कांदा २२ गुंठ्यात २०० पिशवी (१० टन) २।। महिन्यात फ्लॉवर चढ्या भावाने कल्याण, वाशी, दिल्लीस
श्री. केशव अण्णाजी ठिकेकर,
मु. पो. ठिकेकरवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे.
मो. ९६६५६६९९१८
आम्ही कांदा, टोमॅटो, फ्लॉवर, ऊस ही पिके दरवर्षी घेत असतो. भाजीपाला पिकांसाठी डॉ.
बावसकर तंत्रज्ञान गेली १० वर्षापासून वापरतो. खराब हवामानातही चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्यास या तंत्रज्ञानाची मदत होते.
अति पावसातही कांदा निरोगी
कांद्याच्या बियाला जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करण्यापासून ते कांदा काढणीपर्यंत डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करतो. यंदा जादा पावसाने अनेकांची रोपे जागेवर बसली. आम्हाला मात्र जर्मिनेटरमुळे १५ ते २०% च झळ बसली. कांद्याला सप्तामृत किटकनाशक व बुरशीनाशकासह फवारली. त्यामुळे खराब हवामानातही पिके जोमात आले. आज रोजी पावणे दोन महिन्याचा कांदा झाला असून प्लॉट पुर्णता रोगमुक्त आहे. पातीस काळोखी असून पात सरळ व मान जाड आहे. जर्मिनेटर एकरी १ लि. २०० लि. पाण्यातून आतापर्यंत २ वेळा दिल्याने पांढरी मुळीचा जारवा खूप वाढला आहे.
कांद्याला गांडूळखत एकरी २० - २२ बॅगा लागवडीपुर्वी देतो. लागवडीनंत आंबावणी देण्यापुर्वी १८ :४६ खताच्या एकरी ४ बॅगा देऊन आंबवणी देतो. यंदा जादा पाऊस झाल्याने त्याचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून सल्फर एकरी १० किलो दिले. नंतर खुरपणी झाल्यावर बायोझाइम आणि १०:२६:२६ खताचा डोस दिला.
राईपनर न्युट्राटोनमुळे फुगवण उत्तम व पत्ती कडक
आता कांदा निरोगी राहून पोसण्यासाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनर आणि न्युट्राटोनची फवारणी घेणार आहे. त्यानंतर १५ दिवसांनी दरवर्षीप्रमाणे थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर आणि न्युट्राटोन फवारणार आहे. या दोन्ही फवारणीने कांद्याची फुगवण होऊन पत्ती कडक बनते. त्यामुळे साठवणुकीत कांदा खराब होत नाही. गेल्यावर्षी या तंत्रज्ञानाने २२ गुंठ्यात २०० बॅग (१० टन) कांदा उत्पादन मिळाले होते.
कल्पतरू, गांडुळ खतामुळे गड्डे भरण्यास मदत
कांद्याप्रमाणे फ्लॉवरलाही डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरतो. चालू वर्षी दीड एकेर फ्लॉवर लावून महिन्याची झाली आहे. १० -१२ व्या दिवशी थ्राईवर, क्रॉंपशाईनरची किटकनाशकासह फवारणी घेत आहे. फ्लॉवरलाही कांद्याप्रमाणे गांडूळखत आणि रासायनिक खतांचा वापर करतो. कल्पतरू सेंद्रिय खतही वापरतो. गांडूळ खत व कल्पतरूमुळे जमीन भुसभुषीत राहते. गड्डे भरण्यास मदत होते. सप्तामृताच्या फवारण्यांमुळे गड्डे पांढरेशुभ्र मिळतात. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात.
अडीच महिन्यात फ्लॉवर काढणीस येते. १४ दिवसात प्लॉट खाली होतो. वरीलप्रमाणे नियोजन करून एकरी २०० गोणी (६० ते ६५ किलोची गोण) माल निघतो.
ओतूर मार्केटला चढ्या भावाने कल्याण, वाशी व दिल्लीचे व्यापारी माल घेतात. बाजारातील तुलनेत १० ते २० % भाव आदिक मिळतात. सर्वसाधारण कमीत कमी १०० ते १२० ते जास्तीचे ३५० रू. १० किलो याप्रमाणे भाव मिळतात.
चैत्री पाडव्याच्या टोमॅटोच्या लागवडीस डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचे दर १५ दिवसाला फवारे घेतो, त्यामुळे प्रतिकुल परिस्थितीतही एकरी ४० टन उत्पादन मिळते. शिवाय मालाचा दर्जाही उत्तम असतो.