जर्मिनेटर ऊस रोपवाटिकेस वरदानच !

श्री. सुधाकर पांडुरंग यादव,
मु. पो. चिकाक, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर,
मोबा. ७८७५५४७४७१


मी जून २०१२ साली ऊस रोपवाटिका सुरू केली. सुरवातीस रोपवाटिके ज्ञान जुजबी होते. मात्र सातत्याने प्रत्येक लॉटचा अभ्यास करून रोपांची गुणवत्ता सुधारत गेलो. प्राथमिक अवस्थेत किंवा ट्रे मध्ये ऊस बेणे प्रक्रिया करून भरल्यानंतर उगवण क्षमता फारच कमी होते होती. त्यामुळे माझा उगवण क्षमतेचा प्रॉब्लेम फारच वाढला. त्यामुळे खूप नुकसान होऊ लागले. आता आपण व्यवसायात टिकू शकणार नाही असे वाटू लागले. मात्र न भिता व्यवसाय सुरू केला. शेवटी मार्केटमध्ये 'जर्मिनेटर' मिळाले.

जर्मिनेटर वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे उगवणशक्ती वाढली. कोंब जोमदार उगवू लागले. परिणामी पूर्वी पेक्षा माझ्या रोपांची गुणवत्ता चांगली सुधारली. तसेच माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक शेतकर्‍यास आळवणी करिता जर्मिनेटर वापरण्यास त्यांना सल्ला दिला. त्याचाही परिणाम शेतकर्‍यांना चांगलाच दिसून आला. त्यामुळे मला माझ्या व्यवसायासाठी 'जर्मिनेटर' एक वरदानच ठरले. त्यामुळे मी डॉ.बावसकर सरांचा शतश: आभारी आहे.

सर, मला अजून आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. ऊस रोपांच्या करीता (नर्सरीसाठी) साईंटिफीक प्रोडॉंक्टची गरज आहे. रोपांना जास्त पांढर्‍या मुळ्या, पावसाळ्यात येणारा पिवळसरपणा, हार्डनिंग व रोगप्रतिकार क्षमता वाढणे. यासर्व गोष्टींचे समावेशक असे आपण एखादे प्रोडॉंक्ट बनवावे अशी माझी अपेक्षा आहे. तसेच मी आपल्या कृषी विज्ञान मासिकाचा वर्गणीदार श्री. कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

सर, माझा ७ सप्टेंबर २०१२ रोजी सकाळी ७.०० वाजता 'साम' मराठी टी. व्ही. वरती अॅग्रोवन बातमी सत्रात माझ्या ऊस रोपवाटीकेची यशोगाथा प्रसारित झाली होती. सदर मुलाखतीमध्ये मी आपल्या 'जर्मिनेटर' या प्रोडॉंक्टचा वापर करीत असलेचे अवर्जून सांगितले आहे. कारण जर्मिनेटर हे आपले प्रोडॉंक्ट माझ्यासाठी खूपच उपयोगी पडत आहे.