नुसत्या पावसाच्या पाण्यावर १॥ एकर कोथिंबीरीचे १॥ महिन्यात ४० हजार

श्री. बिभीषण महादेव यादव,
मु. सावरगाव, पो. पात्रुड, ता. भूम, जि. उस्मानाबाद,
मोबा. ८५५४८६५१६७



मी चार वर्षापुर्वी गौरी गणपतीत दीड एकरमध्ये दोन पोते धना जर्मिनेटरमध्ये रात्रभर भिजवून सकाळी झाडाखाली. सावलीत सुकवून फोकल होता. नंतर कुळवाने सारे पाडले. त्यावेळेस पाऊस जोराचा झाला. त्यामुळे काही बी वाहून गेले तर काही दबले. तरीही जर्मिनेटरची प्रक्रिया केली असल्याने उगवण चांगली झाली होती. उगवणीनंतर साधारण १० दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५०० मिलीची १५० लि. पाण्यातून फवारणी केली. त्यामुळे वाढ झपाट्याने झाली. फुटवा अधिक झाला. त्यानंतर २ - ३ वेळा पाऊस झाल्याने पाणी देण्याची गरज भासली नाही. त्यावेळी जास्त पावसामुळे इतरांची कोथिंबीर मात्र सडली. आम्ही कोथिंबीर काढणीच्या ८ दिवस अगोदर दुसरी फवारणी सप्तामृताची केली. त्यामुळे कोथिंबीरीला जबरदस्त चमक आली होती. लोकल मार्केटला ८० ते १०० रू. किलो भाव मिळत होता. मात्र सर्व कोथिंबीर एकाचवेळी केल्याने काढणीस एकदम आल्याने लोकल मार्केटला माल संपेना म्हणून वाशी (मुंबई) मार्केटला पाठविली. तेथे एका हातात बसेल अशी साधारण पावशेराची गड्डी २० - २२ रू भावाने गेली. त्या कोथिंबीरीचे दीड महिन्यात ४० हजार रू. झाले.

अहमद-नगर जामखेड हायवेला प्लॉट असल्यामुळे खूप लोकांनी कोथिंबीरीच्या प्लॉटला भेट दिली.