प्रतिकूल परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे साप्तमृत व हार्मोनी हमखास उत्पन्नाची देते हमी

श्री. संजय मुक्ताजी पगार,
मु. पो. जोपुळ, ता. दिंडोरी, जि. नाशिक,
मोबा. ९७६३८०९५४०


गेल्या वर्षपासून मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून प्रत्येक वेळी उत्पादनात वाढ करत आहे व यशस्वी उत्पादन घेत आहे. खास करून मी मागील वर्षापासून द्राक्षासाठी वापर करत आहे. या औषधाची कमाल मागील वर्षापासून अनुभव आहे. त्याबद्दल मी सरांचे खरोखरच आभार मानतो. कारण त्यांनी अशी औषधे निर्माण केली की, जी शेतकऱ्यांसाठी खूपच लाभदायक आहेत. मला श्री. ईश्वर शिंदे यांच्याकडून या टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाली. त्यानुसार द्राक्षासाठी वापरून चांगले उत्पन्न काढू शकलो.

माझ्याकडे आज २ एकर थॉमसन जातीची द्राक्ष बाग आहे. प्रथम ऑक्टोबर छाटणी केली. पेस्टमध्ये १० लि. ला ३५० मिली जर्मिनेटर घेतले परिणामी डोळे एकसारखे लवकर व फुटी जोमदार निघाल्या. माझ्या बागेत शेंडा वाढीचा प्रॉब्लेम होता. पण दोन वर्षापासून पोंग्यात असताना जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी १ लि. चा २०० लि. पाण्यातून वापर केला. त्यामुळे शेंडा वाढू लागला. फुट चांगली व निरोगी सशक्त निघाली नंतर थ्राईवर, क्रॉंपशाईनर , हार्मोनीचा वापर केला. त्यामुळे घडांची साईज पण वाढली. गळ झाली नाही. खरोखरच हार्मोनीमुळे भुरी, करपा आलाच नाही व थ्राईवर, क्रॉंपशाईनर, हार्मोनी गळ व कुजीसाठी अत्यंत प्रभावशाली सरांनी औषधे आहेत. मी ते स्वत: अनुभवले.

तसेच घडांचे पोषण होऊन लांबी वाढण्यासाठी क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोनचे २ स्प्रे १० ते १२ दिवसांनी दिले. परिणामी पोषण होऊन लांबी वाढली आणि विशेष म्हणजे माझ्या बागेत शॉटबेरीज, पिकंबेरीज, सनबर्न आलेला नाही.

आता मी मागील वर्षी अनुभवाप्रमाणे पाणी उतरल्यावर क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोनचे दोन स्प्रे देणार आहे. त्याने रंग, गोडी, फुगवण होण्यास उत्तम मदत होते व अति थंडीमुळे कलर व गोडीची जी समस्या येते. ती क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन वापरल्यास येत नाही व इतरांपेक्षा चमक, गोडी अधिक मिळून दरही जात मिळतो. हे मी दोन वर्षापासून अनुभवत आहे. ह्या औषधाची प्रतिकुल परिस्थितीत उत्पन्न मिळवण्याची खरोखरच किमया आहे हे मी स्वत: अनुभवले आहे.

तसेच डिपींगमध्ये मला सुंदर रिझल्ट मिळाले. पहिली डिपींग जर्मिनेटर ५ मिली प्रति लिटरला वापरले तर त्यामुळे घडांची लांबी वाढली. दुसरी डिपींग प्रती लिटरला राईपनर ५ मिली आणि जर्मिनेट ३ मिली, तिसरी डिपींग प्रति लिटरला राईपनर ५ मिली आणि न्युट्राटोन ५ मिली प्रमाणे केली. परिणामी फुगवण अधिक होऊन कलर अप्रतिम आला.