतर ४० ते ६० दिवसाचा जो एकूण काळ होता तो जुलैअखेर ते ऑगस्टमध्ये सुरू होऊन गणपती अथवा सप्टेंबरमध्ये तो परतीच्या मार्गाला लागला. या काळामध्ये खरीप पिकांना मोठ्या मुश्किलीने जिवदान मिळत असे. नंतर ठिबक, तुषार सिंचन केले जाऊ लागले. तरीही पिकाची भूक भागात नसल्याने शेततळ्याचा जन्म झाला. शेततळ्याच्या जन्मानंतर खरीप पिके यांना शेततळ्यातील पाण्याचा उपयोग ठिबक सिंचनातून सलाईन अथवा संजिवनीसारखा शेतकऱ्यांना, कंपन्यांना, सरकारला वाटू लागला. या क्रांतीमुळे पारंपारिक उत्पन्नापेक्षा ३०% पासून ६०% पर्यंत उत्पन्न वाढले. पाण्यात ५०% हून अधिक बचत झाली आणि शेतकरी थोडा सुखावला. ही वाटचाल चालू असताना ७ - ८ वर्षाचा काळ शेतकऱ्यांना बरा गेला. या काळामध्ये फळबागांचे नियोजन श्रीमंत लोकांकडेच असे. उदा. द्राक्ष ही नाशिक भागातच होत असत. यानंतर सांगली जिल्ह्यात सुरू झाली. नंतर दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील शेतकऱ्यांनी पंढरपूर भागातील कासेगाव भागात पाणी बऱ्यापैकी असताना १० हजार रुपये एकराने जमिनी विकत घेतल्या व तेथे द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणावर वाढविली. तेथे दर्जा व उत्पन्न दोन्ही साध्य झाले. इथे मात्र द्राक्षाची निर्यात विशेषत: परदेशात होत नसे आणि जसे द्राक्ष शेतीचे क्षेत्र वाढू लागले तसा माल वाढू लागला. तेव्हा हवामानातील बदल जास्त नसत. तेव्हा गारपीट, वादळ हे औषधाइतकेही येत नसत. तेव्हा द्राक्ष शेती ही कष्टाची, अधिक गंतुवणुकीची पण अधिक सोयीची वाटत असे. क्षेत्र वाढल्याने उत्पादन वाढले. आधुनिक तंत्रज्ञानाने दर्जा सुधारला. सांगलीसारख्या भागामध्ये द्राक्षाचे रूपांतर बेदाणानिर्मितीत प्रयोग करून द्राक्षाचे मुल्यवर्धन झाले आणि त्यातून बेदाणा प्रक्रिया उद्योगाचा जन्म झाला. पण सुरुवातीच्या काळात बेदाण्याचा भाव हा ७० ते ११० रुपये पर्यंत स्थिरावला. महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये द्राक्ष शेतीमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर काटेकोरपणे झाल्याने सांगलीसारख्या भागामध्ये कमी पाण्यात, कमी निविष्ठांचा वापर करून, विषमुक्त, दर्जेदार, अधिक द्राक्ष उत्पादन झाल्याने इथली द्राक्ष सुरूवातीच्या काळात आखाती राष्ट्रांत प्रसिद्ध झाली व ती अशियन राष्ट्रांत भावली. शेतकऱ्यांना बऱ्यापैकी मोबदला मिळू लागला. परंतु जेव्हा द्राक्षापासून बेदाणा निर्मिती करण्याच्या प्रक्रियेत नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले, तस - तसे २५% निर्माण होणार बेदाणा १७ ते २१ दिवसाच्या काळामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ३३% पर्यंत होऊ लागला आणि यामुळे अलिकडच्या ५ ते ७ वर्षात द्राक्ष शेती ही गावोच्यागावी बेदाणामय झाली व ही गावे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा बेदाणा म्हणून ओळखली जावू लागली. या बेदाण्याला साऱ्या जगात दर्जा उत्तम असल्याने उच्चांकीचा भाव २५० रू. पर्यंत देशांतर्गत व जागतिक मार्केटमध्ये मिळू लागला. त्यामुळे त्यांना एकरी १० ते १५ लाख रुपये उत्पन्न मिळू लागले. सर्व शेतकरी बांधवांनी सेंद्रिय खतांचे नियोजन, सप्तामृत फवारणीचे प्रमाण व वेळ पाळल्याने भुरी व डावणीवरील विषारी महागडी औषधे कमी करून हार्मोनीचा वापर करून विषमुक्त द्राक्ष उत्पादन घेऊन सेंद्रिय बेदाणा म्हणून फार मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण झाली. त्यामुळे बेदाण्याचा शेतकरी हा जरा 'हाय प्रोफाईल' शेतकरी समजला जावू लागला. त्याच्या उलट नाशिक, लातूर, सोलापूर, पुण्याचा काही भाग व तत्सम महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक जिल्हे जिथे - जिथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले त्यांचा माल सार्क, आखाती, युरोप राष्ट्रांत निर्यात होऊ लागला. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने द्राक्ष विषमुक्त राहून शेतकऱ्यांना पैसे चांगले झाले, पण ज्यांनी विषारी औषधे वापरल्याने क्लोरोमॅक्वॅट क्लोराईड (Chloromequat Chloride -CCC) या विषारी घटकाचे प्रमाण द्राक्षात वाढल्याने नाशिकहून पाठविलेली द्राक्ष ८ महिन्यांनी ३८५ कंटेनर युरोपमधून बाद होवून भारतात परत पाठविले. यामुळे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना शॉक बसला. याकाळात हवामानातील बदलाचे परिणाम जसे पावसचे प्रमाण कमी होणे. थंडीमध्ये ढग येणे, धुक्याचे प्रमाण कमी - जास्त होणे, अवकाळी वादळाचे प्रमाण वाढणे, अवकाळी गारांचा पाऊस पडणे अशा अनेक अनपेक्षित संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले आणि कर्ज काढून खर्च करून त्या अवकाळी आपत्तीमुळे द्राक्ष शेती ही तोट्यात जावू लागली. ज्या भागात ही आपत्ती थोड्या प्रमाणात आली तेथील द्राक्षाचे बेदाण्यात रूपांतर करून पर्याय शोधला.

द्राक्ष शेती परवडत नाही हे जेव्हा शेतकऱ्यांच्या लक्षात आले तेव्हा ७० च्या दशकामध्ये डाळींब शेतीचा जन्म झाला. डाळींब हे पीक हलक्या, तांबुस जमिनीत उष्ण देशीय (ट्रोपिकल) काटक असल्याने कमी पाण्यावर येणारे असे एक कल्पवृक्ष फळपीक म्हणून सापडल्याचा आनंद शेतकऱ्यांना झाला. त्यावेळेस गणेश जात ही उदयास आली. इथे १० वर्ष या जातीने बऱ्यापैकी साथ दिली आणि निविष्ठा व एकूण खर्च हा आजच्या एकरी १ ते २ लाखाऐवजी एक लाखाच्या आत येवू लागल्याने १५ - २० रुपये/किलो भाव मिळून एकरी २ लाख रू. होऊन शेतकऱ्यांना गणेश ही जात आपली वाटू लागली. कारण ही जात घेण्यामध्ये उत्पन्न व पैसा दोन्ही मिळू लागले व आखाती राष्ट्र व सार्क राष्ट्र तसेच देशांतर्गत मार्केटमध्ये हे पीक सामान्य माणसाचे झाले. बहुजन कष्टाळू शेतकरी ८ महिने पाणी असणारे पाट पाणी देवून पुन्हा ७५% लोकांनी ठिबकचा वापर करून याचे क्षेत्र वाढले. सुरुवातीला १० ते २५ हजार रुपये असणारी वरकस जमीन ही आज एकरी या डाळींबापासून ३ ते ५ लाख रुपये मिळू लागल्याने ५ लाखापासून १० -२० लाख रुपये जमिनीचे भाव झाले.

