डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आलेले कांदे प्रदर्शनात पाहून लोक आश्चर्य चकित होत !
श्री.संतोष छबनराव काकडे,
मु.पो. न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे,
मोबा. ९९६००६४११२
माझी एकूण ५ एकर शेती असून त्यामध्ये मी गहू, ऊस, कापूस, कांदा ही पिके घेतो. तीन वर्षापुर्वी
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती वाचली आणि प्रयोग म्हणून ३० गुंठे वेगळ्या जमिनीतील
कांदा पिकासाठी ही टेक्नॉंलॉजी वापरली, तर मला त्या क्षेत्रामध्ये इतरांपेक्षा चांगला
रिझल्ट मिळाला. कांदा एकदम क्वालिटी निघाला. कांद्याला कलर, शाईनिंग इतरांपेक्षा चांगली
मिळाली. म्हणून मी ह्यावर्षी सव्वा एकर कांद्यासाठी ही टेक्नॉंलॉजी वापरली. सुरुवातीला
कल्पतरू सेंद्रिय खत ३ बॅग वापरल्या व जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनरची फवारणी केली
व दुसऱ्या एका क्षेत्राला रासायनिक खत व औषधे फवारली. कांदा २।। महिन्याचा झाल्यानंतर
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरलेल्या क्षेत्रातील कांद्यांची साईज एकदम मोठी व पातीला
शायनिंग दिसून आली. न्हावरे येथे कृषी प्रदर्शनात दोन्ही कांदे मी आणले असता लोक म्हणायचे
दोन्ही कांद्यामध्ये एक महिन्याचा फरक आहे. हा सर्व रिझल्ट मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे
आला. आता मी न्हावरे कृषी प्रदर्शनातून दोन फवारणीची औषधे घेवून जात आहे.