खराब हवामानातही हार्मोनीमुळे डावण्या आला नाही

श्री. नारायण कृष्ण गांगुर्डे,
मु. पो. शिवरे बोराळे, ता. चांदवड, जि. नाशिक
मो. ९४२३९३०१५८


मी नारायण कृष्णा गांगुर्डे शिक्षक होतो. आता दोन वर्षापुर्वी रिटायर्ड झालो. अडीच एकर क्षेत्र आहे. त्यामध्ये दोन वर्षापुर्वी सव्वा एकर क्षेत्रात फ्लेम जातीची द्राक्ष लावलेली आहेत व सव्वा एक क्षेत्रात थॉमसन जातीची द्राक्ष आहे.

ऑक्टोबर २०१० मध्ये छाटणी केली, त्यावेळी एक प्रयोग म्हणून ३० लि. पेस्ट मध्ये १ लि. जर्मिनेटर घेतले व एक ओळ विना जर्मिनेटर घेता पेस्ट केली. परिणामी माझ्या असे निदर्शनास आले की फुट एकसारखी व जोमदार निघाली व ज्या एका ओळीला जर्मिनेटर वापरलेले नव्हते, त्यात फुट मागेपुढे निघाली.

पोंगा अवस्थेत असताना जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. फवारणी नंतर घडांची साईज मोठी झाली. गोळी घड झाले नाही. घड जिरले नाही. शेंडा वाढला. पानांची जाडी, रुंदी वाढली.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या डिपींगमुळे घड मण्यांना चमक लोक बघत राहतात

पाने जाड, रुंद झाल्यामुळे इतर बुरशीनाशके फवारणीचा खर्च कमी झाला. पहिल्या डिपींगमध्ये ५ मिली जर्मिनेटर १ लि. द्रावण यानुसार केला. परिणामी लांबी एकसारखी मिळाली. बाग फुलोऱ्यात असताना थ्राईवर २ लि. + क्रॉंपशाईनर २ लि. + हार्मोनी १ लि. ५०० लि. पाणी असे दोन स्प्रे दिले. परिणामी त्यावेळेस वातावरण खराब असतानाही डावणी आला नाही. दुसऱ्या डिपींगमध्ये न्युट्राटोन प्रत्येकी ५ मिली १ लि. द्रावणात घेतले व तिसऱ्या डिपमध्ये राईपनर + न्युट्राटोन ५ मिली १ लि. द्रावण यानुसार घेतले व नंतर क्रॉंपशाईनर + राईपनर + न्युट्राटोन १० ते १२ दिवसांनी स्प्रे दिले. परिणामी घडांना, मण्यांना चकाकी एवढी मिळाली की लोक बघत राहतात. एवढ्या खराब वातावरणात एवढे चांगले उत्पादन कसे? असे लोक विचारतात तेव्हा डॉ.बावसकर सरांची औषधे वापरली असे सांगतो. मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे आमच्या भागातील श्री. ईश्वर शिंदे या प्रतिनिधींच्या संपर्कात राहून वेळोवेळी माहिती घेत असतो.

आज माझ्याकडील फ्लेम काळी सव्वा एकर द्राक्ष क्रॉंपशाईनर + राईपनर + न्युट्राटोनच्या स्प्रेमुळे एकसारखी काळी झाली आहे व चकाकी भरपूर आहे.

अति पावसातही हार्मोनीमुळे डावण्या लगेच कव्हर !

नोव्हेंबरमध्ये भरपूर पाऊस झाल्याने सर्वांच्याच बागेवर डावणी भरपुर प्रमाणात होता, पण मी त्यावेळेस हार्मोनीचे ६ दिवसांच्या अंतराने दोन स्प्रे दिल्यामुळे डावणी लगेच कव्हर झाला. दुसऱ्याच वर्षाच्या फ्लेम बागेवर सध्या २० - २५ घड असून मण्यांची साईज १८ ते २० एम. एम. आहे. याला ८ ते १० दिवस काढणीस वेळ आहे. थॉमसनचा तिसरी डीप ८ ते १० दिवसांपुर्वी झाला आहे.

आता मी डॉ.बावसकर सरांच्या टेक्नॉंलॉजीचा टोमॅटो, कोबी, लसूण इत्यादी पिकांसाठी वापर करत आहे व एप्रिल छाटणीपासून द्राक्षबागेस पुर्णपणे अवलंब करणार आहे.