गणेश जातीच्या १० वर्षानंतर आरक्ता व मृदुलाचा जन्म झाला. या जाती थोड्या कालावधीपर्यंतच चालल्या. कारण त्यानंतर भगवा ही क्रांतीकारी जात जिच्या फळांचा रंग भगवा, दाणे लाल बुंद, मऊ, रसाळ असलेले व वजनाला बऱ्यापैकी, आकर्षक व गोडीला चांगले असल्याने या जातीचा प्रसार झपाट्याने झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेशच्या काही भागात याचा प्रसार झपाट्याने होऊन हजारो एकर जमीन याच्या लागवडीखाली व १८ महिन्यात पहिले पीक घेता येवून देशांतर्गत भाव ४० - ८० रू. पर्यंत मिळू लागला आणि याचे मार्केट गुजरात, सुरत, दिल्ली, लुधियाना, मुंबई ही हुकमी मार्केट तयार झाली. इंदोर, अलाहाबाद, बेंगलोर, चेन्नई ही मध्यम स्वरूपाची मार्केट निर्माण झाली. बांग्लादेश, नेपाळ, कोलकता ही लहान मध्यम स्वरूपाची मार्केट निर्माण झाली. येथे २५० ते ३५० ग्रॅम वजनाच्या (कमी ग्रेडची बी किंवा सी +) फळाचे मार्केट निर्माण झाले. तथापि केरळमध्ये बी - ग्रेड लाही (२५० ते ३०० ग्रॅम) ६० ते ७० रू. किलो भाव मिळू लागले. केरळमधील दलाल शेतकऱ्यांचा प्लॉटवर येवून बागा घेवू लागले. परंतु या ५ ते ७ वर्षाचा समृद्धीचा काळ बघून निसर्गाची नजर याला लागली. तेल्या रोगाचा प्रादुर्भाव डाळींबावर कॅन्सरसारखा पसरून शेतकरी त्याच्या उपायावर अनेक प्रकारची मिश्रणे वापरून त्यावर मात करताना बेजार झाला. जसे द्राक्ष शेतीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने क्रांती केली, त्याचप्रकारे भगवा डाळींब व त्याच्या रोगावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर प्रतिबंधात्मक म्हणून केला. तेथे त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळाले व ज्या ठिकाणी १० ते २० % तेल्या आला व आजूबाजूच्या लोकांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा काटेकोर वापर केला, तेथे तो आटोक्यात आला, परंतु आता डाळींब बागायत दारांचे डाळींब शेती उत्पादन व संशोधन मंडळ गटागटाने, गावोगावी स्थापन करून या आधुनिक तंत्रज्ञानाचा (डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा) वापर व तत्सम उपाय याचे प्रबोधन करून याचे वेळोवेळी परिसंवादाचे आयोजन करून प्रात्यक्षिक प्लॉट (शिवारफेरी) दाखवून त्याचा अवलंब करून त्या समस्यांवर मत करता येईल. जसा उसाच्या - ७४० या जातीला बरेच दिवस पर्याय सापडला नाही. त्यानंतर ८६०३२ व नवीन जाती आल्या. त्याचप्रमाणे भगवा जातीला तेल्या व इतर रोग प्रतिबंधक जंगली जातींवर संकर करून (अनुवंशिक गुणांमध्ये बदल करून) निर्माण करणे हे शास्त्रज्ञांपुढे मोठे आव्हान आहे. अशा जातींची कलमे कमी किंमतीत शेतकर्यांना उपलब्ध होणे गरजेचे आहे. याच्या फळापासून ज्युस, औषध शास्त्रात अनेक उपयोग करून उपयोग करून डाळींब नुसते निर्यात - निर्यात न करता शास्त्रज्ञांनी व नेत्यांनी जगाच्या १०० वर्ष पुढे पाहिले पाहिजे व त्यादृष्टी ने सामान्य लोकांना वाट दाखविण्यासाठी दिपस्तंभासारखे काम केले पाहिजे. रोगमुक्त आणि विषमुक्त प्रगतीकडे आघाडी कशी घेतील यासाठी संशोधन, प्रसार आणि विकास या तिन्ही गोष्टींचा हातात हात घालून, वाटचाल करून, प्रबोधन करून, कृतीशिल कार्य करणे महत्त्वाचे आहे. म्हणजे डाळींब बागायती ही स्थिर होईल.

