न्हावरे प्रदर्शनातून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी नेली, त्याची पिकावर दोन दिवसात किमया झाली, म्हणून लगेचच परत प्रदर्शनातूनच औषधे नेली
श्री. दादाभाऊ पांडुरंग बनकर,
मु.पो. न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे.
मोबा. ९४०४६१०५६५
माझ्याकडे १।। एकर टोमॅटो लागवड केलेली असून आजपर्यंत झाडे २।। महिन्यांची झाली आहेत.
आतापर्यंत संपूर्णपणे रासायनिक औषधांची फवारणी केली. तरीसुद्धा डाऊणी, बोकड्या रोगांचा
प्रादुर्भाव जाणवला होता. पण न्हावरे इथल्या प्रदर्शनातून मी २०/०१/१४ रोजी जर्मिनेटर,
थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर ही औषधे खरेदी केली व त्याचदिवशी फवारणी केली तर २ दिवसामध्ये
मला इतका चांगला रिझल्ट मिळाला की, २ दिवसात ४०% रोग आटोक्यात आला म्हणून पुन्हा औषधे
घ्यावीशी वाटली व मी २२/०१/१४ रोजी परत न्हावरे प्रदर्शनातून प्रत्येकी १ लि. सप्तामृत
औषधे खरेदी केली.