डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा 'माऊस' क्लिक करून मी यशस्वी शेती करीन - एक दृढ आशावाद !

श्री. कौस्तुभ नंदकुमार वडनेरे,
मु.पो. कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे.
मोबा. ९८२२०४८३०३


मी कॉम्प्युटर डिप्लोमा केला असून ४ वर्षापासून पुर्ण वेळ देऊन शेती करीत आहे. एकूण १८ एकर शेती आहे. त्यामध्ये केशर आंबा ५०० झाडे ८ वर्षाची १५' x १५' वर आहेत. कालीपत्ती चिकू ६५० झाडे १५' x १५' वर ७ वर्षाची आहेत. नरेंद्र ७ व आनंद आवळा १५० झाडे ७ वर्षाची १५' x १५' वर आहेत. याला २ वर्षापासून डॉ.बावसकर सरांच्या मार्गदर्शनानुसार तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे.

चालू वर्षी सुरूवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे. पहिली फवारणी ऑक्टोबरपासून नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशा ४ फवारण्या केल्या आहेत. तर जानेवारीत मोहोर निघण्यास सुरुवात झाली आहे.

सरांच्या म्हणण्यानुसार 'डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने खरे तर मोहोर हा डिसेंबरच्या सुरूवातीसच येतो. परंतु गेल्या ३ वर्षापासून थंडी ही डिसेंबरमध्ये न येता जानेवारीत येतेय. त्यामुळे आंब्याला मोहोर कमी येणे, दुहेरी येणे (२ वेळा येणे) व न येणे अशा घटना घडत आहेत. याला कारण म्हणजे हवामानामध्ये प्रचंड बदल घडत आहेत. हवामानातील अचानक, अतिरिक्त व अतिरेकी (Irratic) बदलामुळे ही समस्या उद्भवत आहे.

आपल्या बागेस जानेवारीत जरी मोहोर लागला असला तरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढील फवारण्यावर मोहोर गळ न होता, फळांचे लवकर पोषण करून घेत येऊन पावसाच्या अगोदर आंबा मार्केटला अतिशय उत्तम दर्जाचा मिळेल. "

यावेळी सरांनी अहमदाबादमधील एक किस्सा सांगितला की, 'सप्टेंबर २०१२ अहमदाबादमधील कृषी प्रदर्शनामधून एका अधिकाऱ्यास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीबद्दल माहिती मिळाली. कृषी विज्ञानमधून टेक्नॉंलॉजीबद्दल माहिती वाचून तो अधिकारी अतिशय प्रभावीत झाला. त्यांना अहमदाबाद येथील एका आश्रमास देणगी द्यायची होती. तर रक्कम न देता त्यांना वाटले की आपण या आश्रमातील ३०० एकर शेतीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी देऊन तेथील उत्पदान वाढल्यास आपली देणगी सत्कारणी लागेल. ह्या आश्रमामध्ये देशातील बऱ्याच राज्यातील गरीब, हुशार, होतकरू मुले दत्तक घेवून त्यांचा जेवण, राहणे, कपडे, शिक्षण हा सर्व खर्च हे आश्रम करते.

या आश्रमातील ३०० एकरमध्ये जुनी आंब्याची झाडे आहेत तसेच शिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी भाजीपाला, तृणधान्य पिके घेतली जातात. जुन्या आंब्याच्या झाडांचा बहार धरण्यासाठी त्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे नारायणगाव सेंटरचे अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. आंब्याची जुनी बाग दाखवून त्यांच्या व डॉ.बावसकर सरांच्या फोनवरून मार्गदर्शनानुसार या जुन्या आंब्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कल्पतरू खत वापरले.

त्यामुळे या आश्रमास दरवर्षी औषधे पुरविणाऱ्या व्यापाऱ्याची विक्री व आश्रमासाठी औषधे खरेदी करणाऱ्याचे त्यावरील कमिशन गेल्याने कमिशन वाल्याने सांगितले की डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा रिझल्ट काही आला नाही. यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे नारायणगावचे प्रतिनिधी आश्चर्य चकीत झाले, कारण असे तर कुठेच झाले नाही. त्यानंतरच्या वर्षी मात्र त्यांनी नेहमीचीच औषधे (व्यापारी व कमिशनवाल्याने) चालू ठेवली. नंतर सप्टेंबर २०१३ मध्ये अहमदाबाद कृषी प्रदर्शनामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या स्टॉंलवर त्याच बागेचे प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुराने सांगितले की मागच्या वर्षी प्रथमच आम्हाला एवढे उत्पन्न मिळाले की, ३ लाख रू. चे आंबे विकून आंबे संपेना म्हणून १ लाख रू. किमतीचे आंबे लोकांना वाटले. म्हणजे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने हमखास क्वॉलिटी उत्पादन मिळते. मात्र मधले कमीशनवाले गैरसमज पसरवतात, कारण दुकानदाराची (डिलरची) निकामी औषधे बाद होतात व मॅनेजरचे कमीशनही जाते. कशी या देशाची शेती सुधारायची !"

लोकवन गहू ४० गुंठे २९ नोव्हेंबरला लावला. त्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या २ फवारण्या केल्या. सध्या (१५ जानेवारी २०१४) गुडघ्यापर्यंत वाढून ओंब्या धरायला सुरुवात झाली आहे.

आंब्यासाठी पुढील फवारणीस आज १५ जानेवारी २०१४ रोजी औषधे घेऊन जात आहे.