म्हणजे तृणधान्यपासून ते धागा निर्मिती पासून, तेलबिया, भरड डाळवर्गीय पिके, भाजीपाला पिके व विविध क्षेत्रातील नुकसानी (फेल्युअर) आहे. ती हवामानातील बदलामुळे ओझोनचा थर काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणे वाढतो. नंतर बर्फ वितळणे, थंडी येणे वातावरणातील आर्द्रता वाढणे, उष्णता वाढली की बाष्प होणे, याला थंडी लागली की अवकाळी पाऊस होणे, गारपीट होणे, तर काही ठिकाणी फयान वादळ होणे. तिसरी गोष्ट म्हणजे जालन्यासारख्या भागात स्टिल कारखानदारीचे औद्योगिकीकरण वाढल्याने उष्णतेचे प्रमाण वाढून पावसाळ्यात येणारे ढग याचे रूपांतर पावसात न होता परत वायुमय बाष्पात होऊन ते दुसरीकडे वाहू लागतात का ? जालना, बीड, औरंगाबाद, लातूर या ठिकाणी कधीही न होणारी गारपिट ती या ठिकाणी होऊ लागली आहे. अवकाळी पाऊस होऊ लागला आहे. या करिता कायम स्वरूपी तालुकानिहाय संरक्षण व उपायासाठी निधी कर्ज नव्हे आम जनतेच्या वर्गणीतून जसे शेतसाऱ्यावर आरोग्य, शिक्षण निधी लावतात तसा कायमचा निधी द्रारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड धारक लोक सोडून ७० - ८० कोटी लोकांवर जिवनावश्यक वस्तु सोडून सुख - चैन आणि चंगळ वस्तूंवर हा अधीभार लावून हा पंतप्रधानांचा वेगळा फंड जमा करून कुठल्याही प्रकारचे राजकारण न होता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा. म्हणजे ते परिस्थतीवर मात करतील. तात्पुरती सबसिडी अनुदान देणे हे त्यांच्या मतावर डोळा ठेवून करणे हे निशिद्ध आहे. याने शेतकऱ्यांना कुबड्या लावल्यासारखे होते. त्यामुळे ते कायमस्वरूपी संकटाशी मुकाबला न करता प्रखर मनोबल, प्रचंड जिद्दी व अथक प्रयत्न, अफाट कष्ट करण्याची गरज असते आणि 'शोधा म्हणजे सापडेल.' या नितीप्रमाणे संकटाचे भांडवल न करता परिस्थितीवर मात करण्यासाठी तिचा सुसंधीमध्ये वापर करून ज्या लोकांनी जग जिंकले त्यांच्या यशोगाथा प्रसार माध्यमातून त्याचा प्रसार करणे. अशा ठिकाणी प्रगतशिल शेतकऱ्यांच्या मंडळाच्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने सहली काढणे. म्हणजे यश हे दृष्टीक्षेपात येईल. यासाठी जागतिक बँकेकडून कर्ज काढू नये याकरिता असणाऱ्या उत्पन्नाच्या स्रोतातून हे भागविले पाहिजे. जसे बांग्लादेशातील दुष्काळनिधी जमविण्यासाठी एस.टी. व स्थानिक बस भाड्यावर ५ पैशाचा अधिभार लावला तसा कायमस्वरूपी लावावा म्हणजे अंदाजपत्रक नियोजनाला कृतीशिलतेची गती मिळेल व तो भार विकास निधी कमी पडण्यावर होणार नाही.