केळीचे १० ते १५ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने विक्रमी उत्पादन

श्री. दिलीप देशमुख,
मु.पो. पहूर, ता. जामनेर, जि. जळगाव,
मोबा. ९४२३७७३५१०


आम्ही १० -१५ वर्षापासून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने केळीचे उत्पादन यशस्वीरित्या घेत आहे. केळीची लागवड मृग आणि कांदे बागातील असते. दरवर्षी ३० ते ३२ हजार रोपांची लागवड असते. लागवड ५' x ५' वर असते. एकरी साधारण १७०० झाडे असतात. टिश्यू कल्चर आणि काही बेणे लागवडीची केळी असते. लागवडीच्यावेळी रोपे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून लावल्याने कमी कालावधीत जोमाने वाढ होते. पांढऱ्या मुळ्यांचा जारवा वाढतो. रोपे नेहमीपेक्षा लवकर स्थिरावतात. मर अजिबात होत नाही.

केळीला लागवडीच्यावेळी हजारी कल्पतरू खताच्या ४ बॅगा आणि स्टेरामिल ५ -१० -५ खताच्या ३ बॅगा असा डोस देतो. नंतर पुन्हा १।। ते २ महिन्याचा प्लॉट झाल्यानंतर वरीलप्रमाणे डोस देतो आणि एकदा रासायनिक खताचा (सुपर फॉस्फेटच्या ४ बॅगा, पोटॅशच्या २ बॅगा) असे तिन्ही डोस ४ महिन्यात पुर्ण करतो.

सप्तामृत औषधांच्या ४ ते ५ फवारण्या लागवडीपासून ते माल काढणीपर्यंत करतो या फवारण्यांमध्ये २ - ३ किटकनाशक व बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतो. सप्तामृताच्या सुरूवातीपासून फवारण्या व कल्पतरू खताच्या वापराने झाडांमध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण होऊन वाढ झपाट्याने होते. लागवडीपासून १० व्या महिन्यात घड काढणीस येतात. घड सरासरी ४५ ते ५८ किलोपर्यंत चे आपल्या तंत्रज्ञानाने मिळतात. घडामध्ये १० ते १३ फण्या असतात आणि एका फणीमध्ये ३० ते ३६ केळी असतात. अशा केळीचे एकरी ३० ते ३२ टन उत्पादन मिळते.

दुसऱ्या पिकापासून (केळीच्या खोडव्यापासून) १८ व्या महिन्यात ३५ ते ३७ टन उत्पादन मिळते आणि २७ व्या महिन्यात तिसऱ्या पिकाचे उत्पादन मिळते. त्यावेळी २८ ते ३० टन उत्पादन एकरी मिळते.

मुनव्यांपासून (बेण्यापासून) लागवड केलेली केळी १२ ते १३ महिन्यात काढणीस येते. याचे घडाचे वजन २८ ते ३५ किलो असते. एका घडात ९ ते १० फण्या असतात आणि फणीमध्ये २४ ते २८ केळी असतात. बेण्यापासून एकच पीक घेतो. तर एकरी २५ टनापर्यंत उत्पादन मिळते.